पनीर हा दुधापासून बनवला जाणारा पदार्थ सर्वांनाच माहित आहे आणि बऱ्याच लोकांना पनीर पासून बनवलेले पदार्थ आवडतात देखील. पनीर पासून पनीर पुलाव , पनीर मसाला, पनीर टिक्का, पालक पनीर, मटार पनीर, पनीर भुर्जी , कढाई पनीर, पनीर बिर्याणी, पनीर मक्खनवाला , हैद्राबादी पनीर मसाला इत्यादी इत्यादी बरेच पदार्थ बनतात. पनीर हा फॅट्स, कॅलशिअम , व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन चा प्रमुख स्रोत आहे. आरोग्यासाठी उत्तम मानले जाणारे पनीर तुम्ही अगदी रोजही खाऊ शकता कारण या मधील प्रथिण्यांची मात्र हि हिरव्या पालेभाज्यांमधील प्रथिने इतकीच आहे. पनीर गाई किंवा म्हैशीच्या दुधापासून बनवू शकता. कमी फॅट्स असलेल्या दुधापासून बनवलेले पनीर वजन कमी करणे आणि स्नायू बळकट करणे साठी वापरतात. अफगाणिस्तान , मध्य आशिया, अमेरिका व युरोप या देशात पनीर चे उत्पादन जास्त प्रमाणात होते तर भारतात काश्मीर या थंड हवेच्या ठिकाणी पनीर जास्त प्रमाणात खाल्ले जाते. ज्या लोकांना मांस खाणे पचत नसेल किंवा आवडत नसेल लोकांनसाठी पनीर हा बेस्ट ऑपशन आहे. मग चला तर जास्त वेळ न खर्च करता आपण घरीच फ्रेश आणि healthy पनीर बनवूया !!!!!
साहित्य : दूध, लिंबू आणि पाणी.
पनीर किती काळ साठवून ठेवणार आहे या नुसार पनीरवर वेगवेगळी प्रक्रिया केली जाते . दूध नासवण्यासाठी लिंबू, व्हिनेगर किंवा सायट्रिक ऍसिड व योगर्ट वापरले जाते.
नक्की करून पहा!!!
धन्यवाद !!
साहित्य : दूध, लिंबू आणि पाणी.
कृती : पनीर बनवण्यासाठी दुधाला एक उखळी येईपर्यंत तापवणे. साधारण एक लिटर दुधाचे पनीर अंदाजे पावकिलो बनते.
तापलेले दूध थोडे थंड होईपर्यंत तीन मध्यम आकाराच्या लिंबाचा रस काढून गाळून घ्या. जेवढा रस आहे तेवढेच पाणी लिंबाच्या रसामध्ये घालून मिश्रण तयार करा . आता लिंबूचा रस थोडा थोडा घालत दूध हलवत रहा. दूध फाटेपर्यंत दुधात लिंबूचा रस घाला. दूध तरीही फाटले नाही तर दूध फाटेपर्यंत दूध गरम करा . आता दूध फाटून पाणी वेगळे झालेले दिसेल. नंतर गाळणीच्या सहाय्याने दूध गाळून घ्या व गाळणीमध्येच पाणी टाकून दूध धुऊन घ्या. दूध जास्त धुतले तर त्यामधील प्रोटीन निघून जातील यासाठी थोडेच पाणी घालून दूध धुऊन घ्या म्हणजे लिंबाच्या रसाचा वास येणार नाही .
आता गाळणी मधील दूध सुती रुमालामध्ये घालून सर्व पाणी पिळून घ्या व त्याची घट्ट पुरचुंडी बांधून रुमाल लटकावून ठेवा. मी सिंकच्या नळाला हा रुमाल बांधून ठेवला होता त्यामुळे जे जास्तीचे राहिलेले दुधातील पाणी निघून गेले. साधारण एक तास झाल्यानंतर रुमाल काढून बघा तुम्हाला दुधाचा घट्ट गोळा दिसेल. आता हा गोळा फोडून घ्या आणि त्याला वडी प्रमाणे चौकोन आकार द्या. त्यानंतर हा आकार तसाच रुमालामध्ये घडी करून बंद करा आणि त्यावर जड वजन ठेवा. तुम्ही दगडाचा खलबत्ता, पाण्याचे भांडे हि ठेऊ शकता.
साधारण ४-५ तासानंतर रुमाल उघडून पाहिलं तर तुम्हाला पनीरची वडी दिसेल. ही वडी सुरीच्या सहाय्याने कापून छोटे छोटे तुकडे करा. मी इथे स्टेप बाय स्टेप कृतीचे फोटो देत आहे म्हणजे तुम्हाला ही कृती लक्षात येईल.

स्टेप १: एक लिटर तापवलेले दूध
स्टेप २: लिंबू आणि पाण्याचे मिश्रण
स्टेप ३: लिंबाचा रस अश्या प्रकारे घालून दूध हलवत रहा.
स्टेप ४: दूध फाटेपर्यंत लिंबाचा रस घाला आणि अश्या प्रकारे दूध फाटून दूध आणि पाणी वेगळे होईल.
स्टेप ५: फाटलेले दूध सुती रुमालामध्ये बांधून १-२ तास अश्या प्रकारे टांगून ठेवा.
स्टेप ६: नंतर सुकलेले दूध फोडून त्याला चौकोन आकार द्या व रुमालात ठेऊन अशी घडी घाला.
स्टेप ७: त्या घडी वर वजन ठेवा.
स्टेप ८: ४-५ तासांनी अशी पनीरची वडी झालेली दिसेल.
स्टेप :९ सुरीच्या साहाय्याने पनीरचे छोटे छोटे तुकडे करा.
नक्की करून पहा!!!
धन्यवाद !!

No comments:
Post a Comment