बटर चिकन
साहित्य : अर्धा किलो चिकन चे मऊ तुकडे, लाल मिरची पावडर, धना पावडर , मीठ, बेसन पीठ, दही, कांदा , टोमटो, काजू, आलं-लसूण पेस्ट, सुखी मिरची, खोबरे, बटर/तूप , टोमॅटो सॉस इत्यादी
कृती: १. चिकन शिजवणे
प्रिपरेशन : लसूण, खोबरे, आलं व कोथिंबीर यांची बारीक़ पेस्ट करा. १ मध्यम आकाराचा कांदा बारीक़ चिरून घ्या. साधारण १ वाटी पाणी गरम करा.
प्रथम चिकन चे मऊ तुकडे धुऊन घ्या, त्या नंतर कुकर मध्ये १ चमचा तेल घाला व त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मध्यम आचेवर गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. कांदा भाजल्या नंतर त्यामध्ये लसूण, खोबरे, आलं व कोथिंबीर यांची बारीक़ पेस्ट घाला आणि २-३ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर थोडी हळद घाला व चिकन चे तुकडे घालून छान परतून घ्या. ३-४ मिनिटे परतून घेतल्या नंतर त्यामध्ये साधारण १ वाटी गरम पाणी घाला आणि कुकर बंद करा. गॅस मंद आचेवर ठेऊन १० मिनिटे चिकन शिजवा . चिकन शिजल्या नंतर त्यामधील पाणी ज्याला आपण आळणी किंवा सूप म्हणतो ते वेगळे करा आणि शिजलेले चिकन चे तुकडे एका ताटामध्ये काढून घ्या .
टीप : चिकन कमी शिजले तरी चालेल आपण पुन्हा चिकन ला फ्राय करणार आहोत तेंव्हा चिकन शिजते .
चिकन जास्त शिजवू नका नाहीतर त्याचे तुकडे पडतील आणि पुन्हा फ्राय करता येणार नाही. चिकन शिजवणे हि स्टेप तुम्ही केली नाही तरी चालेल.
२. चिकन मॅरिनेशन
आता शिजलेले तुकडे थोडे थंड झाले म्हणजे त्यावर अर्धे लिंबू पिळा. नंतर त्यावर २ चमचे दही, १ छोटा चमचा धना पावडर , चवीनुसार मीठ , १ मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, १ छोटा चमचा लाल मिरची पावडर व १ छोटा चमचा फ्राय केलेले बेसन घाला सर्व तुकड्यांना मिश्रण लागेल या पद्धतीने हलवा व ते ताट फ्रिज मध्ये अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवा.
टीप : चिकन शिजवताना मीठ टाकले नाही त्यामुळे चिकन मॅरिनेट करताना त्या अंदाजाने मीठ वापरा. या मध्ये तुम्ही जिरा पावडर आणि हळद हि टाकू शकता. मी हे दोन पदार्थ टाकले नाहीत . हे ऑपशनल आहेत.
३. बटर चिकन ग्रेव्ही
एका कढई मध्ये १ चमचा तेल घालून त्यामध्ये २-३ मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले , २ सुख्या लाल मिरच्या, ३ मध्यम आकाराची टोमॅटो बारीक चिरलेली , ७-८ काजू व १ चमचा आलं-लसूण पेस्ट घालून २-३ मिनिटे परतून घ्या. ते मिश्रण थंड झाल्यावर त्याची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करा.
४. चिकन फ्राय
मॅरिनेट झालेले चिकन फ्रिज मधून बाहेर काढून घ्या. नॉन स्टिक च्या तव्यामध्ये २ चमचे तेल घालून सर्व चिकनचे तुकडे परतून घ्या. चिकन सर्व बाजूने हलवून व्यवस्थित भाजून घ्या.
टीप : ज्यांना कुकर मध्ये चिकन शिजवायचे नसेल त्यांनी चिकन परतून घेताना त्यावर झाकण ठेऊन १० मिनिटे चिकन परतून घ्यावे म्हणजे चिकन कच्चे राहणार नाही.
५. बटर चिकन
शेवटी एका कढई मध्ये १ चमचा तेल व २चमचे बटर / तूप घाला . गॅस मंद आचेवर ठेवा व त्यामध्ये थोडी हळद आणि १छोटा चमचा लाल मिरची पावडर टाका. ते हलवून घ्या व त्यामध्ये अर्धा छोटा चमचा धना पावडर टाका १ मिनिट हलवून घ्या व त्यामध्ये बटर चिकन ग्रेव्ही ( कांदा, टोमॅटो, सुखी मिरची , काजू, आलं लसूण पेस्ट )घाला. ही पेस्ट ३ मिनिटे भाजून घ्या जेंव्हा तेल सुटायला लागेल तेंव्हा त्यामध्ये चिकन चे फ्राय केलेले तुकडे घाला थोडे पाणी घाला व झाकण लावून ३-४ मिनिटे शिजवा. सर्वात शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर/कस्तुरी मेथी टाका. ३-४ चमचे बटर/तूप घाला या १ मोठा चमचा टोमॅटो सॉस घालून हलवा. आणि १ मिनिटांनी गॅस बंद करा.
टीप : तेल ऐवजी यामध्ये तुम्ही फक्त बटर/तूप घालू शकता. बटर चिकन जास्त तिखट नसते तरीही तुम्हाला तिखट हवे असेल तर यावर शेवटी गरम मसाला तुम्ही घालू शकता किंवा लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता.
बटर चिकन
बटर चिकन बनवण्यासाठी तुम्हाला १ तास लागेल. हि डिश तुम्ही बटर नान सोबत खा खूप छान लागते.
धन्यवाद !!

No comments:
Post a Comment