Saturday, 25 April 2020

jeevan pravas bhaag 1

चढ-उतार


 माणसाच्या आयुष्यात खूप चढ - उतार येतात असं मोठ्या माणसांकडून ऐकलं आहे. मी मात्र प्रत्यक्ष पाहिलं आहे माझ्या जीवन प्रवासात भेटलेल्या एका व्यक्तीच्या आयुष्यात.
तर मी आज जी गोष्ट सांगणार आहे किंवा जो चढ-उतार आहे तो आहे विमल च्या आयुष्यात आलेला.

विमल खूप भावनिक, मृदू मनाची, तशीच प्रसंगी खंबीर आणि आयुष्यात फारसं  गंभीर नसणारी मुलगी. आयुष्यात गंभीर नसणं म्हणजे तिच्या आयुष्यात आलेल्या संकटांना तिनी दुर्लक्ष्य करून हा गुण  मिळवला होता.
दिल्ली सारख्या मोठ्या शहरात वाढलेली विमल आई-वडिलांच्या उबदार कुशीत वाढत होती. विमलच्या परिवारा मध्ये विमल, तिचा मोठा भाऊ संजय , आई सुमन आणि वडील सुधीर असा चारच जणांचा सुखी परिवार होता. विमल लहानपणी शाळेत खूप खोड्या करायची त्यामुळे तिच्या आईला सारखं शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटायला जावं लागायचं. विमल अभ्यासात हुशार होतीच पण बाकीच्या (इतर ऍक्टिव्हिटी )मध्ये हि पारंगत होती. खोड्या काढायच्या सोडलं तर वाईट म्हणावा असा कोणताच गुण न्हवता. विमलची आई विमलला खूप समजवायची प्रसंगी मारायची सुद्धा पण तिनी काय खोड्या करायच्या बंद केल्या नाहीत. विमल चे बाबा नेहमी विमलची बाजू घेऊन तिच्या आई सोबत लटके वाद घालत " अरे  विमल तो मेरा कोहिनुर हिरा है । तुम देखणा इक दिन बहुत बडी बनेगी मेरी बेटी । असं बोलून बायकोला गप्प करणारे विमलचे वडील त्यांच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करायचे. 

विमल ची आई देखणी होती शिवाय सर्व कामांमध्ये निपुण असलेल्या विमल च्या आईला नोकरी करून पैसे मिळवावे व संसाराला हात भार लावला असे नेहमी वाटत . पण विमलच्या वडिलांना बायकोने नोकरी करणे पटत न्हवते त्यामुळे सुमन घरीच असायची. विमलच्या आईचे भौतिकशास्त्र विषय मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण झाले होते,तर तिचे वडील एका नामवंत कंपनी चे मॅनेजर होते. पैशाची कमी न्हवती पण बँक बॅलन्स हि न्हवता. येईल तो पैसा घराच्या सुखासाठी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या हौसमौज पुरवण्यात खर्च करायचा असा काहीसा त्यांचा विचार होता. पण विमल ची आई काटकसरी करणारी संसारिक बाई होती तिला विनाकारण पैसे खर्च केलेले पटत न्हवते . पण घरातल्या सुखामध्ये तीही रममाण झाली होती आणि उगाच वाद नकोत म्हणून गप्प राहायची . तिच्या पद्धतीने जिथे काटकसर होईल तिथे ती करायची आणि मनोमन खुश व्हायची. संजय हा आपल्या आई प्रमाणे काटकसर करणारा आणि जपून पैसे खर्च करणारा मुलगा होता, तर विमल तिच्या वडिलांसारखी पैशाची उधळपट्टी करणारी होती . असो पण त्यांचा सुखाचा संसार चालू असताना विमलच्या आयुष्यात एक  शेष नाग डसून तीच बालपण हिरावून घ्यायला आला. 

तिचे बाबा रात्री घरी येत असताना अचानक त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि ते काळ झाले. त्या प्रसंगी तिथे त्यांचं जवळ असं कोणीही  नसल्यामुळे तिच्या आई वर तर डोंगरच कोसळला होता. मुलं लहान त्यात जवळ कोणी नातेवाईक नाही. इतक्या मोठ्या शहरात सुमन एकटी पडली होती. तिला काहीही सुचत न्हवत. डोळ्यात अश्रू, निरागस लहान मुलं , अचानक आलेली संसाराची जबाबदारी या सर्व प्रसंगामुळे ती भांबावून गेली होती. तिला काहीच सुचेनासं झालं  होत. कसेबसे तिने सुधीरच्या मित्रांच्या मदतीने त्याचे अंत्यसंस्कार केले . काही जवळपासचे शेजारी-पाजारी मित्र-मैत्रिणींनी तिचे दोन-तीन दिवस सांत्वन केले व सर्व आपल्या कामात व्यस्त होऊन गेले. विमलचे बालपण हरवून ती आता मोठी झाल्या सारखं वागू लागली होती. त्यानंतर सुमनचे भाऊ तिला भेटायला दिल्ली ला आले ते डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्या वेळी इतक्या  दूर जाणं  शक्य झालं न्हवत. काही दिवस ते तिथेच राहून आपल्या बहिणीच्या संसाराची घडी बसून मार्गक्रमण झाले  होते. या वेळी संजय दहावीला होता आणि विमल सातवीला होती .त्यांच्या शाळेचा खर्च आता वाढला होता. घरात उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमी पडू लागले होते. सुमनला जास्त काम करायची गरज होती. तिनी शिलाई काम सुरु केले होते. त्यातून तिला पैसे मिळायचे व तिची आई तिला काही पैसे पाठवून देत . यावर तिने कसे बसे तीन-चार वर्ष काढले . संजय हुशार असल्यामुळे त्याने दहावीला चांगले गूण  मिळवून स्कॉलरशिप मिळवली होती. तो आता डिप्लोमा इंजिनीरिंग ला होता . विमलच बालपण मागे राहून ती बरीच समजूतदार आणि जबाबदार झाली होती. सुमन मात्र नवर्याच्या आठवणींनी व्याकुळ होऊन रडत असायची आणि सतत भविष्याच्या विचारात मग्न असायची . अशातच सुमन ला कॅन्सर सारख्या भयंकर रोगाने विळखा घातला. ज्या शेष नागाने विमलच बालपण हिरावून घेतलं तोच शेष नाग जणू आता तिच्या आई वर झडप घालून बसला होता. 

तिनी आपल्या  मुलांना तिच्या आजार विषयी काहीच कल्पना दिली न्हवती. त्या दोघांचं शिक्षण चालू होत आणि संजय च डिप्लोमाचा शेवटचं वर्ष होत अशातच त्या दोघांना आपल्या आजार विषयी कळालं तर त्यांचं शिक्षण अपूर्ण राहील या भीती मुले तिने त्यांना काहीच समजून दिल नाही. काही दिवसांनी संजय चा  निकाल आला त्याने सर्व विषयांमध्ये चांगले गूण मिळवले होते . आता त्याने इंजिनीरिंग ला ऍडमिशन घेतले होते. तसेच विमल ने हि डिप्लोमा करायचे ठरवल्या मुले त्या दोघांचा शिक्षणाचा खर्च त्यांना मिळालेल्या स्कॉलरशिप मधून होत  होता . शिवाय विमलचे मामा आजी आणि आजोबा सोडले तर त्यांना कोणाचाही आधार न्हवता. 

काही दिवस गेले असता सुमनला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या . तिला त्या वेदना असह्य होत होत्या सतत मुलांचे चेहरे समोर येत होते. ती सारखी देवाचा धावा  करीत होती कारण ती गेली तर तिची मुलं अनाथ होतील या नुसत्या विचारांनी देखील तिच्या अंगावर काटा यायचा. तिनी कसबस त्या वेळी स्वतःला सावरलं . आपल्या आजाराची कल्पना आता कुणाला तरी द्यावी याची जाणीव तिला झाली व तिने तिच्या डॉक्टर असलेल्या भावाला  तिच्या आजाराविषयी कल्पना दिली. पण खूप उशीर झाला होता. सुमन कडे फक्त सहाच महिने बाकी होते. नंतर तिच्या आजाराची कल्पना तिच्या दोन्ही मुलांना आली तेंव्हा विमल खूप रडली तिला सर्व थांबवायचं होत . पण वेळ कोणाला थांबली आहे? एका मुलीला तिची आई म्हणजे तीच सर्व असत आणि विमल ची सर्वात जवळची मैत्रीण सुद्धा तिची आईच होती. आणि आता तीच तिला सोडून जाणार म्हणल्यावर विमल खूप नाराज झाली दुःखी झाली . 

आणि असाच एक दिवस उगवला जो विमल आणि तिच्या भावाच्या आयुष्यात काळाकुट्ट अंधार घेऊन आला. विमलच्या आईला देवाज्ञा झाली. ती दोघे कोलमडून गेली त्या दुःखाने त्यांच्या आयुष्यात राम राहिला नाही. कोणीही नातेवाईक त्यांची जबाबदारी घेत न्हवत . कारण दोघेही इंजिनीरिंग करत असल्यामुळे शिक्षणाचा खर्च होता अशात या दोघांचा खर्च कोण करणार त्यामुळे त्या दोघांची जबाबदारी त्यांच्या थकलेल्या आजी आजोबांवर (आईचे आई-वडील) येऊन पडली. विमलच्या वडिलांकडे एकही नातेवाईक चांगला न्हवता जो त्या दोघांना आधार देईल. उलट त्या दोघांकडून कसे पैसे घेता येईल त्यांना कसं खर्चात पाडता  येईल हेच बघत असत. 

संजय इंजिनीरिंग च्या शेवटच्या वर्षाला होता आणि विमल डिप्लोमा च्या शेवटच्या वर्षाला होती . त्या दोघांच्या कॉलेज ची फीस सुरुवातीला आजी -आजोबांनी भरली व नंतर संजय चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला छान नोकरीही मिळाली. पण दिल्ली सारख्या शहरात राहणं आणि दोघांचा खर्च व बहिणीच्या शिक्षणाचा राहण्याचा व जेवणाचा खर्च त्याला करणं म्हणजे त्याची तारेवरची कसरत होती. विमल खूप एकटी पडली होती. ती तिच्या हॉस्टेल च्या मैत्रिणींबरोबर रमत तिचा वेळ घालवू लागली. कॉलेज ला सुट्टी लागली कि सर्व जणी आपापल्या घरी जायच्या पण विमल मात्र हॉस्टेल मधेच थांबायची . कारण तिच्या भावाने त्यांच्या फ्लॅट मध्ये बॅचलर मुले वस्ती साठी ठेवली होती व त्यांच्या कडून जे रूम भाडे जमा व्हायचे त्यातून तो खर्च चालवायचा. 

अनाथ असलेली विमल खूप रडायची तीच आयुष्य जणू एकटेपणाने आणि दुःखांनी व्यापून टाकलं होत. तिला कधी कधी नाश्ता करायचा म्हणाल तर पैसे नसल्याचे ती एक एक वेळ चहा पिऊन गप्प बसायची पण दादाला त्रास नको तो कुठून पैसे आणणार यामुळे ती त्याला सांगायची देखील नाही. एक दिवस अचानक त्यांना त्यांच्या वडिलांच्या कंपनी मधून पाच लाख रुपये मिळाले. त्यांना खूप आनंद झाला त्यामुळे विमलच्या शिक्षणाची सोय झाली होती . अश्या प्रकारे खूप दुःख , कष्ट आणि मेहनत घेऊन विमल ने राहिलेले शिक्षण पूर्ण केले व नोकरी मिळवली. आता दोघे भाऊ बहीण सोबत राहतात दोघे कमावतात आणि खुश आहेत. त्यांच्या दुःखात साथ देणाऱ्या आजी-आजोबांना ते भेटायला जातात त्यांची काळजी घेतात. संजय च आता लग्न झालं आहे . त्याच्या मामांच्या मुली सोबतच त्यामुळे लग्नाचा बराच खर्च वाचला. त्या दोघांचं चांगलं पटत आणि ती डॉक्टर असल्यामुळे दोघांचा संसाराला हातभार होतो. 

विमल ची नोकरी मध्ये बढती झाली असून अद्याप ती लग्नाचा विचार करत नाही. दादा-वहिनी सोबत ती सध्या खुश आहे आणि त्यांचा परिवार सुखात आहे. 
. .

. . 

. . 


असे चढ-उतार येऊनही विमल आता स्तब्ध आहे एखाद्या पर्वता सारखी . तिला आता कोणतही दुःख हलवू शकत नाही. अश्या विमलला माझा सलाम  !!!!

पण तुम्ही जर विमलच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असत? आई-वडिलांचं छत्र हरवलेलं असताना तुम्ही नेमकं कोणतं पाऊल उचललं असतं ? तुमच्या प्रतिक्रिया मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून जरूर कळवा . 

धन्यवाद !

No comments:

Post a Comment