Monday, 6 July 2020

समोसा

समोसा

साहित्य: पाव किलो हिरवे वाटणे, २-३ मध्यम आकाराचे बटाटे, हिरवी मिरची, जिरे मोहरी, हिंग, काळी मिरे पूड,धना पावडर, जिरा पावडर, मीठ, लाल मिरची पावडर, मैदा, ओवा, हळद, कोथिंबीर, कढीपत्ता व तेल इत्यादी

कृती:  १) कणिक

एका ताटामध्ये २ कप मैदा घ्या त्या मध्ये १ छोटा चमचा ओवा टाका, चवीनुसार मीठ घाला व २ चमचे थंड तेलाचे मोहन घालून घट्टसर कणिक मळून घ्या. कणिक १५ मिनिटे रेस्ट करा व तोपर्यंत समोसा मध्ये घालण्यासाठी सारण बनवून घेऊ.

२) स्टफिन्ग (सारण)

पाव किलो वाटणे आणि बटाटे शिजवून घ्या. ते कुस्करून एकत्र करा त्यावर अर्धा छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा काळी मिरे पूड,१ छोटा चमचा धना पावडर, एक छोटा चमचा जिरा पावडर, एक छोटा चमचा लाल मिरची पावडर,टाकून मिक्स करा . नंतर एका कढई मध्ये २ चमचे तेल घाला त्यामध्ये जिरे-मोहरी व कढीपत्ता घालून फोडणी बनवा. त्या फोडणी मध्ये स्मॅश केलेले बटाट्याचे मिश्रण घाला व संपूर्ण मिश्रण ८-९ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या. गॅस बंद करा व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व मिश्रण थंड होऊद्या.

३) समोसा

आता समोसा करण्यासाठी प्रथम एक छोटा कणकेचा गोळा घ्या आणि त्याची छोटी चपाती लाटा. ती चपाती मधून कापून बरोबर समान भाग करून घ्या. आता अर्ध्या चपातीचा भाग मधून दुमडून कोन बनवा आणि त्या मध्ये बटाटा व वाटण्याचे सारण भरून कोन  व्यवस्थित चिटकवून घ्या. मंद किंवा मध्यम आचेवर समोसे तळून घ्या. समोसे भाजण्यासाठी १० मि. वेळ लागतो.

मी इथे विडिओ share करते तो पहा म्हणजे तुम्हाला कोन बनवण्यास मदत होईल.








समोसा तुम्ही पुदिना चटणी, ओल्या नारळाची चटणी, शेजवान चटणी किंवा टोमॅट्टो सॉस सोबत खाऊ शकता. 

Friday, 12 June 2020

चिकन दम बिरयाणी

चिकन दम बिरयाणी

साहित्य: अर्धा किलो चिकन, अर्धा किलो बिरयाणी तांदूळ, दही, लाल मिरची पावडर, धना पावडर, ४-५ हिरव्या मिरच्या, १ चक्रीफूल, १ जावेत्री, ४-५ हिरवी वेलची, १ मोठी वेलची , शहाजिरे, जिरे, जायफळ, लवंग, काळे मिरे, तमालपत्र, दालचिनी, कोथिंबीर, पुदिना, लाल फूड कलर, १ लिंबू, ५-६ कांदे, तूप इत्यादी  .

कृती :  १. बिरयाणी मसाला

१ चक्रीफूल, १ जावेत्री, ४-५ हिरवी वेलची, १ मोठी वेलची ,१ छोटा चमचा शहाजिरे, एक छोटा चमचा जिरे, पाव भाग जायफळ, २-३लवंग, ४-५काळे मिरे इत्यादी मिक्सर च्या भांड्यामधे घालून बारीक पावडर बनवून घ्या.

टीप : ही कृती अर्धा किलो बिर्याणीसाठी आहे त्यासाठी एवढे प्रमाणात गरम मसाल्याचे पदार्थ वापरा.

२. चिकन मॅरिनेशन

अर्धा किलो चिकन धुऊन घ्या. त्यावर १ लिंबू पिळा व चवीनुसार मीठ टाका , १ चमचा लाल मिरची पावडर , १चमचा धना पावडर , १ छोटी वाटी दही, ४-५ हिरव्या मिरच्यांची पेस्ट, १ चमचा वर सांगितल्याप्रमाणे बिर्याणी मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना इत्यादी टाकून मिश्रण हलवून घ्या. सर्व वस्तू एकमेकांत मिसळलेल्या आहेत का बघा आणि अर्ध्या तासा साठी तसेच झाकून ठेवा.

टीप : या मध्ये तुम्ही  रोज वॉटर किंवा केवडा वॉटर घालू शकता त्यामुळे बिर्याणीला छान वास येतो.

३. तांदूळ शिजवणे

अर्धा किलो बिर्याणीसाठीचा लांब दाणे असलेला तांदूळ धुऊन स्वच्छ करा व अर्ध्या तासा  साठी भिजवून ठेवा. नंतर तांदळाच्या चारपट पाणी एका भांड्यात घ्या त्यामध्ये १चमचा तेल, चवीनुसार मीठ, १ इंच दालचिनी , २ तमालपत्र व १ छोटा चमचा शहाजिरे टाका. पाण्याला उखळी आली की भिजलेले तांदूळ पाण्यात टाका. अधून मधून तांदूळ हलवून घ्या. तांदूळ ७५% शिजवा . म्हणजे जेंव्हा तांदळा मध्ये १ कणी राहील तेंव्हा गॅस बंद करा आणि तांदळा मधील पाणी गाळून वेगळे करा.

टीप : तांदूळ पूर्ण शिजवून घेऊ नका नाहीतर बिर्याणी चिखल सारखी होईल. तांदूळ जास्त कच्च ठेऊ नका नाहीतर पुन्हा शिजवता येत नाही. त्यामुळे तांदूळ बरोबर १ कणी राहिल असाच शिजवून घ्या.

४. चिकन शिजवणे

एका कुकर मध्ये थोडे तेल घालून ५-६ मध्यम आकाराचे कांदे पातळ उभ्या आकारात चिरून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या व मॅरीनेट झालेले चिकन  त्यामध्ये परतून घ्या व १ वाटी पाणी टाकून १० मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. जर जास्त पाणी राहिले तर गॅस मोठा ठेऊन पाणी आटून घ्या व ग्रेव्ही प्रमाणे घट्टसर होईल अश्या पद्धतीत करून घ्या.

५. बिर्याणी

एक  जाड तवा गॅस वर मंद आचेवर ठेवा. त्यावर एक टोप ठेवा. टोपा मध्ये थोडे तेल टाका वर भाताचा एक लेअर पसरवा. भातावर फूड कलर टाकून थोडे हलक्या हाताने हलवा त्यावर शिजवलेल्या चिकन चा लेअर द्या पुन्हा भाताचा लेअर देऊन नंतर राहिलेले सर्व चिकन चा लेअर द्या व सर्वात शेवटी बिर्याणी मसाला अर्धा चमचा तूपा  मध्ये मिक्स करून त्यावर टाका. व झाकण ठेऊन त्यावर जाड वस्तू ठेवा ज्यामुळे वाफ बाहेर जाणार नाही व बिर्याणीला दम येईल. ५-१० मिनिटांनी गॅस बंद करा व हलक्या हाताने बिर्याणी खाली वर हलवा.

टीप : बिर्याणी जास्त जोराने हलवली असता तांदूळ मोडू शकतो त्यामुळे हलक्या हातानेच हलवा.





चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागतो.


धन्यवाद !!




बटर चिकन

बटर चिकन

साहित्य : अर्धा किलो चिकन चे मऊ तुकडे, लाल मिरची पावडर, धना  पावडर , मीठ, बेसन पीठ, दही, कांदा , टोमटो, काजू, आलं-लसूण पेस्ट, सुखी मिरची, खोबरे, बटर/तूप , टोमॅटो सॉस इत्यादी

कृती:  १. चिकन शिजवणे

प्रिपरेशन : लसूण, खोबरे, आलं व कोथिंबीर यांची बारीक़ पेस्ट करा. १ मध्यम आकाराचा कांदा बारीक़ चिरून घ्या. साधारण १ वाटी पाणी गरम करा.

प्रथम चिकन चे मऊ तुकडे धुऊन घ्या, त्या नंतर कुकर मध्ये १ चमचा तेल घाला व त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मध्यम आचेवर गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. कांदा भाजल्या नंतर त्यामध्ये लसूण, खोबरे, आलं व कोथिंबीर यांची बारीक़ पेस्ट घाला आणि २-३ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर थोडी हळद घाला व चिकन चे तुकडे घालून छान परतून घ्या. ३-४ मिनिटे परतून घेतल्या नंतर त्यामध्ये साधारण १ वाटी गरम पाणी घाला आणि कुकर बंद करा. गॅस मंद आचेवर ठेऊन १० मिनिटे चिकन शिजवा . चिकन शिजल्या नंतर त्यामधील पाणी ज्याला आपण आळणी किंवा सूप म्हणतो ते वेगळे करा आणि शिजलेले चिकन चे तुकडे एका ताटामध्ये काढून घ्या .

 टीप : चिकन कमी शिजले तरी चालेल आपण पुन्हा चिकन ला फ्राय करणार आहोत तेंव्हा चिकन शिजते .
चिकन जास्त शिजवू नका नाहीतर त्याचे तुकडे पडतील आणि पुन्हा फ्राय करता येणार नाही. चिकन शिजवणे हि स्टेप तुम्ही केली नाही तरी चालेल.

२. चिकन मॅरिनेशन

आता शिजलेले तुकडे थोडे थंड झाले म्हणजे त्यावर अर्धे लिंबू पिळा. नंतर त्यावर २ चमचे दही, १ छोटा चमचा धना पावडर , चवीनुसार मीठ , १ मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, १ छोटा चमचा लाल मिरची पावडर व १ छोटा चमचा फ्राय केलेले बेसन घाला सर्व तुकड्यांना मिश्रण लागेल या पद्धतीने हलवा व ते ताट फ्रिज मध्ये अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवा.

टीप : चिकन शिजवताना मीठ टाकले नाही त्यामुळे चिकन मॅरिनेट करताना त्या अंदाजाने मीठ वापरा. या मध्ये तुम्ही जिरा पावडर आणि हळद हि टाकू शकता. मी हे दोन पदार्थ टाकले नाहीत . हे ऑपशनल आहेत.

३. बटर चिकन ग्रेव्ही

 एका कढई मध्ये १ चमचा तेल घालून त्यामध्ये  २-३ मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले , २ सुख्या लाल मिरच्या, ३ मध्यम आकाराची टोमॅटो बारीक  चिरलेली , ७-८ काजू व १ चमचा आलं-लसूण पेस्ट घालून २-३ मिनिटे परतून घ्या. ते मिश्रण थंड झाल्यावर त्याची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करा.

४. चिकन फ्राय

मॅरिनेट झालेले चिकन फ्रिज मधून बाहेर काढून घ्या. नॉन स्टिक च्या तव्यामध्ये २ चमचे तेल घालून सर्व चिकनचे तुकडे परतून घ्या. चिकन सर्व बाजूने हलवून व्यवस्थित भाजून घ्या.

टीप : ज्यांना कुकर मध्ये चिकन शिजवायचे नसेल त्यांनी चिकन परतून घेताना त्यावर झाकण ठेऊन १० मिनिटे चिकन परतून घ्यावे म्हणजे चिकन कच्चे राहणार नाही.

५. बटर चिकन

शेवटी एका कढई मध्ये १ चमचा तेल व २चमचे बटर / तूप घाला . गॅस मंद आचेवर ठेवा व त्यामध्ये थोडी हळद आणि १छोटा चमचा लाल मिरची पावडर टाका. ते हलवून घ्या व त्यामध्ये अर्धा छोटा चमचा धना पावडर टाका १ मिनिट हलवून घ्या व त्यामध्ये बटर चिकन  ग्रेव्ही ( कांदा, टोमॅटो, सुखी मिरची , काजू, आलं लसूण पेस्ट )घाला. ही पेस्ट ३ मिनिटे भाजून घ्या जेंव्हा तेल सुटायला लागेल तेंव्हा त्यामध्ये चिकन चे फ्राय केलेले तुकडे घाला थोडे पाणी घाला व झाकण लावून ३-४ मिनिटे शिजवा. सर्वात शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर/कस्तुरी मेथी टाका. ३-४ चमचे बटर/तूप घाला या १ मोठा चमचा टोमॅटो सॉस घालून हलवा. आणि १ मिनिटांनी गॅस बंद करा.

टीप : तेल ऐवजी यामध्ये तुम्ही फक्त बटर/तूप घालू शकता. बटर चिकन जास्त तिखट नसते तरीही तुम्हाला तिखट हवे असेल तर यावर शेवटी गरम मसाला तुम्ही घालू शकता किंवा लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता.




                                                                  बटर चिकन


बटर चिकन बनवण्यासाठी तुम्हाला १ तास लागेल. हि डिश तुम्ही बटर नान सोबत खा खूप छान लागते.

धन्यवाद !!

Thursday, 11 June 2020

मठरी


साहित्य : गव्हाचे पीठ, ओवा , लाल मिरची पावडर , मीठ , कोथिंबीर, तेल

कृती : प्रथम एका ताटामध्ये अंदाजे २ कप गव्हाचे पीठ चाळून घ्या. नंतर पिठामध्ये अर्धा छोटा चमचा ओवा , एक मोठा चमचा लाल मिरची पावडर , चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि २ चमचे थंड तेलाचे मोहन घाला सर्व पीठ हाताने मिक्स करून घ्या . पिठाचा गोळा बनतो का पहा . नंतर थोडे थोडे पाणी घेऊन पिठाची घट्टसर कणिक मळा . १० मि. कणिक तशीच ठेऊन द्या. तोपर्यंत गॅस वर तेल गरम करत ठेवा . आता कणकीचे चपाती एवढे गोळे बनवून घ्या व त्याची पातळ चपाती लाटा . ३ चपात्या लाटल्या नंतर एका चपातीला एका बाजूने तूप लावा व त्यावर दुसरी चपाती ठेवा , नंतर त्याही चपातीला वरून तूप लावा व त्यावर तिसरी चपाती ठेवा त्याला सुद्धा वरून तूप लावून घ्या.  त्या तिन्ही चपात्या गुंडाळून लाथिम्बी बनवा. लाथिम्बी मळून घोळून घ्या व त्याचे सुरीने छोटी पुरी बनेल एवढ्या आकाराचे तुकडे पाडा. नंतर एक एक तुकडा घेऊन गव्हाच्या पिठाच्या साहाय्याने लाटा . छोट्या पुरी प्रमाणे आकार येईल असा पातळ गोळा लाटून झाला कि गरम तेलात मंद आचे वर तळून घ्या. मठरी थंड झाल्यानंतर चहा सोबतही खाऊ शकता.

टीप: मठरी मंद किंवा मध्यम आचे वरच भाजा . चपातीला तूप लावल्यामुळे त्याला पडदे सुटतात व ते कुरकुरीत होतात. मठरी खूप दिवस टिकते त्यामुळे तुम्ही एकदम बनवून साठवून ठेऊ शकता. स्टेप बाय स्टेप कृती खालील प्रमाणे....


स्टेप १. साधारण एवढ्या आकाराची गोल चपाती लाटून घ्या. 


स्टेप २. चपातीच्या वरच्या बाजूला तूप लावा. 


स्टेप ३. त्यावर दुसरी चपाती ठेऊन त्याला वरून तूप लावा नंतर त्यावर तिसरी चपाती ठेऊन पुन्हा तूप लावा . 


स्टेप ४. चपातीला हळू हळू गुंडाळून लाथिम्बी बनवा. 


स्टेप ५. अश्या प्रकारे गुंडाळा करून थोड घोळून पातळ बनवा. 


स्टेप ६. सुरीच्या सहाय्य्यने छोटे तुकडे पाडा . 


स्टेप ७. एक गोळा लाटा व एवढ्या आकाराची पातळ पुरी बनवा 


स्टेप ८. मंद व मध्यम आचेवर पुरी तळूनघ्या. 




मठरी हा ब्रेकफास्टला खाण्यायोग्य  खूप छान पदार्थ आहे. गहूचे पीठ वापरले असल्यामुळे आरोग्यासाठी चांगला आहे व पचनक्रिये साठी सुद्धा हलका आहे. 

तर तुम्ही नक्की घरी बनवा या रेसिपियसाठी फक्त १५ मिनिटे पुरे आहेत . 



धन्यवाद !



Friday, 5 June 2020

तुम्हारे जैसे कमीनियोंका सहारा है दोस्तों

आज खूपच दिवस वाईट गेला ! छे ! खूप कंटाळा आला आज !!
 मोबाईल , लॅपटॉप , नेटफ्लिक्स , व्हाट्सअप, फेसबुक , इंस्टाग्राम, ट्विटर , टिक- टॉक, हॅलो सर्व सोशिअल मीडिया चाळून चाळून  बोअर झालं. माणूसच असा प्राणी आहे त्याला सारखं बोअर होत. बर बोअर झालय म्हणायची सोय नाही नाहीतर घरचे कामाला जुंपतील ही मनातील भीती त्यापेक्षा तेच तेच व्हाट्सअप बघितलेले परवडलं !! नाही का ? 

अहो बोअर होतंय म्हणून काम केलं कि कंटाळा जातो का ? काय माहिती जातही असेल. रिकाम्या माणसांनाच बोअर होत असं घरचे म्हणतात .. पण जर सारखं तेच तेच काम रोजच करायला सांगितलं तर आपल्याला लगेच बोअर होत . हे म्हणजे असं झालं मला कसतरी होतंय आजार झाल्यासारखं ... नेमकं कोणतं औषध द्यावं पेशंटला ? डॉक्टरलाच  प्रश्न पडण्यासारखा आजार आहे बुवा. 

अगदी तसच बोअर झालं याच असावं.सहसा बोअर झालं की  तेच तेच काम नको असत काहीतरी  इंटरेस्टिंग वाटावं असं काहीतरी हवं असत. म्हणजे kit -kat ब्रेक हवा असतो म्हणा हवं तर ....  प्राण्यांना कधी होत असेल का बोअर ? वैरण खाऊन त्याचा तासानं तास रवंथ करत बसायला तुम्हाला सांगितलं तर किती बोअर होईल ना? जस्ट इमॅजिन !!

 अगदी त्याच प्रमाणे बोअर झालं म्हणून सहजच मोबाईल फोन चा कॉन्टॅक्ट लिस्ट चाळत बसले. किती मित्र-मैत्रिणी आहेत पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कोणाला वेळच नसतो एकमेकांशी  बोलायला. शाळेत असताना कधी सुट्टी येऊच नये असं वाटायचं कारण फ्रेंड ची गाठ पडणार नाही . फ्रेंड  ग्रुप मधील कोणी आजारी पडू नये नाहीतर करमत नाही असं वाटणारी मंडळी हळू हळू कॉलेजला गेली कि त्यांचे तिथे नवीन फ्रेंड्स होतात मग शाळेतील फ्रेंड्स ला कमी वेळ दिला जातो आणि हळू हळू ती मैत्री कमी होते. नाहीशी होत नाही पण अभ्यास आणि बाजूच्या वातावरणात समरस झाल्यामुळे त्या मैत्रीला तेवढा  गंध उरत नाही. पुढे जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी बाहेर पडलात तर कॉलेज मधील फ्रेंड्स सुद्धा हळूहळू नाहीसे व्हायला लागतात. असच असत ना सर्वांचं ?

 आणि मग लग्न झालं तर विषयच सोडा!! वाढत्या जबाबदाऱ्या आणि नवीन घरचे रुल्स फॉलो करण्यात अर्ध आयुष्य जात आणि तिकडेही नवीन फ्रेंड्स मिळतात मग मागचे फ्रेंड्स हळू हळू कमी होतात . हे म्हणजे आयुष्यच आता असं झालाय पुढचं पाठ आणि मागचं सपाट !

काही फ्रेंड्स कॉम्पिटिशनच्या जगात वावरत असताना बदलून जातात तर काहींना ती जुनी मैत्री जपणे म्हणजे काम वाटू लागते. काही जण कॉन्टॅक्ट मध्ये असतात पण त्यांचं अस्तित्व नसल्या सारखे आणि काही औपचारिक मेसेज करून कोमजलेलं झाड जस तग धरून असत त्याप्रमाणे ती मैत्री टिकवून ठेवतात. असून नसल्याप्रमाणे !!

काही जण कामापुरते फोन कॉल्स करतात तर काही जण खरंच आठवण येते म्हणून कॉल्स करतात. काहींना ओल्ड इस गोल्ड प्रमाणे नवीन फ्रेंड्स पेक्षा जुन्या मैत्रीचंच अप्रूप असत तर काहींना ओल्ड इस ओल्ड फॅशन प्रमाणे न्यू हवं असत. अश्या प्रकारची कंडिशन सर्वांच्याच आयुष्यात येते. काय खरंय ना !! ?

सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होऊन गेले आहेत असो !!

माझ्या आयुष्यात फ्रेन्ड्स या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे असं म्हणता येईल कारण पटकन कोणी विचारलं तुझी बेस्ट फ्रेन्ड कोण आहे तर मला सांगता येत नाही कारण सर्वच फ्रेन्ड्स बेस्ट आहेत. तरीही काही मैत्रिणी किंवा मित्र असे असतात ज्यांचे आपल्या आयुष्यात अस्तित्व नसते पण त्यांचा फार मोठा रोल असतो.

अशीच माझी मैत्रीण किरण . तिचे तसे मला फार मेसेज किंवा कॉल्स नसतात किंवा माझं आणि तीच रोज रोज बोलणंही होत नाही पण मला जेंव्हा खूप एकटं वाटत , खूप बोअर होत किंवा कोणाबरोबर तरी मन मोकळं कराव वाटत तेंव्हा किरण नेहमी फ्री असते. हा निव्वळ योगायोग असेल किंवा ती माझ्या साठी वेळ काढत असेल. मला तसा तिचा खूपच आधार वाटतो .

कॉलेज मध्ये असताना आम्ही मैत्रिणी होतो आणि आमची गावही जवळ जवळ आहेत त्यामुळे आमची मैत्री अजून टिकून आहे. किरण पहिल्यापासून शांत स्वभावाची आणि समजूतदार असल्यामुळे तिचे सल्ले सुद्धा तिच्या स्वभावाप्रमाणेच असतात. प्रत्येक गोष्टीवर तिचा शांत रहा हा सल्ला अगदी अचूक ठरतो. करिअर पासून ते अगदी लग्नापर्यंत चे निर्णय आम्ही एकमेकी चर्चा करून ठरवतो . अर्थात निर्णय स्वतःचा पण एक मोकळी चर्चा प्रत्येक विषयावर नेहमी करायची सवय आहे. काही गोष्टींचे निर्णय झाल्या नंतर जर निर्णय चुकीचा असेल तरीही जज न करण उलट धीर देत राहणं आणि त्यावर उपाय शोधायला मदत करणं फारच थोड्या जणांना जमत असं मला वाटत.

किरण आणि माझं लग्न अगदी १५ दिवसांच्या फरकाने झालं आहे आमच्या दोघींचं संसारिक  जीवन सारखच चालू आहे आणि त्यामुळे आम्हाला येणाऱ्या समस्या सारख्याच असल्यामुळे काही गोष्टींना तोंड देणं सोपं होऊन जात. सोलमेट ज्याला म्हणतात ते हेच असावं कदाचित ! एस किरण माझी सोलमेट आहे. प्रत्येकाला अशी मैत्रीण मिळेल असे नाही. मी भाग्यवान आहे मला ती मिळाली. !!!

तशीच पण थोड्या वेगळ्या स्वभावाची आणखी एक मैत्रीण मला माझ्या आयुष्यात लाभली ती म्हणजे नम्रता. कॉलेज मध्ये भेटलेली अस्सल मुंबईकर अशी नम्रता आयुष्याबद्दल फारशी सिरीयस नाही असं जरी वर वर वाटत असल तरी मनातून ती खूप हळवी आणि जबाबदार व्यक्ती आहे.

माझ्या आयुष्यात तिचे स्थान किरण इतकेच महत्वाचे ! खूप कॉमेडी स्वभावाची नम्रता कितीही दुःखात असेल तर हसवून हसून दुःख थोड्यावेळा साठी का होईना विसरायला लावणारी ती माझ्या आयुष्यात कधी आली कळलं नाही. आमची मैत्री पहिल्यापासून टिकून आहे. मनातलं बोलायला लावणारी आणि दुःख विसरायला लावणारी नम्रता तिच्या बऱ्याच गोष्टी शेअर करते. मला हि तिला मदत करायला आवडत त्यामुळे आमचं थोडं जास्तच पटत. नम्रताच्या आणि माझ्या कॉलेजच्या तश्या फारच आठवणी आहेत आजही आठवल्या तरी चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय रहात नाही. 

एक किस्सा अजून आठवतो खूप अभ्यास करणारी नम्रता एकदा आमची युनिट टेस्ट  चालू असताना रात्र भर अभ्यास करून सकाळी झोपली ती परीक्षेला पोहोचलीच नाही. पेपर झाल्यावर टेन्शन मध्ये असलेल्या नम्रताला आम्ही विचारलं काय झालं पपेरला का नव्हती ? तर चक्क अभ्यास करून झोप लागली असं सांगितलं  तेंव्हा आम्ही तिला खूप पिडून  काढलं होत आणि मॅडमला देखील तिनी हेच कारण सांगितलं होत. तीच मुंबई स्टाईल  मधील बोलणं सर्वांनाच खूप आवडायचं. एक बिनधास्त जीवन कस जगावं हे तिच्याकडे पाहून मला समजत. मी अपसेट असेल तेंव्हा या बयो चा फोन हमखास येतो.

या दोघींचा मला खूप आधार असतोच त्याच बरोबर एकमेकींना चिडवणं , खेचा खेची करणं , एकमेकींचा दुःख सांगून त्यावर सोलुशन जरी नाही निघालं तरी एकमेकींना हसवून थोड्यावेळापुरतं का होईना ते दुःख विसरायला लावणाऱ्या माझ्या मैत्रिणी सात जन्मी मिळाव्यात म्हणून मी कोणत्याही झाडाला फेऱ्या मारायला तयार आहे. या दोघींचा आवडता आणि कॉमन डायलॉग म्हणजे अशू तू वेडी आहेस का ? आणि दुसरा म्हणजे अशू तू ग्रेट आहेस. दोन्ही डायलॉग ऐकून मला बरं वाटत. 

तुमच्याही आयुष्यातअश्या मैत्रिणी मित्र असतील ना ? हा लेख मी खास माझ्या आयुष्यात अस्तित्व नसणाऱ्या पण इम्पॉर्टन्ट रोल असणाऱ्या मैत्रिणींसाठी समर्पित करते. त्यांचे आभार मी मानू  शकत नाही कारण दोस्ती मै नो सॉरी नो थँक्स होता हैं .







                                                

Wednesday, 3 June 2020

Home Made पनीर

पनीर हा दुधापासून बनवला जाणारा पदार्थ सर्वांनाच माहित आहे आणि बऱ्याच लोकांना पनीर पासून बनवलेले पदार्थ आवडतात देखील. पनीर पासून पनीर पुलाव , पनीर मसाला, पनीर टिक्का, पालक पनीर, मटार पनीर, पनीर भुर्जी , कढाई पनीर, पनीर बिर्याणी, पनीर मक्खनवाला , हैद्राबादी पनीर मसाला इत्यादी इत्यादी बरेच पदार्थ बनतात. पनीर हा फॅट्स, कॅलशिअम  , व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन चा प्रमुख स्रोत आहे. आरोग्यासाठी उत्तम मानले जाणारे पनीर तुम्ही अगदी रोजही खाऊ शकता कारण या मधील प्रथिण्यांची मात्र हि हिरव्या पालेभाज्यांमधील प्रथिने इतकीच आहे. पनीर गाई किंवा म्हैशीच्या दुधापासून बनवू  शकता. कमी फॅट्स असलेल्या दुधापासून बनवलेले पनीर वजन कमी करणे आणि स्नायू बळकट करणे साठी वापरतात. अफगाणिस्तान , मध्य आशिया, अमेरिका व युरोप या देशात पनीर चे उत्पादन जास्त प्रमाणात होते तर भारतात काश्मीर या थंड हवेच्या ठिकाणी पनीर जास्त प्रमाणात खाल्ले  जाते.  ज्या लोकांना मांस खाणे पचत नसेल किंवा आवडत नसेल  लोकांनसाठी पनीर हा बेस्ट ऑपशन आहे.  मग चला तर जास्त वेळ न खर्च करता आपण घरीच फ्रेश आणि healthy पनीर बनवूया !!!!!


साहित्य : दूध, लिंबू आणि पाणी. 

कृती : पनीर बनवण्यासाठी दुधाला एक उखळी येईपर्यंत तापवणे. साधारण एक लिटर दुधाचे पनीर अंदाजे पावकिलो बनते. 

 तापलेले दूध थोडे थंड होईपर्यंत तीन मध्यम आकाराच्या  लिंबाचा रस काढून गाळून घ्या. जेवढा रस आहे तेवढेच पाणी लिंबाच्या रसामध्ये घालून मिश्रण तयार करा . आता लिंबूचा रस थोडा थोडा घालत दूध हलवत रहा. दूध फाटेपर्यंत दुधात लिंबूचा रस घाला. दूध तरीही फाटले नाही तर दूध फाटेपर्यंत दूध गरम करा . आता दूध फाटून पाणी वेगळे झालेले दिसेल. नंतर  गाळणीच्या सहाय्याने दूध गाळून घ्या व गाळणीमध्येच पाणी टाकून दूध धुऊन घ्या. दूध जास्त धुतले तर त्यामधील प्रोटीन निघून जातील यासाठी थोडेच पाणी घालून दूध धुऊन घ्या म्हणजे लिंबाच्या रसाचा वास येणार नाही . 

आता गाळणी मधील दूध सुती रुमालामध्ये घालून सर्व पाणी पिळून घ्या व त्याची घट्ट पुरचुंडी बांधून रुमाल लटकावून ठेवा. मी सिंकच्या नळाला हा रुमाल बांधून ठेवला होता त्यामुळे जे जास्तीचे राहिलेले दुधातील पाणी निघून गेले. साधारण एक तास झाल्यानंतर रुमाल काढून बघा तुम्हाला दुधाचा घट्ट गोळा दिसेल. आता हा गोळा फोडून घ्या आणि त्याला वडी प्रमाणे चौकोन आकार द्या. त्यानंतर हा आकार तसाच रुमालामध्ये घडी करून बंद करा आणि त्यावर जड वजन ठेवा. तुम्ही दगडाचा खलबत्ता, पाण्याचे भांडे हि ठेऊ शकता.

 साधारण ४-५ तासानंतर रुमाल उघडून पाहिलं तर तुम्हाला पनीरची वडी दिसेल. ही वडी सुरीच्या सहाय्याने कापून छोटे छोटे तुकडे करा. मी इथे स्टेप बाय  स्टेप कृतीचे फोटो देत आहे म्हणजे तुम्हाला ही कृती लक्षात येईल. 



स्टेप १: एक लिटर तापवलेले दूध


स्टेप २: लिंबू आणि पाण्याचे मिश्रण


स्टेप ३: लिंबाचा रस अश्या प्रकारे घालून दूध हलवत रहा. 


स्टेप ४: दूध फाटेपर्यंत लिंबाचा रस घाला आणि अश्या प्रकारे दूध फाटून दूध आणि पाणी वेगळे होईल. 


 स्टेप ५: फाटलेले दूध सुती रुमालामध्ये बांधून १-२ तास अश्या प्रकारे टांगून ठेवा. 


स्टेप ६: नंतर सुकलेले दूध फोडून त्याला चौकोन आकार द्या व रुमालात ठेऊन अशी घडी घाला. 


स्टेप ७: त्या घडी वर वजन ठेवा. 


स्टेप ८: ४-५ तासांनी अशी पनीरची वडी झालेली दिसेल. 


स्टेप :९ सुरीच्या साहाय्याने पनीरचे छोटे छोटे तुकडे करा. 

पनीर किती काळ साठवून ठेवणार आहे या नुसार पनीरवर वेगवेगळी प्रक्रिया केली जाते . दूध  नासवण्यासाठी लिंबू, व्हिनेगर किंवा सायट्रिक ऍसिड व योगर्ट वापरले जाते.
 नक्की करून पहा!!!

धन्यवाद !!

Saturday, 16 May 2020

तरंग

सकाळी पाच चा गजर वाजला आणि मी झोपेतून जागी झाले. मला आज कॉलेजला लवकर जायचं आहे. खूप उशीर झाला!!  कॉलेज माझ्या घरापासून बरेच दूर असल्यामुळे मला रोजच लवकर उठून तयार व्हावं लागत . आज माझा सेमिनारचा विषय नक्की करायचा आहे. तस तर सर्वांना मॅडम नी आपल्या आपल्या आवडीचे विषय घ्या आणि सादर करा असेच सांगितले आहे. पण मला मात्र आवर्जून उद्या लवकर कॉलेजला ये!  मी देईल त्याच विषया वर सेमिनार दे असं खडसावणाऱ्या मॅडम चा मला खूपच राग आला होता.

मी घाईघाईने माझं आवरलं आणि दोन बिस्किटे तोंडात कोंबून लॅपटॉप आणि बॅग घेऊन बस च्या दिशेने धावत सुटले. आज माझी बस चुकली असती तर मॅडम नी अजून दोन दिवस तरी विषय नक्की करायला घालवले असते. मॅडम खूपच शिस्तप्रिय आहेत पण त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांची अडचण समजून घ्यायला हवी कि नको?  असो

मी अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीचे (पोस्ट ग्रॅड्युएशन) शिक्षण घेत आहे आणि ते ही सिग्नल प्रोसेसींग सारख्या मला तरी अवघड वाटणाऱ्या विषया मध्ये . आणि माझ्या प्रोजेक्ट गाईड आहेत अनुराधा मॅडम . अनुराधा मॅडम अँटेना या विषया मध्ये डॉक्टरेट पदवीचे शिक्षण घेत आहेत . त्या PHD च्या शेवटच्या वर्षाला आहेत.  जो करतो त्यालाच धारेवर धरतात या म्हणी प्रमाणे मलाच त्यांनी निशाणा बनवला होता. नेहमी बाकीच्यांना सूट आणि मला मात्र अवघड विषय देऊन त्या विषया बद्दल माहिती शोधायला पिटाळायचं हे त्यांचं आवडत कामच असावं . इंजिनिअरिंग हि विज्ञानाचीच शाखा आहे आणि माझा विज्ञान हा पहिल्यापासूनच आवडता विषय असल्यामुळे मलाही हे काम आवडते .

कदाचित त्यांना माझं काम आवडत असेल ? कदाचित त्यांना माझ्यात ती चमक दिसत असेल ? देव जाणे आज काय वाढून ठेवलं आहे माझ्या नशिबात. देवा आज तरी वाचावं तुझ्या पोरीला !!

मी कॉलजे मध्ये पोहोचण्या आधीच मॅडम त्यांच्या खोलीत काही तरी वाचत बसल्या होत्या. मी दरवाजा जवळ धापा टाकतच पोहोचले .

मे आय कम इन मॅम ? मी

एस ! कम इन .  यु आर टू  मिनिट्स अँड ट्वेन्टीथ्री सेकंड्स लेट!!! मॅडम

जास्त विषय वाढायला नको म्हणून मी पटकन सॉरी म्हणून रिकामी झाले.

सॉरी मॅडम ! नेक्स्ट टाईम आय विल बी ऑन टाईम.  मी 

पटकन सॉरी म्हणाल्या मुळे कदाचित त्यांचा राग गेला असावा. मग त्या सेमिनार च्या विषयाबद्दल बोलू लागल्या .
आधीच खूप साऱ्या कागदांचे गट्ठे त्यांच्या टेबल वर पडले होते. त्या मला १-१ विषय सांगत होत्या.

हा विषय थोडा अवघड आहे . तो असा विषय आहे . या विषयाबद्दल तुला काही माहिती आहे का ? असं विचारत असताना माझा खूपच गोंधळ उडाला . मी थोडी अवघडली होते लॅपटॉप च्या ओझ्याने माझं गाढव झालं होत. मग डोकं वर काढून त्यांनी एकवार माझ्यावर कटाक्ष टाकला . आणि मला बसायला खुणावले. मग मी लॅपटॉप ठेऊन एकदाची त्यांच्या समोर बसले . त्यांची  बऱ्याच कागदांची उलथापालथ झाल्या  नंतर त्यांनी एक विषय शोधून काढला तू  SAR value या विषया वर सेमिनार दे . काही मदत लागली तर सांग . एवढं बोलून त्यांनी जाण्यासाठी ची शांतता पसरवली. मी अर्थातच त्यांना घाबरत असल्यामुळे मला त्या विषया बद्दल एकटीलाच निपटून घ्यायचे होते . त्यांची मदत घेणं म्हणजे चारचौघात इभ्रत काढण्या प्रमाणेच होत.

SAR value हा मॅडम च्या PHD चा विषय होता. मला  तिथल्या बाकीच्या मॅडम नी च ही गोष्ट सांगितली होती.  विषय तर बदलून मिळणार नव्हता पण मॅडम चे या विषय मधील ज्ञान भरपूर असल्यामुळे काहीतरी बरळून चालणार नव्हते. मी तयारीला लागले.

मी खूप संशोधनाचे निबंध वाचून काढले. तेंव्हा मला कळालं SAR value हे अँटेना शी निगडित आहे.
मला आधी अँटेना काय आहे आणि मग त्याची SAR value काय असते हे सर्व जाणून घ्यायची उत्सुकता वाढू लागली. विषय फारच रंजक असल्यामुळे मी खूप माहिती गोळा केली. तुम्हाला पण नक्की आवडेल.

अँटेना (antenna ) म्हणजे दूरदर्शन किंवा आकाशवाणी यांचे संदेश घेणारी काम्बी . कदाचित अँटेना म्हणलं कि तुम्हाला तो जुना सीन आठवत असेल . महाभारत मालिका दूरदर्शन वर लागायची आणि जर चुकून सिग्नल गेला कि , एक इंजिनीअर अँटेना हलवत बसणार , एक जण दारात ओरडून सांगणार चित्र आलं कि नाही . चित्र दिसे पर्यंत तो अँटेना हलवून निश्चित करायचा कार्यक्रम चालायचा मगच तो अँटेना सोडून द्यायचा.  हो! हो ! तोच आहे हा अँटेना .

शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हणाल तर अँटेना म्हणजे असं साधन आहे जे एका शक्तीचे दुसऱ्या शक्ती मध्ये रूपांतर करते आणि टीव्ही किंवा रेडिओ (विद्युत चुंबकीय लाटा ) च्या लाटा प्रसारित किंवा प्राप्त करते.

जेम्स क्लार्क मॅक्सवेल च्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांताप्रमाणे भविष्यवाणी केलेल्या लाटांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जर्मन भौतिक शास्त्रज्ञ हेनरिक हर्ट्झ याने १८८८ मध्ये पहिला अँटेना बांधला होता. तेंव्हा पासून अँटेनाचा जन्म झाला.

अँटेना चा वापर हा कोणत्याही रेडिओ रिसिव्हर किंवा ट्रान्समिटर चे विद्युत connection  विद्युत  चुंबकीय लाटांशी करून देण्यासाठी होतो . रेडिओ लाटा म्हणजेच विदयुत चुंबकीय लाटा ह्या प्रकाशाच्या वेगाने हवेतून किंवा अंतराळातून प्रवास करतात. कोणत्याही वायरलेस कॉम्युनिकेशन मध्ये संदेश सिग्नल हा निर्वात पोकळीतून प्रवास करतो. संदेश पाठवणे आणि प्राप्त करून देण्याचे काम अँटेनांचे असते . तर ट्रान्समीटरने ट्रान्स्मिट केलेल्या संदेश सिग्नलची शक्ती कमी असल्यामुळे तो जास्त अंतर पार करण्यास असर्मथ असतो तेंव्हा सिग्नलचे मोडूलेशन केले जाते . मोडूलेशन म्हणजे लहान शक्ती असलेला सिग्नल जास्त शक्ती असलेल्या कॅरिअर सिग्नल वर बसवून पाठवला कि तो जास्त अंतरावर असलेल्या रिसिव्हर ला जाऊन मिळतो . रिसिव्हर नंतर डीमोडूलेशन करून मूळ सिग्नल प्राप्त करतो. संदेश सिग्नल हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves वाहून नेत असतात .   ड्रिल मशीनचे रिबिट जसे भिंतीला होल पडताना भिंतीमध्ये घुसते त्या प्रमाणे या लाटा निर्वात पोकळीतून प्रवास करतात . आता तुम्हाला थोडी अँटेनाची कल्पना आली असेल.

अँटेना च नक्की काम काय असते ? तर अँटेनाचे कार्यकारी तत्व असे आहे कि,  हा हवेतील पोकळी मध्ये  विद्युत प्रवाहाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये रूपांतर करतो तर पुन्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चे विदयुत प्रवाह मध्ये रूपांतर करतो. थोडक्यात सांगायचं म्हणाल तर ,अँटेना हे साधन दोन उपकरणामध्ये संभाषण घडवून आणण्यासाठी कारणीभूत असते.जसे कि उपग्रहासोबत संभाषण (satellite communication )  त्यासाठी एक ट्रान्समीटर आणि रिसिव्हर लागतो . ट्रान्समीटर च्या बाजूला जो अँटेना असतो तो विदुत प्रवाहाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये रूपांतर करून संदेश पाठवतो त्या अँटेना ला तुम्ही ट्रान्समीटिंग अँटेना म्हणू शकता. म्हणजेच पृथ्वीवरून तुम्ही या अँटेना द्वारे संदेश पाठवला , आता हा संदेश हवेतील पोकळी मधून वाहत जाऊन  दुसऱ्या उपकरणाच्या बाजूला जो  रिसिव्हिंग अँटेना असतो त्याला संदेश मिळतो . हा रिसिव्हिंग अँटेना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे पुन्हा विद्युत प्रवाह मध्ये रूपांतर करतो. म्हणजेच उपग्रहावरील रिसिव्हिंग अँटेना हे काम करतो . अशा प्रकारे अँटेना द्वारे आपण उपग्रहासोबत कॉम्युनिकेशन करू शकतो.

अँटेना चा शेप हा वेग वेगळा असतो तर त्याची साईझ  सुद्धा त्याच्या वापरावर अवलंबलेली असते.
म्हणजे अँटेना तुम्ही कोणत्या कामासाठी वापरणार आहे त्यावर अँटेनांची साईझ आणि शेप ठरलेला असतो. सर्वसामान्यतः अँटेनांचा आकार हा ऑपरेटिंग frequency वर एक चतुर्थांश (λ / 4) आणि अर्धा (λ / 2) तरंगलांबीवर असतो . जर ऑपरेटिंग frequency जास्त असेल तर wavelength (तरंगलांबी ) कमी असते आणि अँटेनांचा आकार कमी असतो. तुम्ही उपग्रहासोबत कॉम्युनिकेशन करण्यासाठी अँटेना वापरत असाल तर तुम्हाला गोलाकार असलेला डिश अँटेना वापरावा लागेल .  उपग्रहासोबत कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला  0.3Ghz ते 30Ghz या frequency चा वापर करावा लागतो तर त्यासाठी लागणाऱ्या अँटेनांची साईझ हि अंदाजे 13ft एवढी असते. याउलट मोबाईल फोन मध्ये वापरला जाणारा  अँटेना खूप लहान आकाराचा असतो. अगदी मायक्रो मिलीमीटर मध्ये. अँटेना या विषया मध्ये आता बरीच प्रगती होत आहे .

 डिश अँटेना, वायर अँटेना , लेन्स अँटेना, हॉर्न अँटेना, अरे अँटेना , मायक्रो  स्ट्रीप अँटेना असे बरेच अँटेनांचे प्रकार आहेत.  त्यामध्ये गोलाकार असलेला डिश अँटेना आपण उपग्रहासोबत कॉम्युनिकेशन करण्यासाठी , टीव्ही साठी, खगोलशास्त्र , रडार , space communication इत्यादी साठी वापरू शकतो . वायर अँटेना हा सरळ , वेटोळे असलेला असतो . हा अँटेना गाडीमध्ये , अंतराळयान , जहाज आणि मोठ्या इमारतीमध्ये  वापरला जातो.  लेन्स अँटेना शक्यतो खूप जास्त frequency असलेल्या कामासाठी वापरतात तर हॉर्न अँटेना मुख्यत्वे उपग्रहावरील कम्युनिकेशन आणि रेडिओ टेलेस्कोपी साठी वापरला जातो . हॉर्न अँटेना हा गिरणीच्या सुपासारख्या आकाराचा असतो. मायक्रोस्ट्रीप अँटेना मोबाईल फोन, क्षेपणास्त्र , अवकाशयान इत्यादी मध्ये वापरतात. अरे अँटेना सामान्यतः वाहने, विमान, जहाज , उपग्रह आणि बेस स्टेशन वर बसविली जातात.

अँटेनांचे बरेच घटक आहेत त्यावरून अँटेनांचे  एखाद्या कामासाठी निवड होते. गेन , बॅण्डविड्थ , frequency , रिटर्न लॉस , VSWR , रेडिएशन पॅटर्न इत्यादी घटक अँटेनांची कार्यप्रणाली ठरवतात .
गेन हा घटक अँटेना एकाच दिशेला किती पॉवर देत आहे त्यावर अवलंबून असतो. जेवढा जास्त गेन तेवढी अँटेनांची कार्यप्रणाली चांगली असते.

बॅण्डविड्थ हा दुसरा महत्वाचा घटक आहे. बॅण्डविड्थ हा frequency ची श्रेणी दर्शवितो ज्यावर अँटेना ऊर्जा उत्सर्जित किंवा प्राप्त करू शकतो. जास्त बॅण्डविड्थ असेल तर जास्त सिग्नल पास होतो.

अँटेनांची frequency,  अँटेना कोणत्या कामासाठी वापरणार आहे त्यावर अँटेनांची frequency ठरलेली असते . जेवढी जास्त frequency असेल तेवढा अँटेना लहान असतो तर जेवढी कमी frequency असेल तेवढा अँटेना मोठा असतो.

रिटर्न लॉस हा अँटेनांचा घटक अँटेना किती प्रमाणात ऊर्जा रिफ्लेक्ट करते यावर अवलंबून असतो . जेवढी ऊर्जा डिव्हाइस ला दिली  जाते तेवढी त्याने घेणे आवश्यक असते पण काही प्रमाणात ऊर्जा रिफ्लेक्ट होते त्याला रिटर्न लॉस म्हणतो तो जास्तीत जास्त कमी असेल तर अँटेना ची कार्यप्रणाली चांगली असते .

VSWR म्हणजे voltage standing wave ratio . जेवढा अँटेना आणि ट्रान्समिशन लाइन परफेक्ट मॅच असतील तेवढा VSWR कमी असतो. VSWR ची किंमत जेवढी कमी असेल तेवढा अँटेना चांगला .

याव्यतिरिक्त बरेच घटक आहेत जसे कि डिरेक्टिव्हिटी. अँटेना जेवढा एकाच दिशेने ऊर्जा उत्सर्जित करेल तो अँटेना वापरासाठी चांगला असतो .  या घटकांवरून अँटेनांचे परीक्षण केले जाते त्या सोबत त्याची साईझ जर कमी असेल ,तर तो अँटेना कामाचा आहे असे मानले जाते .

या वरून तुम्हाला अँटेना म्हणजे काय आणि तो कुठे व कसा वापरतात  हे समजले असेलच ! मला तरी आता या विषय मध्ये रस वाटू लागला आहे . किती वेगवेगळ्या प्रकारचे अँटेना असतात . मला तरी फक्त मोबाईल , टीव्ही , satellite इत्यादी मध्ये वापरणारे अँटेना माहित होते पण मोबाईल फोन मधला अँटेना प्रत्यक्ष पहिला नाही . त्यामुळे मला मोबाईल अँटेना कसा असतो हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली.

मोबाईल फोन मध्ये मायक्रोस्ट्रीप पॅच अँटेना जास्त वापरला जातो.त्यामध्येही MIMO अँटेना, monopole  अँटेना, PIFA अँटेना इत्यादी प्रकार आहेत .  हा अँटेना म्हणजे सर्किट बोर्ड वर असलेल्या मेटल ट्रॅक सारखाच दिसतो. आपण घरामध्ये जर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बिघडली तर ती वस्तू खोलून पहिल्या नंतर आत मध्ये एक हिरव्या रंगाचा बोर्ड दिसतो त्यावर हिरव्या रंगाचे मेटल ट्रॅक असतात . मोबाईल फोन मध्ये असलेला  मायक्रोस्ट्रीप पॅच अँटेनासुद्धा असाच मेटल ट्रॅक असल्या सारखा असतो. मोबाईल अँटेना हा multiband असतो म्हणजे तो एका पेक्षा जास्त frequency ला काम करतो. सध्या वापरात असलेले स्मार्ट फोन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त अँटेना असतात . एक अँटेना रेडिओ सिग्नल ट्रान्स्मिट आणि रिसिव्ह करतो म्हणजे व्हॉइस कॉम्म्युनिकेशन साठी ४G LTE  अँटेना असतो, तसेच ब्लूटूथ, GPS , Wi -Fi साठी सुद्धा मोबाईल फोन मध्ये अँटेना असतात.

या नंतर मी SAR  value काय असते या विषयाकडे वळणार आहे. मॅडम नी मला प्रथम  SAR  value ऑफ मोबाईल  अँटेना असे शोधायला सांगितले होते. मी त्याप्रमाणे शोध सुरु केला . पण राहून राहून मला एक प्रश्न सतावत होता तो असा कि , अँटेनांचे वर सांगितल्या प्रमाणे जे घटक अँटेनांची कार्यप्रणाली ठरवतात ते घटक आपण कमी जास्त कसे करू शकतो ? म्हणजेच मला पाहिजे तो आणि पाहिजे तसा अँटेना मी कसा डिझाईन करू शकते ? मी पुन्हा शोधायला सुरवात केली . जवळ जवळ २०-२५ संशोधनाचे निबंध वाचले त्यावरून मला समजले कि जेव्हा आपण अँटेना डिझाईन करतो तेंव्हा मॅनुफॅक्चरिंग मटेरियल मध्ये बदल केले , अँटेनाचे काही पॅरामीटर म्हणजे डायेलेकट्रीक कॉन्स्टन्ट , परमिटिव्हिटी , सब्स्ट्रेट ची जाडी वाढली किंवा कमी केली तर हे घटक कमी जास्त करू शकतो . किंवा अँटेना चा शेप आणि साईझ कमी जास्त केली तरीही हे घटक आपण बदलू शकतो आणि पाहिजे तसा अँटेना बनवू शकतो. स्प्लिट रिंग रेसोनेटर नावाचा अजून एक प्रकार आहे जो हे अँटेनांचे घटक बदलू शकतो.


 मेटामटेरिअल हे कृत्रिम पदार्थ आहे जो निसर्गात सापडत नाही ज्या मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक घटक असतात. स्प्लिट रिंग रेसोनेटर हे  मेटामटेरिअल पासून बनवतात  . या मुळे आपण अँटेनांचे काही घटक बदलवून आपल्याला पाहिजे तास अँटेना बनवू शकतो.

आहे ना मजेशीर ?

आता मी SAR  value ऑफ मोबाईल अँटेना  या विषयाकडे वळले !

प्रथम आपण SAR  value काय आहे हे जाणून घेऊ .म्हणून मी शोधायला सुरुवात केली ....

जेंव्हा आपण मोबाईल फोन वापरतो तेंव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves हवेतून प्रवास करत असतात . तुमचा संदेश असलेले सिग्नल या इलेक्ट्रोमॅग्नेटिक wavesवाहून नेतात . पुढे अँटेना द्वारे हे सिग्नल ट्रान्स्मिट आणि रिसिव्ह होतात. जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves संदेश सिग्नल वाहून नेत असतात तेंव्हा काही प्रमाणात सिग्नलचे dissipationहोते म्हणजेच काही सिग्नल ची ऊर्जा हवेमध्ये बाहेर पडते . अंदाजे सिग्नलच्या १०-२० % ऊर्जा हवेत  बाहेर पडते. यालाच मोबाईल  रेडिएशन असं म्हणले जाते. मोबाईल च्या वापरावर हे रेडिएशन लेव्हल अवलंबून असते . या रेडिएशन लेव्हल ला कंट्रोल करण्यासाठी SAR  म्हणजे स्पेसिफिक ऍबसॉरपशन रेट व्हॅल्यु वापरली जाते .
सध्या सरकारने मानवी हितासाठी मोबाईल च्या SAR  value वर काटेकोर निर्बंध घातले आहेत कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऍबसॉरबशन हे घातक आहे .

आपल्याला माहिती आहेच कि , मॉडर्न समाजात आजकाल वायरर्लेस सिस्टिम खूप लवकर आणि जास्त प्रमाणात वाढत आहे . लोकहीतासाठी ICNIR आणि IEEE  या आंतराष्ट्रीय संस्थांनी SAR  value कमी करण्याबाबत काही दिशादर्शक सूचना बनवल्या आहेत. ज्या मध्ये SAR  value ची मर्यादा जास्त नसावी व ती किमान किती असावी अशी माहिती पुरवली आहे. तसेच  WHO ने घेतलेल्या एका कार्यशाळेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिशनचे लहान मुलांवर होणारे परिणाम हि सांगितले आहेत.२०१६ मध्ये जवळ जवळ ७. ४ बिलिअन मोबाईल  चे वापरकर्ते होते आणि हि संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे , त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा धोका सुद्धा वाढत चालला आहे . भारतामध्ये SAR  value हि १. ६ W/Kg पेक्षा कमी असली पाहिजे. ज्या  मोबाईल फोन ची SAR  value हि १. ६ W/Kg पेक्षा जास्त आहे ते फोन वापरण्यासाठी धोकादायक आहेत.

मोबाईल फोन मध्ये वापरले जाणारे MIMO अँटेना चे डिसाईन मध्ये बदल केले तर SAR  value कमी होऊ शकते . या मध्ये दोन प्रकार आहेत . हेड फँटम आणि फ्लॅट फँटम . हेड फँटम म्हणजे SAR  value  जेंव्हा मोबाईल डोक्याजवळ असतो . तेंव्हा डोक्यातील टिशूंनी ऍबसॉरब केलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन . फ्लॅट  फँटम म्हणजे SAR  value जेंव्हा मोबाईल शरीरा जवळ असतो तेंव्हा शरीराने ऍबसॉरब केलेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हेड फँटम हा फ्लॅट फँटम पेक्षा जास्त असतो .

इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे मानवाला बऱ्याच व्याधी होऊ शकतात जसे कि , हार्ट अटॅक , ब्रेन ट्युमर ,कॅन्सर इत्यादी . मोबाईल फोन शर्ट च्या  खिशात ठेवल्या मुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हृदयाजवळ जास्त होते त्यामुळे हार्ट अटॅक चे प्रमाण खूप वाढले आहे . तासंतास मोबाईल कानाला लावून बोलण्यामुळे कान  दुखणे , कमी ऐकू येणे , ज्या कानाने मोबाईल वर बोलता त्या बाजूचे डोके दुखणे किंवा डोक्याची त्वचा खाजणे या प्रकारची लक्षणे आढळली आहेत. तसेच मेंदूत रक्ताच्या गाठी होणे हे सुद्धा मोबाईल च्या अति वापरामुळे होणारे रोग आहेत. गर्भवती महिलांनी मोबाईल चा जास्त वापर केल्या मुले लहान अर्भकाचा मृत्यू किंवा लहानपणीच अटॅक येणे . स्पर्म काउन्ट कमी होणे , गर्भधारणा न होणे या सारखे आजार सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मुळे होतात . हे रेडिएशन कमी करण्यासाठी आपण मोबाईल फोन चा वापर कमी केला पाहिजे . शक्यतो  हेडफोन लावून बोलणे, मोबाईल उशीखाली ठेऊन झोपणे या गोष्टी टाळाव्यात .लिफ्ट , कार , विमान , ट्रेन मध्ये फोन वापरणे टाळावे तेव्हा रेडिएशन जास्त असते . मोबाईल ची बॅटरी कमी असल्यास मोबाईल फोन वापरू नये .

आपण आपला मोबाईल विकत घेताना बाकीचे स्पेसिफिकेशन पाहण्याबरोबर मोबाईल हॅण्डसेटचा SAR  value तपासला पाहिजे. . कोणत्याही मोबाईल च्या SAR  value  तपासण्यासाठी मोबाईल फोन वर *#07# हा नंबर डायल करून कॉल बटन प्रेस करा तुम्हाला तुमच्या मोबाईलचा SAR  value दिसेल. जेवढा कमी SAR  value असेल तोच हँडसेट विकत घ्या.  सध्या मोबाईल फोन च्या SAR  value कमी करण्याबाबत बरेच संशोधन चालू आहे . त्याच बरोबर नवीन आणि जास्त दूर अंतरावर कम्मुनिकेशन घडवून आणण्यासाठी लागणारे उच्च प्रतीचे अँटेना तयार करण्याबाबत सुद्धा बरीच संशोधन चालू आहे. नुकतेच पार पडलेले चंद्र यान मोहिमेवर हरवलेला विक्रम लॅन्डर सोबत कम्मुनिकेशन होत नाही त्यासाठी कम्मुनिकेशन सिस्टिम मध्ये सुद्धा संशोधन चालू आहे .

बापरे ! किती माहिती आहे या विषयांबद्दल . मी उगाच मॅडमनी दिलेल्या विषयावर सेमिनार द्यावा लागणार म्हणून निराश होते . पण आज मॅडम मुळे च मला या विषयाबद्दल ज्ञान मिळालं . मी सर्व माहिती गोळा करून एक प्रेसेंटेशन बनवलं आणि सादर केलं . सर्व माहिती गोळा केल्यामुळे मी सर्व बाजूने सर्व शंकांचे निरसन केले . या मध्ये जास्त विचारला जाणारा प्रश्न हा होता . सर्वात कमी SAR  value असलेला मोबाईल  हँडसेट कोणता ?  तर verykool vortex RS ९० या हॅण्डसेटची SAR  value  ०. १८ आहे त्यानंतर samsung galaxy note या हँडसेट ची SAR  value  ०. १९ इतकी आहे. सर्वांनी टाळ्या वाजून प्रेसेंटेशन ला प्रतिक्रिया दिल्या व मी मॅडमच्या समाधानपूर्वक चेहऱ्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि माझा लॅपटॉप बंद केला .


धन्यवाद !

अँटेनाच्या जास्त माहितीसाठी कृपया या लिंक वर क्लिक करा.
http://ijariie.com/FormDetails.aspx?MenuScriptId=35106

तवा बटर नान


आज बऱ्याच दिवसांनी मला बटर नान आणि पनीर खाण्याची इच्छा झाली. पण बटर नान कसे बनवावे ? 
नेहमी हॉटेल्स मध्ये गेल्या नंतर व्हेज फूड ची ऑर्डर देताना पनीर मसाला आणि तंदूर नान किंवा बटर नान हे मेनू फिक्स असतात , आणि घरी जर पनीर मसाला बनवला तर महाराष्ट्रीयन असल्यामुळे या सोबत चपाती खाणे पसंद करतात काही जण घरीच बटर नान बनवत असतील देखील . पण मी बनवत नाही. शॉर्टकट मारण्यासाठी पनीर आणि चपाती बेस्ट. 

इ .स . १३०० मध्ये इंडो -पर्शियन कवी अमीर कुश्रवा यांच्या नोट्स मध्ये नान चा पहिला इतिहास नोंदवलेला सापडतो. हे मुळतः नान -ए -टुणूक (हलके ब्रेड ) आणि नान-ए -तनुरी (तंदूर भांड्यात शिजवलेले) म्हणून दिल्ली च्या इंपिरियल कोर्टात शिजवले गेले होते. नान  हा ओव्हनबेक केलेला फ्लॅटब्रेड आहे. नान हा पर्शिय भाषेचा शब्द आहे. नान हा प्रामुख्याने मध्य आशिया आणि दक्षिण आशिया मध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. एका बटर नान मध्ये ९३ कॅलरी असतात. त्यांपैकी ५६ कॅलरी कर्बोदके देतात, ९कॅलरी प्रथिने आणि उरलेली २७ कॅलरी चरबीमधून येतात. एक बटर नान एका प्रौढ व्यक्तीच्या दररोजच्या आहारात लागणाऱ्या २००० कॅलरी मधील ५% कॅलरी देते.  

नान बनवायचे ९ प्रसिद्ध प्रकार आहेत. १) नवाबी नान २)बटर नान ३)रोगनि नान ४)चिली चीज नान ५)मसाला पनीर नान ६)काश्मिरी नान ७)चूर चूर नान ८)कीमा नान ९)एग नान 

नान बनवायच्या बऱ्याच पद्धती आहेत तसे नान भाजण्याच्याही पद्धती असतात . नान भाजण्यासाठी लोखंडाचा तवा वापरत असाल तर त्याला तवा बटर नान म्हणतात अर्थात नान ला बटर म्हणजे लोणी लावले जाते. जर तुम्ही नान भाजण्यासाठी तंदुर ओव्हन वापरत असाल तर त्याला तंदूर बटर नान असे म्हणतात.

तुम्ही बटर नान सोबत पनीर मसाला, पालक पनीर, पनीर कडाइ , मटार पनीर, पनीर टिक्का मसाला व्हेज हैद्राबादी, मश्रुम मसाला किंवा मश्रुम कडाइ इत्यादी पदार्थ खाऊ शकता अजूनही बऱ्याच भाजी सोबत तुम्ही बटर नां खाऊ शकता. 

चला तर !! बटर नान बनवूया !!



साहित्य : मैदा , बेकिंग सोडा , मीठ , दूध, दही , बेकिंग पावडर ,  बारीक रवा , साखर, कोथिंबीर  इत्यादी .



कृती :  एका पराती मध्ये अर्धा किलो मैदा चाळून घ्या. त्या मध्ये मीठ , बेकिंग सोडा , बेकिंग पावडर  टाका . नंतर साधारण १ मोठी वाटी दही घ्या त्यामध्ये १ मोठा चमचा रवा भिजवा. हे मिश्रण ५-१० मिनिटे तसेच झाकून ठेवा. एका भांड्या मध्ये २ कप दूध गरम करा त्यामध्ये १ चमचा साखर विरघळत ठेवा .



आता रवा भिजवलेले मिश्रण पिठात ओता . ते संपूर्ण पिठामध्ये मिसळून घ्या . नंतर साखर विरघळवलेले दूध थोडे थोडे घालून घट्ट कणिक मळा .



जर पीठ अजून कोरडे वाटत असेल तर गरम दूध घालून सर्व पीठ मळून मऊ होईपर्यंत घोळून घ्या .

मळलेल्या पिठाच्या गोळ्यावर सुती  भिजवलेले कापड टाका . हे पीठ शक्य असल्यास गरम जागेत ठेवा.
साधारण १ तास पीठ भिजवल्या  नंतर नान बनवायला  घेऊ  शकता.



नान बनवण्यासाठी :


प्रथम सर्व पिठाचे गोळे बनवून ठेवा. गोळे साधारण चपातीच्या गोळ्या पेक्षा थोडे  लहान असायला पाहिजे.

पोळपाटावर मैद्याच्या गोळ्याची चपाती मैदा लावून लाटा . चपाती जास्त पातळ लाटू नये व जास्त जाड हि ठेऊ नये . चपातीच्या एका बाजूला काळे तीळ व कोथिंबीर घालून लाटण्याने दाबून घ्या . नंतर चपाती उलटी करून त्याला दुसऱ्या बाजूने मिठाचे पाणी लावा.
लोखंडाचा तवा तापवायला ठेवा . तवा तापला कि त्यावर पाण्याची बाजू तव्यावर येईल अश्या पद्धतीने नान तव्यावर टाका . थोड्याच वेळात नानला वरच्या बाजूला फुगे (बबल्स ) येतील व खालील बाजू भाजली जाईल. नंतर तवा उचलून गॅसवर उलट धरून नान  भाजा . भाजलेली नान तव्यावरून काढा आणि त्याला बटर  लावा.


टीप १ : बेकिंग सोडा नसेल तर इनो वापरू शकता. बेकिंग पावडर ऑपशनल आहे.   तव्याला कोणत्याही  प्रकारचे तेल , बटर लावू नये . नान  ला एका बाजूने पाणी लावले कि नान  तव्याला चिटकून बसते व दुसऱ्या बाजूने गॅसवर तवा  उलट धरून भाजता येते.


टीप २: गार्लिक बटर नान साठी लसणाचे छोटे छोटे तुकडे नान ला लावून त्यावर काळे तीळ , कोथिंबीर घालून लाटण्याने प्रेस करावे व वरील प्रकारे नान भाजावे. 

  तवा बटर नान

या प्रमाणे नान तवा उलट धरून गॅसवर भाजणे 


तुम्ही हि रेसिपि नक्की करून पहा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया खाली असलेल्या कंमेंटबॉक्स मध्ये लिहून कळवा. 

धन्यवाद !

Saturday, 9 May 2020

परवलीचा शब्द

आई .... सांग ना  वीरा दि ला ? अगं ही  मला तिच्या फोन चा पासवर्ड सांगत नाही.
मला आपले काल बर्थडे पार्टी मध्ये  काढलेले फोटो पाहायचे आहेत. 

जोर जोरात ओरडून आई कडे तक्रार करणारा विनू वीराचा मोबाईल फोन घेऊन आईच्या दिशेने पळत सुटला होता. सकाळची वेळ होती.... वीरा अजून अंथरुणातच लोळत पडली होती. आजी देवघरात देवपूजेत मग्न होती आणि आई स्वयंपाक घरात नाश्ता बनवण्यात गढून गेली होती. वीराचे बाबा ऑफिस ला निघून गेले होते. 
धावणाऱ्या विनूला मधेच थांबवत आई म्हणाली ...

काय रे विनू लहान आहे का तुम्ही ? सकाळी सकाळी किती गोंधळ करता....  आई . 

आई सांग ना ग त्याला माझा फोन घेतला आहे विनूने.... वीरा. 

विनू कशाला घेतला आहे तिचा फोन ? आई 

तिनी फोन ला किती पासवर्ड घातले आहेत बघ ना ? विनू 

तुला रे काय करायचं आहे ? वीरा 

मला काल झालेल्या बर्थडे पार्टीचे फोटो बघायचे आहेत . विनू 

मी दाखवते तुला !! दे माझा फोन.... वीरा 

नाही !! मला पासवर्ड सांग आधी ? विनू 

विनू आर  यु मॅड ? पासवर्ड काय सांगण्या साठी घालतात का ? ..... वीरा 

आई बघ ना! दीदी कशी बोलते. मी काय हिचा डेटा चोरी करणार आहे का ? विनू 

शांत बसा रे दोघे पण ! सकाळी सकाळी काय पासवर्ड पासवर्ड लावलं आहे . आई 

सर्व गोंधळ ऐकून देवघरातून बाहेर येणारी आजी हातावर लाडूचा प्रसाद टेकवत म्हणाली . बाळांनो काय झालं? का बरे भांडण करत आहे ?

त्यावर विनू आजीचा लाडका लगेच आजीच्या पाठी लपत बोलला बघ ना अगं आजी दीदी मला तिच्या फोन चा पासवर्ड सांगत नाही.

आता धार्मिक असलेली आजी फारशी शिकलेली नव्हती त्यामुळे कदाचित तिला यांचं नेमकं कशावरून भांडण चालू आहे हे कळतं नव्हतं. 

बरं या गोष्टी वर आपण नंतर बोलूया ! आधी विनू तू वीराचा फोन तिला परत कर  . असे बोलून आजीने वाद थांबवला . फोन मिळताच वीरा विनूला वाकुल्या दाखवत आपल्या खोलीत निघून गेली. आपली बाजू कोणीही घेतली नाही असे समजून ओशाळलेला विनू बागेत जाऊन बसला. सर्वांचं काम आटोपल्यानंतर दुपारचं जेवण झालं. गर्मीचे दिवस असल्यामुळे सर्व मंडळी बागेत आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसली. आजी आणि आई शेंगा फोडत बसल्या होत्या . वीरा फोन मध्ये गुंग झाली होती. विनू फारसा बोलत नव्हता. सकाळी झालेला प्रकार त्याला रुचला नसल्यामुळे तो अजून त्याच भानात होता. 

आता आजीने विनूकडे पाहून सकाळी झालेला प्रकार विचारायला सुरुवात केली. विषय निघताच विनूची कळी खुलली आणि तो हि कान टवकारून ऐकू लागला. आजी मुद्दाम आईला विचारू लागली . 

 काय गं ! सकाळी काय गोंधळ चालला होता. आजी 

आईने हि आज्ञाधारक सुने प्रमाणे तिची सेवा बजावत झालेला सर्व प्रकार अगदी जसाच्या तसा सांगितला. आता आजी प्रश्न विचारणार पक्क होत. 

वीरा कसला पासवर्ड टाकला आहेस फोन ला ? आजी 

काही नाही ग आजी ? वीरा 

वीराने विषय टाळण्यासाठी उत्तर दिल आणि पुन्हा फोन मध्ये डोकं घालून बसली. 

मग आजी म्हणाली आम्ही म्हातारी माणसं आम्हाला काय कळतंय या फोन मधलं . पण माझ्या एवढे म्हातारे लोक सुद्धा  फोन वापरतात . मी पहाटे फिरायला जाते तेंव्हा बरीच मंडळी गळ्यात फोन अडकून फिरायला येतात. 
हे ऐकून वीरा आणि विनूला आजीची गम्मत वाटली आणि त्यांना आपली आजी आता या मोबईल फोन आणि पासवर्ड बद्दल खडा न खडा माहिती घेणार त्यांना कळून चुकले.

आजीचा  नवीन जगात काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा नेहमीच अट्टाहास असतो. ती तिच्या अध्यात्मकतेच्या गोष्टी जश्या आम्हाला सांगते तशात नवीन तंत्रज्ञानाच्या गोष्टीही ती आमच्याकडून आत्मसात करत असते .

मग ती पुढे बोलू लागली . आमच्या काळात असे फोन वगैरे नव्हते. आम्ही आमची खुशाली पत्र लिहून कळवत. त्यासाठी बरेच दिवस लागत. मग त्यांचा संदेश येईपर्यंत बरीच वाट पाहावी लागायची . पण आता हे काम अतिशय सोपं झालं आहे या मोबाईल फोन द्वारे. क्षणाचा ही  विलंब न करता सर्व काही घरात बोलल्या प्रमाणे समोरच्याला आपण आपलं बोलणं सांगू शकतो आणि तो हि लगेच त्यावर प्रतिउत्तर देतो. काय म्हणायचं या मोबाईल फोन ला . हा तर साक्षात गणपतीने मानवाला दिलेला प्रसाद असावा .  ती तिच्या आध्यात्मकतेच्या गोष्टीला अनुसरून बोलू लागली.

रुसून बसलेला विनू आता त्याचा अबोला सोडून बोलू लागला....

आजी हा गणपतीचा प्रसाद नाही ग ! मोबाईल फोन हा मानवानेच तयार केला आहे. आधी पत्राद्वारे संभाषण करत असताना खूप वेळ खर्च व्हायचा पण या मोबाईल फोन मुळे आता खूप वेळ वाचतो आणि आपण हा मोबाईल कुठेही घेऊन जाऊ शकतो . आता हे तर तुला नव्याने सांगायला नको . तुला माहित आहे कि हे! मी सांगितलं आहे तुला आधी !!

फोन मध्ये व्यस्त असलेली वीरा आता आजीला नेमकं काय जाणून घ्यायचं आहे हे समजून म्हणाली ...
अरे विनू आजीला पासवर्ड म्हणजे काय ? हे जाणून घ्यायचं आहे . तू आता तिला मोबाईल च काय सांगत आहेस ? ते तिला माहिती आहे .

मग आजीने हि आता भोळेपणाचे सोंग सोडून थेटच विचारलं ...

काय आहे हा पासवर्ड ? आजी

त्यावर वीरा म्हणाली पासवर्ड म्हणजे एक गुपित कोड असतो किंवा पॅटर्न असतो आपली माहिती चोरी होऊ नये म्हणून तो मोबाईल फोन मध्ये टाकला जातो . म्हणजे तुमचा फोन सुरक्षित राहतो.

आजी गोंधळून गेली तिला वीरा च बोलणं कळालं नव्हतं. तिचा गोंधळलेला चेहरा आणि चेहऱ्यावरील प्रश्नचिह्न पाहून विनू म्हणाला.

पासवर्ड म्हणजे परवलीचा शब्द !!

हे ऐकताच आजी म्हणाली परवलीचा शब्द !! तो तर शिवाजी महाराज्यांच्या काळात गुप्तहेर वापरायचे. शत्रूच्या छावणी मधील गुपित माहिती काढून पुढे महाराजांच्या गडावर सुरक्षित पोहचावी म्हणून परवलीचा शब्द वापरायचे.

पण मोबाईल फोन मध्ये परवलीचा शब्द वापरायला मोबाईल फोन मध्ये पण शत्रूचे गोठ आहेत का ? आजी हसत हसत बोलली .

त्यावर वीरा म्हणाली अगं आजी ! मोबाईल फोन चे जसे फायदे आहेत तसे दुष्परिणाम सुद्धा आहेत. मग हा परवलीचा शब्द कामाला येतो बघ ! वीरा

तो ग अन कसा ? नीट  समजेल अश्या भाषेत सांग कि ?  आजी

हे बघ ! आता बाबा आपल्या घरी बसून टीव्ही चे , फोन चे , विजेचे बिल मोबाईल फोन वरून भरतात कि नाही ? विनू

हो रे आज काल तो  घरीच बसून ऑनलाईन का बिनलाईन म्हणतात तसाच बिल भरतो . आजी

तेच ग ! ऑनलाईन बिल भारतात म्हणजेच फोन मधून ते डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या खात्या मधून पैसे काढून वीज कंपनी , मोबाईल कंपनी ला देतात आणि बिल भरतात. त्याची पावती सुद्धा मोबाईल मध्ये मिळते. विनू

मग जर तुमच्या बँकेच्या खात्याचा तपशील दुसऱ्या कोणाच्या हाती लागला तर ... वीरा

बापरे ! कोणीही आपल्या परस्पर आपल्याच खात्यातून पैसे काढून घेऊ शकते . आई

म्हणून परवलीचा शब्द उपयोगी आहे . तो फक्त आपल्यालाच माहित असणार . परवलीचा शब्द असेल तर तुमच्या खात्याचा तपशील कोणीही घेऊ शकत नाही . विनू

आता हे झालं बँकेचं ! असे बरेच ऑनलाईन व्यवहार असतात ज्या मध्ये तुम्हाला तुमचा परवलीचा शब्द वापरून काम करायचं असत . वीरा

 लॅपटॉप, कॉम्पुटर किंवा मोबाईल या वस्तू मोठ्या मोठ्या कंपनी मध्ये काम करणाऱ्यांना कंपनी तर्फे मिळतात. त्या वस्तू  फक्त त्यांनी कंपनी च काम करण्यासाठीच वापरायच्या असतात . त्याला सुद्धा परवलीचा शब्द असतो . कंपनी ची माहिती बाहेर दुसऱ्या कंपनी ला कळू नये यासाठी घेतलेली ती खबरदारी असते.  विनू

किती महत्वचा आहे परवलीचा शब्द !! आई

आणि शत्रूच म्हणशील तर या मध्ये शत्रूच नाव आहे हॅकर ! विनू

शिवाजी महाराजांच्या काळात शत्रू बरेच होते त्यांची उघड लढाई होत असे . आदिलशाही, निजामशाही आणि मोघलाई हे त्यावेळचे शत्रू होते. पण आता या मध्ये शत्रू आहेत हॅकर . हे हॅकर तुमच्या आमच्या सारखीच माणसं  असतात. त्यांना आपण ओळखू शकत नाही. छुप्या रीतीने ते आपला परवलीचा शब्द चोरून आपले पैसे ढापू शकतात. सोसिअल मीडिया वर आपली बदनामी करू शकतात. असे अजून बरेच गैरप्रकार करू शकतात . असे करण्यासाठी त्यांना पैसे मिळतात. वीरा

सोशिअल मीडिया म्हणजे ? आजी

सोशिअल मीडिया म्हणजे असे अँप्लिकेशन असतात जे वापरून  दूर देशातील लोकांनसोबत तुम्ही मैत्री करू शकता त्यांच्या सोबत गप्पा मारू शकता. तुम्ही तिथे काय चाललं आहे हे विडिओ कॉल करून बघू शकता. असे करण्या साठी तुम्हाला इंटरनेट सोबत कनेक्ट असले पाहिजे . विनू

अग! आपण आत्यासोबत नाही का इथे बसून बोलत ते. ती आपल्याला व्हाट्सअप कॉल करते. ते म्हणजे सोसिअल मीडिया . या सोशिअल मीडिया मुळे आपण जगाशी जोडले जातो . वीरा

पण याला कशाला परवलीचा शब्द लागतो. आजी

आता समजा मी वीरा दीदीला काही माझं गुपित सांगत असेल , काही महत्वाच्या कागतपत्रांचा फोटो तिला पाठवला असेल आणि तो गुपित ठेवायचा असेल तर परवलीचा शब्द वापरून मी तो गुपित ठेऊ शकतो. विनू

असं आहे तर ! आजी

पण मग फोटो साठी कशाला परवलीचा शब्द वापरला आहेस तू वीरा आणि तो पण विनू साठी ?

मी विनू साठी च म्हणून नाही वापरला . मी कॉलेज मध्ये जाते तिथे माझे खूप सारे मित्र-मैत्रिणी आहेत . कोणी चुकून माझा मोबाईल फोन घेऊन फोटो पाहिले. माझ्या फोन मधून माझे फोटो चोरी करून त्याचा गैरउपयोग केला तर ! कोण चांगलं आणि कोण वाईट हे तोंडावर लिहिलं नसत . सर्वात जवळचे लोकच फसवत असतात असे आपण बऱ्याच टीव्ही मालिकेत पहिले आहे. त्यासाठीची हि खबरदारी हवं तर समज. वीरा

पण दीदी मी तर यातलं काहीच करणार नव्हतो . तू मला पासवर्ड का नाही सांगितला ? विनू
अरे परवलीचा शब्द कोणाला सांगण्यासाठी असतो का ? आजीला विचार महाराज्यांच्या काळात त्याला किती महत्व होत ? वीरा

हो ग ! पण विनू आपलाच आहे. आजी

तसं नाही ग विनू लहान आहे आणि त्याला माझा परवलीचा शब्द कळला तर तो त्याच्या न कळत माझा  कोणताही महत्वाचा डेटा डिलिट करू शकतो . पॉप उप होणाऱ्या संदेशांना रिप्लाय करू शकतो . वीरा

बरं ठीक आहे तुला अजून १ परवलीचा शब्दाचं सांगतो . या वरून बरेच लोकांची भांडण होतात. आता दीदीच आणि माझंच बघ ना झालं ना भांडण ? असच   पासवर्ड सांगत नाही म्हणून भांडण होतात . कधी कधी हि भांडण इतकी विकोपाला जातात कि घटस्फोट सुद्धा होतात . प्रत्येकाला स्वतःची privacy महत्वाची आहे . विनू

मग ते पॅटर्न च काय म्हणत होती तू ? कसला पॅटर्न असतो ग वीरा ? आजी

परवलीचा शब्द  खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते तुम्ही आकडे, शब्दात किंवा पॅटर्न मध्ये ठेऊ शकता . लॅपटॉप किंवा मोबाईल फोन मध्ये ते आकडे , शब्द किंवा आकृतीच्या (पॅटर्न ) च्या स्वरूपात असतात . संशोधन केंद्रामध्ये एखाद्या खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी सुद्धा परवलीचा शब्द असतो. तो आकडे , आकृती , शब्द,  हाताचा पंजा, अंगठ्याचा ठसा, डोळे किंवा अख्खा चेहरा हे परवलीचा शब्द म्हणून वापरतात. वीरा

डोळे, चेहरा ,हाताचा पंजा हे कसं काय ग परवलीचा शब्द असेल ? आजी

अग आता हॅकर्स इतके हुशार आहेत कि ते आकडे, आकृती आणि शब्द लगेच चोरू शकतात. म्हणून हाताचा ठसा, अंगठ्याचा ठसा किंवा डोळ्याचे बुबुळ आणि चेहरा हे सहज चोरू शकत नाही म्हणून हे सुद्धा परवलीचा शब्द असतात. यालाच बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन असं म्हणतात . विनू

आणि हो तुमचा आवाज हा सुद्धा परवलीचा शब्द म्हणून वापरू शकता. वीरा

बापरे ! काय हि प्रगती झाली आहे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये !! आजी

आजी ! हे  काहीच नाही अजून बरच काही आहे . पण आज साठी एवढं पुरे आहे !

चला आता ४ वाजले चहा पिऊया ? आई 

हो ग ! कसा वेळ गेला कळलंच नाही . आजी 

सर्वजण चहा प्यायला  निघून जातात . पण काय मंडळी तुम्ही तुमचा परवलीचा शब्द गुपित ठेवत आहे ना ? 

बँक मधून येणाऱ्या फोन वरून तुम्ही तुमची माहिती सांगत तर नाही ना ?  अश्या कोणत्याच कॉल ला प्रतिउत्तर देऊ नका. ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुम्ही तुमचा परवलीचा शब्द सारखा सारखा बदलत रहा . 

अलर्ट रहा ! सावध रहा !

धन्यवाद ! 















Wednesday, 6 May 2020

सोयाबीनचे व्हेज कबाब


आज सोयाबीनचे व्हेज कबाब ब्रेकफास्ट ला बनवशील का? मी माझ्या मित्राच्या घरी खाल्ले आहेत. खूप छान चव होती . असे बोलून वैभव त्याच्या खोली मध्ये निघून गेला.  वैभवची आई  मात्र स्वयंपाकघरात काहीतरी कामात व्यस्त होती. ती कोणत्या तरी विचारात असावी. तिनी त्याची मागणी ऐकली होती पण त्याकडे तिचे लक्ष्य नव्हते. कदाचित कामामुळे थकून गेली असावी. वैभव थोड्या वेळाने अंघोळ आटपून स्वयंपाक घरात आला आणि त्याने ग्लास वाजवून आईला भानावर आणले.

काय गं ! कसला विचार करत आहेस? वैभव

काही नाही रे ! आई


अगं सांग ना ? कसल्या विचारात आहेस? वैभव


अरे ! आपण रोज जेवण बनवतो त्यामध्ये कोणते पोषण तत्व असतात आपल्याला माहित नसते. आपण रोज ठराविक भाज्या बनवतो आणि त्या खातो . पण त्या भाजी पासून आपल्या शरीराला कोणते घटक उपयुक्त आहेत हे कोणालाच माहित नसते . किमान मला तरी माहित नाही. आई


हो ग! तुझं अगदी बरोबर आहे . वैभव


आणि अरे तुम्ही मुलं आजकाल हॉटेल्स मध्ये नवीन पदार्थ खाता आणि घरी येऊन तेच पाहिजे मागणी करता. आई


रोज त्याच त्याच भाज्या खाऊ वाटत नाहीत.  बोअर होत ग ! ट्राय समथींग न्यू मॉम !! 


असं  बोलून वैभव निघून गेला. वैभव ची आई मात्र अजून विचारात होती. या मुलांना त्याच भाज्या फक्त नवीन पद्धतीने खाण्यास दिल्या कि त्यांना त्या स्पेसिअल वाटत असतात.
वैभव ची आई आता सोयाबीन या विषयात गढून गेली. तिला ४ च्या चहा सोबत सोयाबीन चे कबाब बनवायचे होते ना !


सोयाबीन ! याचे शात्रीय नाव आहे  ग्लिसाइन  मॅक्स.  जगातील सोयाबीन चे ६०% उत्पादन तसे तर अमेरिका मध्ये होते. आणि भारताचं म्हणाल तर सोयाबीन हि कडधान्य मध्य प्रदेशात जास्त पिकवल जात . तुम्हाला माहिती आहे का ? भारतामध्ये सोयाबीनचे रिसर्च सेंटर सुद्धा आहे. मध्य प्रदेश मध्ये इंदूर या गावी आहे ते ! 


कडवटपणा दूर करून सोयाबीन ची कणीक वापरून पोळ्या, ब्रेड बिस्कीट, नानकटाई इत्यादी पदार्थ बनवता येतात. सोयाबीनची डाळ हि शेव, चकली व मिसळ बनवण्यासाठी उपयुक्त आहे. सोयाबीनचे खाद्य तेल आपण वापरत आहेच . या तेलाच्या बऱ्याच जाहिराती तुम्ही टीव्ही वर सुद्धा पहिल्या असतील. सोयाबीन पासून बायोडिझेल , पेंढ तयार केली जाते. आता आज सोयाबीनचे व्हेज कबाब सुद्धा बनणार आहेत बरं  का !

 सोयाबीन मध्ये ३८-४०% प्रमाणात प्रोटीन असतात जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात. शरीराचा घेर कमी करतात. २१% कार्बोहाइडेंट असतात जे उच्च रक्त दाब रोखण्यासाठी कारणीभूत आहे.  लेसिथीन हे स्मरणशक्ती वाढवणारा घटक सोयाबीन मध्ये असतो . तसेच व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी, लेक्टिन, फायबर इत्यादी पोषक घटक सोयाबीन मध्ये असतात. सोयाबीन मध्ये असणारे आयसोप्लेबोंस नामक रसायन शरीराचा ऑस्टीयोपोरोसीस या व्याधीपासून बचाव करण्यास सहायक आहे. लहान मुलांच्या योग्य शारीरिक विकासासाठी तसेच नखांची व केसांची  वाढ नीट होत नसल्यास आहारामध्ये सोयाबीनचा समावेश करावा. फिट्स येत असल्यासही सोयाबीनच्या सेवनाने गुण येऊ शकतो. यामध्ये असलेले मॅग्नेशियम शांत निद्रा येण्यास सहायक आहे.
 बापरे !!!  किती सारे उपयुक्त गोष्टी आहेत या सोयाबीनच्या. तुम्हीही नक्की सोयाबीनचा उपयोग तुमच्या आहारात करा.

अरे देवा !. ३.३० वाजले वैभव येईल आता मला सोयाबीनचे व्हेज कबाब बनवायचे आहेत.

साहित्य : सोया चंक (सोयाबीनचे गोळे) , २ मध्यम आकाराचे कांदे, २-३ मिरच्या, २ इंच लांब आल्याचा तुकडा, ६-७ लसूण पाकळ्या, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, जिरे पूड, काळी मिरे पूड, धने पावडर, मीठ, हळद, मैदा, कॉर्न फ्लोअर किंवा आरारोट(तांदूळ ३ दिवस भिजवून दळलेले तांदळाचे पीठ ), तेल इत्यादी .

कृती : प्रथम सोयाबीनचे गोळे (सोया चंक) गरम पाण्यात भिजत ठेवा म्हणजे ते मऊ होतील. तोपर्यंत मिक्सर च्या भांड्या मध्ये  २ मध्यम आकाराचे कांदे, २-३ मिरच्या, २ इंच लांब आल्याचा तुकडा, ६-७ लसूण पाकळ्या, कोथिंबीर/कढीपत्ता हे सर्व बारीक करून पेस्ट बनवा. सोयाबीन मऊ झाले असतील तर पाण्यातून पिळून काढा. सोयाबीन पाण्यातून काढताना शक्य तेवढे पाणी पिळून काढा म्हणजे मिश्रण पातळ होणार नाही. आता पिळून काढलेले सोयाबीनचे गोळे मिक्सर मध्ये पेस्ट केली आहे त्यामध्येच  घालून तसेच बारीक करा. म्हणजे कांदा  लसूण आलं यांच्या सोबत सोयाबीन छान बारीक होईल. आता बारीक केलेली पेस्ट एका भांड्यात काढून घ्या.  त्या पेस्ट मध्ये  लाल मिरची पावडर, चमचा जिरे पूड, काळी मिरे पूड, धने पावडर, मीठ, हळद, मैदा, कॉर्न फ्लोअर किंवा आरारोट(तांदूळ ३ दिवस भिजवून दळलेले तांदळाचे पीठ ) तुमच्या अंदाजाने घाला. कारण सर्वांची पद्धत व चव वेगळी असते. ते मिश्रण हाताने छान हलवून घ्या. आता कढई मध्ये तेल गरम करण्यासाठी  ठेवा. तेल गरम होईपर्यंत तुमच्याकडे कबाब बनवण्यासाठी रॉड असेल तर ठीक नसेल तर शिसपेन्सिल वर हि तुम्ही कबाब बनवू शकता . शिसपेन्सिल घ्या ती पाण्याने ओली करा . तुमचा हात पाण्यात बुडवून घ्या व पेस्ट चा गोळा करून पेन्सिलीभोवती उभ्या आकारात गोलाकार लावा मधून मधून पाण्याचा हात घेऊन  आकार द्या नंतर अलगत पेन्सिल काढून घ्या . तयार झालेला कबाब मध्यम आचेवर तळून घ्या. अश्या प्रकारे बाकीचे पीस बनवा व तळून घ्या. हे कबाब तुम्ही टोमॅटो सॉस, शेजवान चटणी किंवा चिंचेची चटणी सोबत खाऊ शकता.

टीप : मिश्रण जर पातळ होत असेल तर मैदा किंवा कॉर्न फ्लोअर चे प्रमाण वाढवू शकता. तुमच्या कडे कॉर्नफ्लोअर नसेल तर बेसन पीठ वापरू शकता. कबाब शक्य तेवढा मंद किंवा मध्यम आचेवर भरपूर वेळ टाळून घ्या म्हणजे आतून तो नीट भाजेल. 




सोया चंक 

 सोयाबीन कबाब 

रेसिपिसाठी फक्त अर्धा तास लागतो तुम्ही नक्की घरी बनवा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. 

धन्यवाद !