आज खूपच दिवस वाईट गेला ! छे ! खूप कंटाळा आला आज !!
मोबाईल , लॅपटॉप , नेटफ्लिक्स , व्हाट्सअप, फेसबुक , इंस्टाग्राम, ट्विटर , टिक- टॉक, हॅलो सर्व सोशिअल मीडिया चाळून चाळून बोअर झालं. माणूसच असा प्राणी आहे त्याला सारखं बोअर होत. बर बोअर झालय म्हणायची सोय नाही नाहीतर घरचे कामाला जुंपतील ही मनातील भीती त्यापेक्षा तेच तेच व्हाट्सअप बघितलेले परवडलं !! नाही का ?
अहो बोअर होतंय म्हणून काम केलं कि कंटाळा जातो का ? काय माहिती जातही असेल. रिकाम्या माणसांनाच बोअर होत असं घरचे म्हणतात .. पण जर सारखं तेच तेच काम रोजच करायला सांगितलं तर आपल्याला लगेच बोअर होत . हे म्हणजे असं झालं मला कसतरी होतंय आजार झाल्यासारखं ... नेमकं कोणतं औषध द्यावं पेशंटला ? डॉक्टरलाच प्रश्न पडण्यासारखा आजार आहे बुवा.
अगदी तसच बोअर झालं याच असावं.सहसा बोअर झालं की तेच तेच काम नको असत काहीतरी इंटरेस्टिंग वाटावं असं काहीतरी हवं असत. म्हणजे kit -kat ब्रेक हवा असतो म्हणा हवं तर .... प्राण्यांना कधी होत असेल का बोअर ? वैरण खाऊन त्याचा तासानं तास रवंथ करत बसायला तुम्हाला सांगितलं तर किती बोअर होईल ना? जस्ट इमॅजिन !!
अगदी त्याच प्रमाणे बोअर झालं म्हणून सहजच मोबाईल फोन चा कॉन्टॅक्ट लिस्ट चाळत बसले. किती मित्र-मैत्रिणी आहेत पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कोणाला वेळच नसतो एकमेकांशी बोलायला. शाळेत असताना कधी सुट्टी येऊच नये असं वाटायचं कारण फ्रेंड ची गाठ पडणार नाही . फ्रेंड ग्रुप मधील कोणी आजारी पडू नये नाहीतर करमत नाही असं वाटणारी मंडळी हळू हळू कॉलेजला गेली कि त्यांचे तिथे नवीन फ्रेंड्स होतात मग शाळेतील फ्रेंड्स ला कमी वेळ दिला जातो आणि हळू हळू ती मैत्री कमी होते. नाहीशी होत नाही पण अभ्यास आणि बाजूच्या वातावरणात समरस झाल्यामुळे त्या मैत्रीला तेवढा गंध उरत नाही. पुढे जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी बाहेर पडलात तर कॉलेज मधील फ्रेंड्स सुद्धा हळूहळू नाहीसे व्हायला लागतात. असच असत ना सर्वांचं ?
आणि मग लग्न झालं तर विषयच सोडा!! वाढत्या जबाबदाऱ्या आणि नवीन घरचे रुल्स फॉलो करण्यात अर्ध आयुष्य जात आणि तिकडेही नवीन फ्रेंड्स मिळतात मग मागचे फ्रेंड्स हळू हळू कमी होतात . हे म्हणजे आयुष्यच आता असं झालाय पुढचं पाठ आणि मागचं सपाट !
काही फ्रेंड्स कॉम्पिटिशनच्या जगात वावरत असताना बदलून जातात तर काहींना ती जुनी मैत्री जपणे म्हणजे काम वाटू लागते. काही जण कॉन्टॅक्ट मध्ये असतात पण त्यांचं अस्तित्व नसल्या सारखे आणि काही औपचारिक मेसेज करून कोमजलेलं झाड जस तग धरून असत त्याप्रमाणे ती मैत्री टिकवून ठेवतात. असून नसल्याप्रमाणे !!
काही जण कामापुरते फोन कॉल्स करतात तर काही जण खरंच आठवण येते म्हणून कॉल्स करतात. काहींना ओल्ड इस गोल्ड प्रमाणे नवीन फ्रेंड्स पेक्षा जुन्या मैत्रीचंच अप्रूप असत तर काहींना ओल्ड इस ओल्ड फॅशन प्रमाणे न्यू हवं असत. अश्या प्रकारची कंडिशन सर्वांच्याच आयुष्यात येते. काय खरंय ना !! ?
सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होऊन गेले आहेत असो !!
माझ्या आयुष्यात फ्रेन्ड्स या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे असं म्हणता येईल कारण पटकन कोणी विचारलं तुझी बेस्ट फ्रेन्ड कोण आहे तर मला सांगता येत नाही कारण सर्वच फ्रेन्ड्स बेस्ट आहेत. तरीही काही मैत्रिणी किंवा मित्र असे असतात ज्यांचे आपल्या आयुष्यात अस्तित्व नसते पण त्यांचा फार मोठा रोल असतो.
अशीच माझी मैत्रीण किरण . तिचे तसे मला फार मेसेज किंवा कॉल्स नसतात किंवा माझं आणि तीच रोज रोज बोलणंही होत नाही पण मला जेंव्हा खूप एकटं वाटत , खूप बोअर होत किंवा कोणाबरोबर तरी मन मोकळं कराव वाटत तेंव्हा किरण नेहमी फ्री असते. हा निव्वळ योगायोग असेल किंवा ती माझ्या साठी वेळ काढत असेल. मला तसा तिचा खूपच आधार वाटतो .
कॉलेज मध्ये असताना आम्ही मैत्रिणी होतो आणि आमची गावही जवळ जवळ आहेत त्यामुळे आमची मैत्री अजून टिकून आहे. किरण पहिल्यापासून शांत स्वभावाची आणि समजूतदार असल्यामुळे तिचे सल्ले सुद्धा तिच्या स्वभावाप्रमाणेच असतात. प्रत्येक गोष्टीवर तिचा शांत रहा हा सल्ला अगदी अचूक ठरतो. करिअर पासून ते अगदी लग्नापर्यंत चे निर्णय आम्ही एकमेकी चर्चा करून ठरवतो . अर्थात निर्णय स्वतःचा पण एक मोकळी चर्चा प्रत्येक विषयावर नेहमी करायची सवय आहे. काही गोष्टींचे निर्णय झाल्या नंतर जर निर्णय चुकीचा असेल तरीही जज न करण उलट धीर देत राहणं आणि त्यावर उपाय शोधायला मदत करणं फारच थोड्या जणांना जमत असं मला वाटत.
किरण आणि माझं लग्न अगदी १५ दिवसांच्या फरकाने झालं आहे आमच्या दोघींचं संसारिक जीवन सारखच चालू आहे आणि त्यामुळे आम्हाला येणाऱ्या समस्या सारख्याच असल्यामुळे काही गोष्टींना तोंड देणं सोपं होऊन जात. सोलमेट ज्याला म्हणतात ते हेच असावं कदाचित ! एस किरण माझी सोलमेट आहे. प्रत्येकाला अशी मैत्रीण मिळेल असे नाही. मी भाग्यवान आहे मला ती मिळाली. !!!
तशीच पण थोड्या वेगळ्या स्वभावाची आणखी एक मैत्रीण मला माझ्या आयुष्यात लाभली ती म्हणजे नम्रता. कॉलेज मध्ये भेटलेली अस्सल मुंबईकर अशी नम्रता आयुष्याबद्दल फारशी सिरीयस नाही असं जरी वर वर वाटत असल तरी मनातून ती खूप हळवी आणि जबाबदार व्यक्ती आहे.
माझ्या आयुष्यात तिचे स्थान किरण इतकेच महत्वाचे ! खूप कॉमेडी स्वभावाची नम्रता कितीही दुःखात असेल तर हसवून हसून दुःख थोड्यावेळा साठी का होईना विसरायला लावणारी ती माझ्या आयुष्यात कधी आली कळलं नाही. आमची मैत्री पहिल्यापासून टिकून आहे. मनातलं बोलायला लावणारी आणि दुःख विसरायला लावणारी नम्रता तिच्या बऱ्याच गोष्टी शेअर करते. मला हि तिला मदत करायला आवडत त्यामुळे आमचं थोडं जास्तच पटत. नम्रताच्या आणि माझ्या कॉलेजच्या तश्या फारच आठवणी आहेत आजही आठवल्या तरी चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय रहात नाही.
एक किस्सा अजून आठवतो खूप अभ्यास करणारी नम्रता एकदा आमची युनिट टेस्ट चालू असताना रात्र भर अभ्यास करून सकाळी झोपली ती परीक्षेला पोहोचलीच नाही. पेपर झाल्यावर टेन्शन मध्ये असलेल्या नम्रताला आम्ही विचारलं काय झालं पपेरला का नव्हती ? तर चक्क अभ्यास करून झोप लागली असं सांगितलं तेंव्हा आम्ही तिला खूप पिडून काढलं होत आणि मॅडमला देखील तिनी हेच कारण सांगितलं होत. तीच मुंबई स्टाईल मधील बोलणं सर्वांनाच खूप आवडायचं. एक बिनधास्त जीवन कस जगावं हे तिच्याकडे पाहून मला समजत. मी अपसेट असेल तेंव्हा या बयो चा फोन हमखास येतो.
या दोघींचा मला खूप आधार असतोच त्याच बरोबर एकमेकींना चिडवणं , खेचा खेची करणं , एकमेकींचा दुःख सांगून त्यावर सोलुशन जरी नाही निघालं तरी एकमेकींना हसवून थोड्यावेळापुरतं का होईना ते दुःख विसरायला लावणाऱ्या माझ्या मैत्रिणी सात जन्मी मिळाव्यात म्हणून मी कोणत्याही झाडाला फेऱ्या मारायला तयार आहे. या दोघींचा आवडता आणि कॉमन डायलॉग म्हणजे अशू तू वेडी आहेस का ? आणि दुसरा म्हणजे अशू तू ग्रेट आहेस. दोन्ही डायलॉग ऐकून मला बरं वाटत.
तुमच्याही आयुष्यातअश्या मैत्रिणी मित्र असतील ना ? हा लेख मी खास माझ्या आयुष्यात अस्तित्व नसणाऱ्या पण इम्पॉर्टन्ट रोल असणाऱ्या मैत्रिणींसाठी समर्पित करते. त्यांचे आभार मी मानू शकत नाही कारण दोस्ती मै नो सॉरी नो थँक्स होता हैं .

No comments:
Post a Comment