सकाळी पाच चा गजर वाजला आणि मी झोपेतून जागी झाले. मला आज कॉलेजला लवकर जायचं आहे. खूप उशीर झाला!! कॉलेज माझ्या घरापासून बरेच दूर असल्यामुळे मला रोजच लवकर उठून तयार व्हावं लागत . आज माझा सेमिनारचा विषय नक्की करायचा आहे. तस तर सर्वांना मॅडम नी आपल्या आपल्या आवडीचे विषय घ्या आणि सादर करा असेच सांगितले आहे. पण मला मात्र आवर्जून उद्या लवकर कॉलेजला ये! मी देईल त्याच विषया वर सेमिनार दे असं खडसावणाऱ्या मॅडम चा मला खूपच राग आला होता.
मी घाईघाईने माझं आवरलं आणि दोन बिस्किटे तोंडात कोंबून लॅपटॉप आणि बॅग घेऊन बस च्या दिशेने धावत सुटले. आज माझी बस चुकली असती तर मॅडम नी अजून दोन दिवस तरी विषय नक्की करायला घालवले असते. मॅडम खूपच शिस्तप्रिय आहेत पण त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांची अडचण समजून घ्यायला हवी कि नको? असो
मी अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीचे (पोस्ट ग्रॅड्युएशन) शिक्षण घेत आहे आणि ते ही सिग्नल प्रोसेसींग सारख्या मला तरी अवघड वाटणाऱ्या विषया मध्ये . आणि माझ्या प्रोजेक्ट गाईड आहेत अनुराधा मॅडम . अनुराधा मॅडम अँटेना या विषया मध्ये डॉक्टरेट पदवीचे शिक्षण घेत आहेत . त्या PHD च्या शेवटच्या वर्षाला आहेत. जो करतो त्यालाच धारेवर धरतात या म्हणी प्रमाणे मलाच त्यांनी निशाणा बनवला होता. नेहमी बाकीच्यांना सूट आणि मला मात्र अवघड विषय देऊन त्या विषया बद्दल माहिती शोधायला पिटाळायचं हे त्यांचं आवडत कामच असावं . इंजिनिअरिंग हि विज्ञानाचीच शाखा आहे आणि माझा विज्ञान हा पहिल्यापासूनच आवडता विषय असल्यामुळे मलाही हे काम आवडते .
कदाचित त्यांना माझं काम आवडत असेल ? कदाचित त्यांना माझ्यात ती चमक दिसत असेल ? देव जाणे आज काय वाढून ठेवलं आहे माझ्या नशिबात. देवा आज तरी वाचावं तुझ्या पोरीला !!
मी कॉलजे मध्ये पोहोचण्या आधीच मॅडम त्यांच्या खोलीत काही तरी वाचत बसल्या होत्या. मी दरवाजा जवळ धापा टाकतच पोहोचले .
मे आय कम इन मॅम ? मी
एस ! कम इन . यु आर टू मिनिट्स अँड ट्वेन्टीथ्री सेकंड्स लेट!!! मॅडम
जास्त विषय वाढायला नको म्हणून मी पटकन सॉरी म्हणून रिकामी झाले.
सॉरी मॅडम ! नेक्स्ट टाईम आय विल बी ऑन टाईम. मी
पटकन सॉरी म्हणाल्या मुळे कदाचित त्यांचा राग गेला असावा. मग त्या सेमिनार च्या विषयाबद्दल बोलू लागल्या .
आधीच खूप साऱ्या कागदांचे गट्ठे त्यांच्या टेबल वर पडले होते. त्या मला १-१ विषय सांगत होत्या.
हा विषय थोडा अवघड आहे . तो असा विषय आहे . या विषयाबद्दल तुला काही माहिती आहे का ? असं विचारत असताना माझा खूपच गोंधळ उडाला . मी थोडी अवघडली होते लॅपटॉप च्या ओझ्याने माझं गाढव झालं होत. मग डोकं वर काढून त्यांनी एकवार माझ्यावर कटाक्ष टाकला . आणि मला बसायला खुणावले. मग मी लॅपटॉप ठेऊन एकदाची त्यांच्या समोर बसले . त्यांची बऱ्याच कागदांची उलथापालथ झाल्या नंतर त्यांनी एक विषय शोधून काढला तू SAR value या विषया वर सेमिनार दे . काही मदत लागली तर सांग . एवढं बोलून त्यांनी जाण्यासाठी ची शांतता पसरवली. मी अर्थातच त्यांना घाबरत असल्यामुळे मला त्या विषया बद्दल एकटीलाच निपटून घ्यायचे होते . त्यांची मदत घेणं म्हणजे चारचौघात इभ्रत काढण्या प्रमाणेच होत.
SAR value हा मॅडम च्या PHD चा विषय होता. मला तिथल्या बाकीच्या मॅडम नी च ही गोष्ट सांगितली होती. विषय तर बदलून मिळणार नव्हता पण मॅडम चे या विषय मधील ज्ञान भरपूर असल्यामुळे काहीतरी बरळून चालणार नव्हते. मी तयारीला लागले.
मी खूप संशोधनाचे निबंध वाचून काढले. तेंव्हा मला कळालं SAR value हे अँटेना शी निगडित आहे.
मला आधी अँटेना काय आहे आणि मग त्याची SAR value काय असते हे सर्व जाणून घ्यायची उत्सुकता वाढू लागली. विषय फारच रंजक असल्यामुळे मी खूप माहिती गोळा केली. तुम्हाला पण नक्की आवडेल.
अँटेना (antenna ) म्हणजे दूरदर्शन किंवा आकाशवाणी यांचे संदेश घेणारी काम्बी . कदाचित अँटेना म्हणलं कि तुम्हाला तो जुना सीन आठवत असेल . महाभारत मालिका दूरदर्शन वर लागायची आणि जर चुकून सिग्नल गेला कि , एक इंजिनीअर अँटेना हलवत बसणार , एक जण दारात ओरडून सांगणार चित्र आलं कि नाही . चित्र दिसे पर्यंत तो अँटेना हलवून निश्चित करायचा कार्यक्रम चालायचा मगच तो अँटेना सोडून द्यायचा. हो! हो ! तोच आहे हा अँटेना .
शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हणाल तर अँटेना म्हणजे असं साधन आहे जे एका शक्तीचे दुसऱ्या शक्ती मध्ये रूपांतर करते आणि टीव्ही किंवा रेडिओ (विद्युत चुंबकीय लाटा ) च्या लाटा प्रसारित किंवा प्राप्त करते.
जेम्स क्लार्क मॅक्सवेल च्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांताप्रमाणे भविष्यवाणी केलेल्या लाटांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जर्मन भौतिक शास्त्रज्ञ हेनरिक हर्ट्झ याने १८८८ मध्ये पहिला अँटेना बांधला होता. तेंव्हा पासून अँटेनाचा जन्म झाला.
अँटेना चा वापर हा कोणत्याही रेडिओ रिसिव्हर किंवा ट्रान्समिटर चे विद्युत connection विद्युत चुंबकीय लाटांशी करून देण्यासाठी होतो . रेडिओ लाटा म्हणजेच विदयुत चुंबकीय लाटा ह्या प्रकाशाच्या वेगाने हवेतून किंवा अंतराळातून प्रवास करतात. कोणत्याही वायरलेस कॉम्युनिकेशन मध्ये संदेश सिग्नल हा निर्वात पोकळीतून प्रवास करतो. संदेश पाठवणे आणि प्राप्त करून देण्याचे काम अँटेनांचे असते . तर ट्रान्समीटरने ट्रान्स्मिट केलेल्या संदेश सिग्नलची शक्ती कमी असल्यामुळे तो जास्त अंतर पार करण्यास असर्मथ असतो तेंव्हा सिग्नलचे मोडूलेशन केले जाते . मोडूलेशन म्हणजे लहान शक्ती असलेला सिग्नल जास्त शक्ती असलेल्या कॅरिअर सिग्नल वर बसवून पाठवला कि तो जास्त अंतरावर असलेल्या रिसिव्हर ला जाऊन मिळतो . रिसिव्हर नंतर डीमोडूलेशन करून मूळ सिग्नल प्राप्त करतो. संदेश सिग्नल हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves वाहून नेत असतात . ड्रिल मशीनचे रिबिट जसे भिंतीला होल पडताना भिंतीमध्ये घुसते त्या प्रमाणे या लाटा निर्वात पोकळीतून प्रवास करतात . आता तुम्हाला थोडी अँटेनाची कल्पना आली असेल.
अँटेना च नक्की काम काय असते ? तर अँटेनाचे कार्यकारी तत्व असे आहे कि, हा हवेतील पोकळी मध्ये विद्युत प्रवाहाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये रूपांतर करतो तर पुन्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चे विदयुत प्रवाह मध्ये रूपांतर करतो. थोडक्यात सांगायचं म्हणाल तर ,अँटेना हे साधन दोन उपकरणामध्ये संभाषण घडवून आणण्यासाठी कारणीभूत असते.जसे कि उपग्रहासोबत संभाषण (satellite communication ) त्यासाठी एक ट्रान्समीटर आणि रिसिव्हर लागतो . ट्रान्समीटर च्या बाजूला जो अँटेना असतो तो विदुत प्रवाहाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये रूपांतर करून संदेश पाठवतो त्या अँटेना ला तुम्ही ट्रान्समीटिंग अँटेना म्हणू शकता. म्हणजेच पृथ्वीवरून तुम्ही या अँटेना द्वारे संदेश पाठवला , आता हा संदेश हवेतील पोकळी मधून वाहत जाऊन दुसऱ्या उपकरणाच्या बाजूला जो रिसिव्हिंग अँटेना असतो त्याला संदेश मिळतो . हा रिसिव्हिंग अँटेना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे पुन्हा विद्युत प्रवाह मध्ये रूपांतर करतो. म्हणजेच उपग्रहावरील रिसिव्हिंग अँटेना हे काम करतो . अशा प्रकारे अँटेना द्वारे आपण उपग्रहासोबत कॉम्युनिकेशन करू शकतो.
अँटेना चा शेप हा वेग वेगळा असतो तर त्याची साईझ सुद्धा त्याच्या वापरावर अवलंबलेली असते.
म्हणजे अँटेना तुम्ही कोणत्या कामासाठी वापरणार आहे त्यावर अँटेनांची साईझ आणि शेप ठरलेला असतो. सर्वसामान्यतः अँटेनांचा आकार हा ऑपरेटिंग frequency वर एक चतुर्थांश (λ / 4) आणि अर्धा (λ / 2) तरंगलांबीवर असतो . जर ऑपरेटिंग frequency जास्त असेल तर wavelength (तरंगलांबी ) कमी असते आणि अँटेनांचा आकार कमी असतो. तुम्ही उपग्रहासोबत कॉम्युनिकेशन करण्यासाठी अँटेना वापरत असाल तर तुम्हाला गोलाकार असलेला डिश अँटेना वापरावा लागेल . उपग्रहासोबत कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला 0.3Ghz ते 30Ghz या frequency चा वापर करावा लागतो तर त्यासाठी लागणाऱ्या अँटेनांची साईझ हि अंदाजे 13ft एवढी असते. याउलट मोबाईल फोन मध्ये वापरला जाणारा अँटेना खूप लहान आकाराचा असतो. अगदी मायक्रो मिलीमीटर मध्ये. अँटेना या विषया मध्ये आता बरीच प्रगती होत आहे .
डिश अँटेना, वायर अँटेना , लेन्स अँटेना, हॉर्न अँटेना, अरे अँटेना , मायक्रो स्ट्रीप अँटेना असे बरेच अँटेनांचे प्रकार आहेत. त्यामध्ये गोलाकार असलेला डिश अँटेना आपण उपग्रहासोबत कॉम्युनिकेशन करण्यासाठी , टीव्ही साठी, खगोलशास्त्र , रडार , space communication इत्यादी साठी वापरू शकतो . वायर अँटेना हा सरळ , वेटोळे असलेला असतो . हा अँटेना गाडीमध्ये , अंतराळयान , जहाज आणि मोठ्या इमारतीमध्ये वापरला जातो. लेन्स अँटेना शक्यतो खूप जास्त frequency असलेल्या कामासाठी वापरतात तर हॉर्न अँटेना मुख्यत्वे उपग्रहावरील कम्युनिकेशन आणि रेडिओ टेलेस्कोपी साठी वापरला जातो . हॉर्न अँटेना हा गिरणीच्या सुपासारख्या आकाराचा असतो. मायक्रोस्ट्रीप अँटेना मोबाईल फोन, क्षेपणास्त्र , अवकाशयान इत्यादी मध्ये वापरतात. अरे अँटेना सामान्यतः वाहने, विमान, जहाज , उपग्रह आणि बेस स्टेशन वर बसविली जातात.
अँटेनांचे बरेच घटक आहेत त्यावरून अँटेनांचे एखाद्या कामासाठी निवड होते. गेन , बॅण्डविड्थ , frequency , रिटर्न लॉस , VSWR , रेडिएशन पॅटर्न इत्यादी घटक अँटेनांची कार्यप्रणाली ठरवतात .
गेन हा घटक अँटेना एकाच दिशेला किती पॉवर देत आहे त्यावर अवलंबून असतो. जेवढा जास्त गेन तेवढी अँटेनांची कार्यप्रणाली चांगली असते.
बॅण्डविड्थ हा दुसरा महत्वाचा घटक आहे. बॅण्डविड्थ हा frequency ची श्रेणी दर्शवितो ज्यावर अँटेना ऊर्जा उत्सर्जित किंवा प्राप्त करू शकतो. जास्त बॅण्डविड्थ असेल तर जास्त सिग्नल पास होतो.
अँटेनांची frequency, अँटेना कोणत्या कामासाठी वापरणार आहे त्यावर अँटेनांची frequency ठरलेली असते . जेवढी जास्त frequency असेल तेवढा अँटेना लहान असतो तर जेवढी कमी frequency असेल तेवढा अँटेना मोठा असतो.
रिटर्न लॉस हा अँटेनांचा घटक अँटेना किती प्रमाणात ऊर्जा रिफ्लेक्ट करते यावर अवलंबून असतो . जेवढी ऊर्जा डिव्हाइस ला दिली जाते तेवढी त्याने घेणे आवश्यक असते पण काही प्रमाणात ऊर्जा रिफ्लेक्ट होते त्याला रिटर्न लॉस म्हणतो तो जास्तीत जास्त कमी असेल तर अँटेना ची कार्यप्रणाली चांगली असते .
VSWR म्हणजे voltage standing wave ratio . जेवढा अँटेना आणि ट्रान्समिशन लाइन परफेक्ट मॅच असतील तेवढा VSWR कमी असतो. VSWR ची किंमत जेवढी कमी असेल तेवढा अँटेना चांगला .
याव्यतिरिक्त बरेच घटक आहेत जसे कि डिरेक्टिव्हिटी. अँटेना जेवढा एकाच दिशेने ऊर्जा उत्सर्जित करेल तो अँटेना वापरासाठी चांगला असतो . या घटकांवरून अँटेनांचे परीक्षण केले जाते त्या सोबत त्याची साईझ जर कमी असेल ,तर तो अँटेना कामाचा आहे असे मानले जाते .
या वरून तुम्हाला अँटेना म्हणजे काय आणि तो कुठे व कसा वापरतात हे समजले असेलच ! मला तरी आता या विषय मध्ये रस वाटू लागला आहे . किती वेगवेगळ्या प्रकारचे अँटेना असतात . मला तरी फक्त मोबाईल , टीव्ही , satellite इत्यादी मध्ये वापरणारे अँटेना माहित होते पण मोबाईल फोन मधला अँटेना प्रत्यक्ष पहिला नाही . त्यामुळे मला मोबाईल अँटेना कसा असतो हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली.
मोबाईल फोन मध्ये मायक्रोस्ट्रीप पॅच अँटेना जास्त वापरला जातो.त्यामध्येही MIMO अँटेना, monopole अँटेना, PIFA अँटेना इत्यादी प्रकार आहेत . हा अँटेना म्हणजे सर्किट बोर्ड वर असलेल्या मेटल ट्रॅक सारखाच दिसतो. आपण घरामध्ये जर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बिघडली तर ती वस्तू खोलून पहिल्या नंतर आत मध्ये एक हिरव्या रंगाचा बोर्ड दिसतो त्यावर हिरव्या रंगाचे मेटल ट्रॅक असतात . मोबाईल फोन मध्ये असलेला मायक्रोस्ट्रीप पॅच अँटेनासुद्धा असाच मेटल ट्रॅक असल्या सारखा असतो. मोबाईल अँटेना हा multiband असतो म्हणजे तो एका पेक्षा जास्त frequency ला काम करतो. सध्या वापरात असलेले स्मार्ट फोन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त अँटेना असतात . एक अँटेना रेडिओ सिग्नल ट्रान्स्मिट आणि रिसिव्ह करतो म्हणजे व्हॉइस कॉम्म्युनिकेशन साठी ४G LTE अँटेना असतो, तसेच ब्लूटूथ, GPS , Wi -Fi साठी सुद्धा मोबाईल फोन मध्ये अँटेना असतात.
या नंतर मी SAR value काय असते या विषयाकडे वळणार आहे. मॅडम नी मला प्रथम SAR value ऑफ मोबाईल अँटेना असे शोधायला सांगितले होते. मी त्याप्रमाणे शोध सुरु केला . पण राहून राहून मला एक प्रश्न सतावत होता तो असा कि , अँटेनांचे वर सांगितल्या प्रमाणे जे घटक अँटेनांची कार्यप्रणाली ठरवतात ते घटक आपण कमी जास्त कसे करू शकतो ? म्हणजेच मला पाहिजे तो आणि पाहिजे तसा अँटेना मी कसा डिझाईन करू शकते ? मी पुन्हा शोधायला सुरवात केली . जवळ जवळ २०-२५ संशोधनाचे निबंध वाचले त्यावरून मला समजले कि जेव्हा आपण अँटेना डिझाईन करतो तेंव्हा मॅनुफॅक्चरिंग मटेरियल मध्ये बदल केले , अँटेनाचे काही पॅरामीटर म्हणजे डायेलेकट्रीक कॉन्स्टन्ट , परमिटिव्हिटी , सब्स्ट्रेट ची जाडी वाढली किंवा कमी केली तर हे घटक कमी जास्त करू शकतो . किंवा अँटेना चा शेप आणि साईझ कमी जास्त केली तरीही हे घटक आपण बदलू शकतो आणि पाहिजे तसा अँटेना बनवू शकतो. स्प्लिट रिंग रेसोनेटर नावाचा अजून एक प्रकार आहे जो हे अँटेनांचे घटक बदलू शकतो.
मेटामटेरिअल हे कृत्रिम पदार्थ आहे जो निसर्गात सापडत नाही ज्या मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक घटक असतात. स्प्लिट रिंग रेसोनेटर हे मेटामटेरिअल पासून बनवतात . या मुळे आपण अँटेनांचे काही घटक बदलवून आपल्याला पाहिजे तास अँटेना बनवू शकतो.
आहे ना मजेशीर ?
आता मी SAR value ऑफ मोबाईल अँटेना या विषयाकडे वळले !
प्रथम आपण SAR value काय आहे हे जाणून घेऊ .म्हणून मी शोधायला सुरुवात केली ....
जेंव्हा आपण मोबाईल फोन वापरतो तेंव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves हवेतून प्रवास करत असतात . तुमचा संदेश असलेले सिग्नल या इलेक्ट्रोमॅग्नेटिक wavesवाहून नेतात . पुढे अँटेना द्वारे हे सिग्नल ट्रान्स्मिट आणि रिसिव्ह होतात. जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves संदेश सिग्नल वाहून नेत असतात तेंव्हा काही प्रमाणात सिग्नलचे dissipationहोते म्हणजेच काही सिग्नल ची ऊर्जा हवेमध्ये बाहेर पडते . अंदाजे सिग्नलच्या १०-२० % ऊर्जा हवेत बाहेर पडते. यालाच मोबाईल रेडिएशन असं म्हणले जाते. मोबाईल च्या वापरावर हे रेडिएशन लेव्हल अवलंबून असते . या रेडिएशन लेव्हल ला कंट्रोल करण्यासाठी SAR म्हणजे स्पेसिफिक ऍबसॉरपशन रेट व्हॅल्यु वापरली जाते .
सध्या सरकारने मानवी हितासाठी मोबाईल च्या SAR value वर काटेकोर निर्बंध घातले आहेत कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऍबसॉरबशन हे घातक आहे .
आपल्याला माहिती आहेच कि , मॉडर्न समाजात आजकाल वायरर्लेस सिस्टिम खूप लवकर आणि जास्त प्रमाणात वाढत आहे . लोकहीतासाठी ICNIR आणि IEEE या आंतराष्ट्रीय संस्थांनी SAR value कमी करण्याबाबत काही दिशादर्शक सूचना बनवल्या आहेत. ज्या मध्ये SAR value ची मर्यादा जास्त नसावी व ती किमान किती असावी अशी माहिती पुरवली आहे. तसेच WHO ने घेतलेल्या एका कार्यशाळेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिशनचे लहान मुलांवर होणारे परिणाम हि सांगितले आहेत.२०१६ मध्ये जवळ जवळ ७. ४ बिलिअन मोबाईल चे वापरकर्ते होते आणि हि संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे , त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा धोका सुद्धा वाढत चालला आहे . भारतामध्ये SAR value हि १. ६ W/Kg पेक्षा कमी असली पाहिजे. ज्या मोबाईल फोन ची SAR value हि १. ६ W/Kg पेक्षा जास्त आहे ते फोन वापरण्यासाठी धोकादायक आहेत.
मोबाईल फोन मध्ये वापरले जाणारे MIMO अँटेना चे डिसाईन मध्ये बदल केले तर SAR value कमी होऊ शकते . या मध्ये दोन प्रकार आहेत . हेड फँटम आणि फ्लॅट फँटम . हेड फँटम म्हणजे SAR value जेंव्हा मोबाईल डोक्याजवळ असतो . तेंव्हा डोक्यातील टिशूंनी ऍबसॉरब केलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन . फ्लॅट फँटम म्हणजे SAR value जेंव्हा मोबाईल शरीरा जवळ असतो तेंव्हा शरीराने ऍबसॉरब केलेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हेड फँटम हा फ्लॅट फँटम पेक्षा जास्त असतो .
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे मानवाला बऱ्याच व्याधी होऊ शकतात जसे कि , हार्ट अटॅक , ब्रेन ट्युमर ,कॅन्सर इत्यादी . मोबाईल फोन शर्ट च्या खिशात ठेवल्या मुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हृदयाजवळ जास्त होते त्यामुळे हार्ट अटॅक चे प्रमाण खूप वाढले आहे . तासंतास मोबाईल कानाला लावून बोलण्यामुळे कान दुखणे , कमी ऐकू येणे , ज्या कानाने मोबाईल वर बोलता त्या बाजूचे डोके दुखणे किंवा डोक्याची त्वचा खाजणे या प्रकारची लक्षणे आढळली आहेत. तसेच मेंदूत रक्ताच्या गाठी होणे हे सुद्धा मोबाईल च्या अति वापरामुळे होणारे रोग आहेत. गर्भवती महिलांनी मोबाईल चा जास्त वापर केल्या मुले लहान अर्भकाचा मृत्यू किंवा लहानपणीच अटॅक येणे . स्पर्म काउन्ट कमी होणे , गर्भधारणा न होणे या सारखे आजार सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मुळे होतात . हे रेडिएशन कमी करण्यासाठी आपण मोबाईल फोन चा वापर कमी केला पाहिजे . शक्यतो हेडफोन लावून बोलणे, मोबाईल उशीखाली ठेऊन झोपणे या गोष्टी टाळाव्यात .लिफ्ट , कार , विमान , ट्रेन मध्ये फोन वापरणे टाळावे तेव्हा रेडिएशन जास्त असते . मोबाईल ची बॅटरी कमी असल्यास मोबाईल फोन वापरू नये .
आपण आपला मोबाईल विकत घेताना बाकीचे स्पेसिफिकेशन पाहण्याबरोबर मोबाईल हॅण्डसेटचा SAR value तपासला पाहिजे. . कोणत्याही मोबाईल च्या SAR value तपासण्यासाठी मोबाईल फोन वर *#07# हा नंबर डायल करून कॉल बटन प्रेस करा तुम्हाला तुमच्या मोबाईलचा SAR value दिसेल. जेवढा कमी SAR value असेल तोच हँडसेट विकत घ्या. सध्या मोबाईल फोन च्या SAR value कमी करण्याबाबत बरेच संशोधन चालू आहे . त्याच बरोबर नवीन आणि जास्त दूर अंतरावर कम्मुनिकेशन घडवून आणण्यासाठी लागणारे उच्च प्रतीचे अँटेना तयार करण्याबाबत सुद्धा बरीच संशोधन चालू आहे. नुकतेच पार पडलेले चंद्र यान मोहिमेवर हरवलेला विक्रम लॅन्डर सोबत कम्मुनिकेशन होत नाही त्यासाठी कम्मुनिकेशन सिस्टिम मध्ये सुद्धा संशोधन चालू आहे .
बापरे ! किती माहिती आहे या विषयांबद्दल . मी उगाच मॅडमनी दिलेल्या विषयावर सेमिनार द्यावा लागणार म्हणून निराश होते . पण आज मॅडम मुळे च मला या विषयाबद्दल ज्ञान मिळालं . मी सर्व माहिती गोळा करून एक प्रेसेंटेशन बनवलं आणि सादर केलं . सर्व माहिती गोळा केल्यामुळे मी सर्व बाजूने सर्व शंकांचे निरसन केले . या मध्ये जास्त विचारला जाणारा प्रश्न हा होता . सर्वात कमी SAR value असलेला मोबाईल हँडसेट कोणता ? तर verykool vortex RS ९० या हॅण्डसेटची SAR value ०. १८ आहे त्यानंतर samsung galaxy note या हँडसेट ची SAR value ०. १९ इतकी आहे. सर्वांनी टाळ्या वाजून प्रेसेंटेशन ला प्रतिक्रिया दिल्या व मी मॅडमच्या समाधानपूर्वक चेहऱ्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि माझा लॅपटॉप बंद केला .
धन्यवाद !
अँटेनाच्या जास्त माहितीसाठी कृपया या लिंक वर क्लिक करा.
http://ijariie.com/FormDetails.aspx?MenuScriptId=35106