साहित्य : गव्हाचे पीठ, ओवा , लाल मिरची पावडर , मीठ , कोथिंबीर, तेल
कृती : प्रथम एका ताटामध्ये अंदाजे २ कप गव्हाचे पीठ चाळून घ्या. नंतर पिठामध्ये अर्धा छोटा चमचा ओवा , एक मोठा चमचा लाल मिरची पावडर , चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि २ चमचे थंड तेलाचे मोहन घाला सर्व पीठ हाताने मिक्स करून घ्या . पिठाचा गोळा बनतो का पहा . नंतर थोडे थोडे पाणी घेऊन पिठाची घट्टसर कणिक मळा . १० मि. कणिक तशीच ठेऊन द्या. तोपर्यंत गॅस वर तेल गरम करत ठेवा . आता कणकीचे चपाती एवढे गोळे बनवून घ्या व त्याची पातळ चपाती लाटा . ३ चपात्या लाटल्या नंतर एका चपातीला एका बाजूने तूप लावा व त्यावर दुसरी चपाती ठेवा , नंतर त्याही चपातीला वरून तूप लावा व त्यावर तिसरी चपाती ठेवा त्याला सुद्धा वरून तूप लावून घ्या. त्या तिन्ही चपात्या गुंडाळून लाथिम्बी बनवा. लाथिम्बी मळून घोळून घ्या व त्याचे सुरीने छोटी पुरी बनेल एवढ्या आकाराचे तुकडे पाडा. नंतर एक एक तुकडा घेऊन गव्हाच्या पिठाच्या साहाय्याने लाटा . छोट्या पुरी प्रमाणे आकार येईल असा पातळ गोळा लाटून झाला कि गरम तेलात मंद आचे वर तळून घ्या. मठरी थंड झाल्यानंतर चहा सोबतही खाऊ शकता.
टीप: मठरी मंद किंवा मध्यम आचे वरच भाजा . चपातीला तूप लावल्यामुळे त्याला पडदे सुटतात व ते कुरकुरीत होतात. मठरी खूप दिवस टिकते त्यामुळे तुम्ही एकदम बनवून साठवून ठेऊ शकता. स्टेप बाय स्टेप कृती खालील प्रमाणे....
स्टेप १. साधारण एवढ्या आकाराची गोल चपाती लाटून घ्या.
स्टेप २. चपातीच्या वरच्या बाजूला तूप लावा.
स्टेप ३. त्यावर दुसरी चपाती ठेऊन त्याला वरून तूप लावा नंतर त्यावर तिसरी चपाती ठेऊन पुन्हा तूप लावा .
स्टेप ४. चपातीला हळू हळू गुंडाळून लाथिम्बी बनवा.
स्टेप ५. अश्या प्रकारे गुंडाळा करून थोड घोळून पातळ बनवा.
स्टेप ६. सुरीच्या सहाय्य्यने छोटे तुकडे पाडा .
स्टेप ७. एक गोळा लाटा व एवढ्या आकाराची पातळ पुरी बनवा
स्टेप ८. मंद व मध्यम आचेवर पुरी तळूनघ्या.
मठरी हा ब्रेकफास्टला खाण्यायोग्य खूप छान पदार्थ आहे. गहूचे पीठ वापरले असल्यामुळे आरोग्यासाठी चांगला आहे व पचनक्रिये साठी सुद्धा हलका आहे.
तर तुम्ही नक्की घरी बनवा या रेसिपियसाठी फक्त १५ मिनिटे पुरे आहेत .
धन्यवाद !










Lay bhari
ReplyDelete