Tuesday, 5 May 2020

र्गुरुर्देवो महेश्वरः

प्रत्येक जण शाळे मध्ये असताना हा गुरु मंत्र म्हणत असतो पाठही  असतो आणि जस जस मोठं होतो तस तस याचा आपणाला विसर पडतो. कारण सर्व जण शाळा सोडल्यानंतर पुढे कॉलेज , नोकरी , व्यवसाय, घर आणि संसार यामध्ये व्यस्त होऊन जातो . मग या मंत्रांची आपल्याला गुरु पौर्णिमा आणि शिक्षक दिन म्हणजे वर्षातून दोन वेळा  लोकांनी व्हाट्सअप वर ठेवलेले स्टेटस पाहून पुन्हा आठवण येते . काय बरोबर आहे ना ?
 ५ सप्टेंबर या  दिवशी साजरा होणारा शिक्षक दिन यावरून आज मला काही वास्तव तुम्हाला सांगायचं आहे  जे मी माझ्या जीवन प्रवासात अनुभवलेलं आहे. 

शिक्षक म्हणल  कि आपल्याला गणिताचे,मराठीचे, विज्ञानाचे, इतिहास-भूगोलाचे शिक्षक आठवतात. त्यासोबत त्यांनी मारलेल्या छडया आणि दिलेला चोप सुद्धा अजून आठवतो. खरंच शिक्षकांना किती घाबरायचो आपण ? काही शिक्षक कडक स्वभावायचे म्हणजे शिस्त-प्रिय आणि काही शिक्षक मृदू स्वभावाचे म्हणजे हसत खेळत शिकवणारे . त्यामुळे शिक्षकांचं महत्त्व कायम माझ्या मनात वेगळं होत. तुम्हाला आठवत ! प्रत्येक जण शाळेत असताना तुम्हाला नेहमी १ प्रश्न विचारला जायचा, तुम्ही मोठे झाल्यावर कोण बनणार ? शाळेत असतानां बाहेरील जगाचा अनुभव नसतो आणि आपण उत्तरे देतो ,मी डॉक्टर बनणार, इंजिनिअर बनणार, वकील बनणार, संशोधक बनणार etc . आता मला इतकं हसू येत हे आठवलं कि कारण माझ्या वर्गातील सर्वच जण असच उत्तरे द्यायची.

आमचा मराठीचा तास चालू होता आणि मराठीचे शिक्षक आम्हाला यशवंतराव चव्हाणांचा  धडा शिकवत असताना १ वाक्य आलं मी मोठेपणी यशवंतराव चव्हाणच बनणार . त्या नंतर आमच्या शिक्षकांनी मधेच शिकवणं बंद केलं आणि प्रश्न विचारला, मुलांनो ! तुम्ही मोठे झाल्यावर कोण बनणार ? एक एका विद्यार्थ्याने उभे राहून सांगायचं असल्यामुळे वर्गात चुळबुळ चालू झाली. आम्ही ५-६ जणी बेंच जोडून सलग बसणाऱ्या ग्रुपचं एकच काम चालू झालं . कोण काय सांगत आहे ऐकायचं आणि तो हुशार असेल तर ठीक! पण अभ्यासात ढ असेल, तर त्याच ऐकायचं आणि डॉक्टर, वकील,  इंजिनीअर म्हणालं  कि जोरात हसायचं . आपली मैत्रिण काय सांगत आहे हे ऐकायचं आणि हसायचं असा उद्योग चालू होता माझा. बघता बघता माझ्यावर नंबर आला मी उठून उभा राहिले आणि पटकन काही सुचेना म्हणून मीही इंजिनीअर बनणार असं बोलले. तेंव्हा आमचे शिक्षक असं म्हणाले होते कि शिक्षक कोणालाच बनायचं नाही का? याची मला खूप खंत वाटत आहे आणि दुर्दैव हि !!! आज या घटनेला बरीच वर्षे उलटून गेली आहेत पण माझ्या शिक्षकांचे ते वाक्य अजूनही जसेच्या तसे माझ्या कानावर पडत असल्याचा भास होतो.  

मी आज खरोखरच इंजिनीअर आहे याचा मला अभिमान आहे पण त्याहून जास्त अभिमान अजून एका गोष्टीचा वाटतो कि मी शिक्षिका देखील आहे. कदाचित सर असते तर त्यांची हि खंत दूर झाली असती. असो!
 शिक्षक या घटकाकडे  बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा वेगळाच आहे. 

काही लोकांच्या म्हणण्यानुसार... 
शिक्षकांना काय काम असतात ? अहो सावलीला बसून पगार असतो त्यांना !
 मुलांन  समोर जाऊन काही तरी १ तास बडबडून यायचं ! दिवसातून २-३ तास शिकवलं कि झालं हो नंतर दिवस रिकामा बसून काढायचा ! मुलांना काय कळतंय ? काही कीर्तनकार तर शिक्षकांनवर बेधडक विनोद करतात. 

काही लोक म्हणतात शिक्षक म्हणजे जीवनाचा शिल्पकार असतो. शिक्षक नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टीं साठीच शिकवत असतात. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचे तुम्ही मूल्य करू शकत नाही.

दोन्हो लोकांची मते तपासून पहिली तर तशी दोन्ही बरोबरच आहेत !!

हो!! शिक्षक जीवनाचा शिल्पकार तेंव्हा होता जेंव्हा शिक्षणाचा बाजार झाला नव्हता . तो तुम्हाला विना मूल्य भरगोस ज्ञान वाटत असे जेंव्हा विद्यार्थ्यांना ते खरंच  हवं असे. शिक्षक सावलीला बसून पगार घेतो आणि १-२ तास बडबड करून निघून जातो कारण आता विद्यार्थी शिक्षकांचा मान ठेवत नाहीत , त्यांना शिस्त लावण्याची सोय राहिली नाही . म्हणून विद्यार्थी झाले कस्टमर आणि शिक्षक झाले आहेत व्यवसायिक. 

शिक्षकांच्या या परिस्थीला कुठेतरी आपणच जबाबदार नाही का हो ? 
आज आपल्या मुलाला शिक्षकांनी मारलं किंवा छड्या दिल्या कि लगेच तुम्ही शिक्षकांच्या अंगावर धावून जाता. का मारलं ? का शिक्षा केली? काहीही विचारत नाही ? 

आमच्या वेळी शाळेत आगाऊपणा केला कि शिक्षक  बेदम मारायचे वरून घरी सांगायची सोय नाही घरचे सुद्धा येऊन बिनधास्त सांगायचे काही आगाऊपणा केला कि अजून मार द्या आम्ही काहीही विचारणार नाही. सुदैवाने माझ्यावर असली वेळ कधी आली नाही पण मुलांच्या बाबतीत नेहमी घडायचं. तेंव्हा असं काही गंभीर गुन्हे शिक्षकही करत नव्हते  आणि पालकांनाही जाब विचारायची वेळ यायची नाही . पण आता परिस्तिथी बदलली आहे. 

आजच्या परिस्तिथीत शिक्षक , पालक आणि विद्यार्थी तिन्ही घटक गुन्हेगार झाले आहेत. आपण अनेक बातम्या बघतो वाचत असतो त्यावरून समजतं. मला आता यावर अधिक विस्ताराने नाही बोलायचं कारण विषय फार मोठा होईल. तर माझ्या मुद्द्यावर येते.

मी इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये प्रोफेसर आहे. आता अर्थातच तुम्हाला कल्पना आली असेल कि हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं कसे असेल! इंजिनीअरिंग म्हणाल तर खूप अभ्यास असतो खूप प्रात्यक्षिके करावी लागतात आणि खूप परीक्षा हि असतात. 

माझा आज पहिलाच दिवस होता इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये शिकवायला जाण्याचा आणि अर्थात नोकरीचा. मी वर्गात गेले ,  सर्व जण गोंधळ घालत बसले होते मला पाहताच कोणी नवीन मॅडम आल्या आहेत पाहून सर्वांनी कंमेंट्स करायला सुरवात केली. मी माझे शिक्षण मोठ्या कॉलेज मधून पूर्ण केल्यामुळे मला इंजिनीअरिंग च्या   विद्यर्थ्यांना  शिकवण्याचा आत्मविश्वास होताच तसेच माझे कम्मुनिकेशन चांगले असल्यामुळे मला तो वर्ग पटकन शांत करता आला . मी पहिल्या दिवसा पासून शिकवायला सुरुवात केली होती . माझा तास संपला ,नंतर मी माझ्या केबिन मध्ये जाऊन बसले. खूप थकल्यासारखं वाटू लागलं होत.  मला वाटलं मला जमेल का ?हे मी स्वतःबरोबर बोलू  लागले.

किती मोठी मुलं  आहेत हि ? मी

मग असूदेत मी काही कमी नाही . माझ्यातील शिक्षक

ते कंमेंट्स पास करत होते कसं वाटत होत ? अक्षरशः रडू येत होत? मी

पहिलाच दिवस आहे त्यामुळे!! तू जर तुझ्या शिकवण्याच्या पद्धतीने त्यांना आकर्षित केलं तर नाही करणार ते कंमेंट्स.  माझ्यातील शिक्षक

हो पण १ तास सलग बडबड करायची खूप दम लागतो मला ? मी

होईल सवय आत्तापर्यंत बेंच वर बसून ऐकायची सवय होती आता पात्र बदललं आहे . माझ्यातील शिक्षक

मला जमेल हे ? मी

का नाही ? माझ्यातील शिक्षक

असं स्वतः सोबतच माझं संभाषण चालू असताना मे आय कम इन मॅम  ? असा आवाज येऊन मी भानावर आले .  मघाशी मी ज्या वर्गात तास घेतला होता त्या वर्गातील अक्षय नावाचा मुलगा होता . तो मला सांगायला आला होता कि मॅडम तुम्ही खूप छान शिकवत आहे. आम्हाला या आधी असं कोणीच शिकवलं नाही. मी थँक यु म्हणून तुला काही अभ्यासात शंका असेल तर विचार असं सांगून दिल .

लंच ब्रेक झाला मी माझ्या सोबत असलेल्या बाकीच्या शिक्षकानं सोबत डब्बा खायला बसले . जेवताना आमचा विषय चालू झाला . १ मॅडम म्हणाल्या मॅडम  आज पहिलाच दिवस ना ? मी  होकारार्थी मान हलवली . त्या सांगत होत्या मॅडम हि मोठी मुलं इंजिनीअरिंग आली म्हणजे त्यांना शिंगे येतात.  शिक्षक म्हणजे त्यांना काय वाटत त्यांनाच ठाऊक .तासाला बसायचं नाही , कंमेंट्स पास करायच्या, उलट उत्तरे द्यायची,  काही बोललं कि विभाग प्रमुखाकडे तक्रार द्यायची कि या मॅडम च आम्हाला शिकवलेलं समजत नाही. मग जाउद्यान कशाला आपण तरी मन लावून शिकवा. pass out झाले कि समजेल नोकरीची काय परिस्तिथी आहे .त्यांच्या बोलण्याला साथ देत दुसऱ्या मॅडम म्हणाल्या अहो आपल्या वेळी इंजिनीरिंग ची काय परिस्तिथी होती.  आपण किती अभ्यास करायचो! प्रत्येक गोष्ट यायलाच पाहिजे .हल्ली carry on ची फॅशन आली हो . नुसतं नावाला इंजिनिअर व्हायचं  . काही मुली तर चांगली स्थळ मिळण्यासाठी इंजिनिअर बनतात तर काही मुलं आई वडिलांनी घातलं म्हणूनच कॉलेजला येत आहे असे  बोलून आपल्यावरच उपकार करतात. हि मुलं बेधडक असं सांगतात शिक्षकांना याचंच आश्चर्य आहे.

त्यावर १ सर बोलले आपण आपले कर्तव्य करायचं ज्यांना शिकायचं आहे ते शिकतील. सर्वच अशी मुले नाहीत. काही जण त्यांना आयुष्यात काही तरी बनायचं आहे म्हणून येतात कॉलेजला. काही जणांची परिस्तिथी नाही अशी मुले शिष्यवृत्ती मिळवून शिकत आहेत.

मला तर वेडावल्या सारखं झालं. मी कॉलेज ला होते तेंव्हा आम्ही सुद्धा कंमेंट्स पास करायचो पण शिक्षकांना घाबरायचो देखील. शिक्षक-विद्यार्थ्यांचं नातं जपायचो. आता म्हणजे शिक्षक -विद्यार्थी खांद्यावर हात टाकून मित्र असल्या सारखे वागू लागले आहेत. असं १ का शिक्षकाने केलं तर त्याचे परिणाम स्रर्वांना भोगावे लागतात. त्यापेक्षा शिक्षक-विद्यार्थ्यांचं नातं maintain करा .
मला आता माझ्या शिक्षकाच्या अनुभव वरून १ गोष्ट चांगली समजली होती . तुम्हाला जर तुमच्या विषय मधील पूर्ण ज्ञान असेल आणि तुम्ही तुमच्या विषयासंबंधी सर्व शंकांचे निरसन व्यवस्तिथ करू शकत असाल तर मुलं तुमच्या तासाला गोंधळ घालत नाहीत किंवा कंमेंट्स पास करत नाहीत.

हे झालं शिकवण्या संबंधी पण १ पर्मनंट नसलेला शिक्षक याला त्या कॉलेजच्या राजकारणाला बळी पडाव लागत . तिथे सिनिअर -ज्युनिअर प्रकार असतो . ज्युनिअर लोकांनी सिनिअर शिक्षकांची कामे करायची . त्यात जर तुमचं कॉलेज असे  असेल तर तुमच्यावर कधी  राजकारण होऊन तुमची नोकरी जाईल याचा पत्ता लागायचा नाही. तुम्हाला सिनिअर शिक्षकानं पेक्षा जास्त विषय शिकवावे लागतात. तुम्हाला आवडेल तो विषय शिकवण्याची मुभा नसते. पगारच बोलायचं तर पर्मनंट शिक्षकाचा पगार लाखाच्या घरात आणि तोच ज्युनिअर पर्मनंट नसल्याचा हजाराच्या घरात . असो !!!!!

बहुतेक इंजिनीअरिंग ची मुलं हि मोठ्या घरची म्हणजे संपन्न कुटुंबातील असतात त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी कॉलेजला काही पैसे दान दिले असतील तर त्यांच्या मुलांच्या दादागिऱ्या शिक्षकाने सहन करायच्या. त्यांची कुवत नसताना त्यांना इंटर्नल मार्क्स जास्त द्यायचे. त्यांचे एक्सटेर्नल प्रॅक्टिकल्स सोडवायची असे प्रकार सुरु झाले आहेत.

असाच १ विद्यार्थी माझ्या वर्गात होता वर्ष भर कधीतरी तोंड दाखवायला यायचा पण त्याच्या आई-वडिलांनी कॉलेजला काही रक्कम दान दिली असल्या मुळे  माझ्या मनात नसताना त्याला पास करावं लागलं किती अन्याय आहे बाकीच्या मुलांवर हा ?
काही मुले तर इतकी उद्धट असतात कि सांगायला नको . सरळ बोलतात मॅडम चेक करता का नाही assignment नाही तर विभाग प्रमुखाला सांगतो . विभाग प्रमुख management  च्या नावाखाली त्यांच्यावरच पांघरून घालून मोकळे होतात. त्यात त्यांचा तरी काय दोष ? ऍडमिशन झाली नाहीत तर पगार कसे होणार? त्यामुळे  त्यांनाही तस वागणं भाग पडत.

पण या परिस्तिथीत मनापासून शिकवण्याची आस असून देखील दुर्लक्ष्य करावं लागत आणि त्या कळपातील मेंढ्यां प्रमाणे चालणं बंधनकारक होत. कारण जी २-४ मुलं  खरोखर शिकण्यासाठी येतात तीही शेवटच्या  वर्षात जाईपर्यंत सर्वां सारखीच उद्धट बनून जातात ,बदलून जातात . बाहेर एक्सट्रा क्लास जॉईन करत असल्यामुळे कॉलेज मध्ये शिकवण्यात लक्ष्य देत नाहीत . मग विद्यार्थ्यांना जर शिक्षकांची आणि शिकण्याची गरज नाही तर शिक्षक किती मागे फिरेल यांच्या?

म्हणून आज विद्यार्थी कस्टमर झाले आणि शिक्षक व्यावसायिक !!!!!

काही विद्यार्थी नापास झाले कि आत्महत्या सारखे प्रकार करतात त्यांच्या मुळे सरकारने अभ्यासक्रमात बदल केले, पास होण्यासाठी सोप्या पद्धती आणल्या आणि तेंव्हा पासुंन शिक्षणाची गुणवत्ता च कमी होऊन गेली.

आज प्रत्येक शिक्षक विचार करतो माझ्या शिकवण्याला जर किंमत मिळत नसेल तर मला माझा पगार मिळत आहे. मी कशाला इतका आटापिटा करून शिकवू ? विद्यार्थ्यांना आज शिक्षणाची गरज नाही त्यांना फक्त डिग्री ची गरज आहे. नाही का ?

आजच्या या परिस्तिथीला सरकार, शिक्षण पद्धती , बदलेल अभ्यासक्रम आणि पद्धत , शिक्षक , विद्यार्थी आणि पालक सर्व जबाबदार आहेत .


तुम्हीही तुमचे मत मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. 

धन्यवाद !

Saturday, 25 April 2020

jeevan pravas bhaag 1

चढ-उतार


 माणसाच्या आयुष्यात खूप चढ - उतार येतात असं मोठ्या माणसांकडून ऐकलं आहे. मी मात्र प्रत्यक्ष पाहिलं आहे माझ्या जीवन प्रवासात भेटलेल्या एका व्यक्तीच्या आयुष्यात.
तर मी आज जी गोष्ट सांगणार आहे किंवा जो चढ-उतार आहे तो आहे विमल च्या आयुष्यात आलेला.

विमल खूप भावनिक, मृदू मनाची, तशीच प्रसंगी खंबीर आणि आयुष्यात फारसं  गंभीर नसणारी मुलगी. आयुष्यात गंभीर नसणं म्हणजे तिच्या आयुष्यात आलेल्या संकटांना तिनी दुर्लक्ष्य करून हा गुण  मिळवला होता.
दिल्ली सारख्या मोठ्या शहरात वाढलेली विमल आई-वडिलांच्या उबदार कुशीत वाढत होती. विमलच्या परिवारा मध्ये विमल, तिचा मोठा भाऊ संजय , आई सुमन आणि वडील सुधीर असा चारच जणांचा सुखी परिवार होता. विमल लहानपणी शाळेत खूप खोड्या करायची त्यामुळे तिच्या आईला सारखं शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटायला जावं लागायचं. विमल अभ्यासात हुशार होतीच पण बाकीच्या (इतर ऍक्टिव्हिटी )मध्ये हि पारंगत होती. खोड्या काढायच्या सोडलं तर वाईट म्हणावा असा कोणताच गुण न्हवता. विमलची आई विमलला खूप समजवायची प्रसंगी मारायची सुद्धा पण तिनी काय खोड्या करायच्या बंद केल्या नाहीत. विमल चे बाबा नेहमी विमलची बाजू घेऊन तिच्या आई सोबत लटके वाद घालत " अरे  विमल तो मेरा कोहिनुर हिरा है । तुम देखणा इक दिन बहुत बडी बनेगी मेरी बेटी । असं बोलून बायकोला गप्प करणारे विमलचे वडील त्यांच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करायचे. 

विमल ची आई देखणी होती शिवाय सर्व कामांमध्ये निपुण असलेल्या विमल च्या आईला नोकरी करून पैसे मिळवावे व संसाराला हात भार लावला असे नेहमी वाटत . पण विमलच्या वडिलांना बायकोने नोकरी करणे पटत न्हवते त्यामुळे सुमन घरीच असायची. विमलच्या आईचे भौतिकशास्त्र विषय मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण झाले होते,तर तिचे वडील एका नामवंत कंपनी चे मॅनेजर होते. पैशाची कमी न्हवती पण बँक बॅलन्स हि न्हवता. येईल तो पैसा घराच्या सुखासाठी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या हौसमौज पुरवण्यात खर्च करायचा असा काहीसा त्यांचा विचार होता. पण विमल ची आई काटकसरी करणारी संसारिक बाई होती तिला विनाकारण पैसे खर्च केलेले पटत न्हवते . पण घरातल्या सुखामध्ये तीही रममाण झाली होती आणि उगाच वाद नकोत म्हणून गप्प राहायची . तिच्या पद्धतीने जिथे काटकसर होईल तिथे ती करायची आणि मनोमन खुश व्हायची. संजय हा आपल्या आई प्रमाणे काटकसर करणारा आणि जपून पैसे खर्च करणारा मुलगा होता, तर विमल तिच्या वडिलांसारखी पैशाची उधळपट्टी करणारी होती . असो पण त्यांचा सुखाचा संसार चालू असताना विमलच्या आयुष्यात एक  शेष नाग डसून तीच बालपण हिरावून घ्यायला आला. 

तिचे बाबा रात्री घरी येत असताना अचानक त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि ते काळ झाले. त्या प्रसंगी तिथे त्यांचं जवळ असं कोणीही  नसल्यामुळे तिच्या आई वर तर डोंगरच कोसळला होता. मुलं लहान त्यात जवळ कोणी नातेवाईक नाही. इतक्या मोठ्या शहरात सुमन एकटी पडली होती. तिला काहीही सुचत न्हवत. डोळ्यात अश्रू, निरागस लहान मुलं , अचानक आलेली संसाराची जबाबदारी या सर्व प्रसंगामुळे ती भांबावून गेली होती. तिला काहीच सुचेनासं झालं  होत. कसेबसे तिने सुधीरच्या मित्रांच्या मदतीने त्याचे अंत्यसंस्कार केले . काही जवळपासचे शेजारी-पाजारी मित्र-मैत्रिणींनी तिचे दोन-तीन दिवस सांत्वन केले व सर्व आपल्या कामात व्यस्त होऊन गेले. विमलचे बालपण हरवून ती आता मोठी झाल्या सारखं वागू लागली होती. त्यानंतर सुमनचे भाऊ तिला भेटायला दिल्ली ला आले ते डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्या वेळी इतक्या  दूर जाणं  शक्य झालं न्हवत. काही दिवस ते तिथेच राहून आपल्या बहिणीच्या संसाराची घडी बसून मार्गक्रमण झाले  होते. या वेळी संजय दहावीला होता आणि विमल सातवीला होती .त्यांच्या शाळेचा खर्च आता वाढला होता. घरात उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमी पडू लागले होते. सुमनला जास्त काम करायची गरज होती. तिनी शिलाई काम सुरु केले होते. त्यातून तिला पैसे मिळायचे व तिची आई तिला काही पैसे पाठवून देत . यावर तिने कसे बसे तीन-चार वर्ष काढले . संजय हुशार असल्यामुळे त्याने दहावीला चांगले गूण  मिळवून स्कॉलरशिप मिळवली होती. तो आता डिप्लोमा इंजिनीरिंग ला होता . विमलच बालपण मागे राहून ती बरीच समजूतदार आणि जबाबदार झाली होती. सुमन मात्र नवर्याच्या आठवणींनी व्याकुळ होऊन रडत असायची आणि सतत भविष्याच्या विचारात मग्न असायची . अशातच सुमन ला कॅन्सर सारख्या भयंकर रोगाने विळखा घातला. ज्या शेष नागाने विमलच बालपण हिरावून घेतलं तोच शेष नाग जणू आता तिच्या आई वर झडप घालून बसला होता. 

तिनी आपल्या  मुलांना तिच्या आजार विषयी काहीच कल्पना दिली न्हवती. त्या दोघांचं शिक्षण चालू होत आणि संजय च डिप्लोमाचा शेवटचं वर्ष होत अशातच त्या दोघांना आपल्या आजार विषयी कळालं तर त्यांचं शिक्षण अपूर्ण राहील या भीती मुले तिने त्यांना काहीच समजून दिल नाही. काही दिवसांनी संजय चा  निकाल आला त्याने सर्व विषयांमध्ये चांगले गूण मिळवले होते . आता त्याने इंजिनीरिंग ला ऍडमिशन घेतले होते. तसेच विमल ने हि डिप्लोमा करायचे ठरवल्या मुले त्या दोघांचा शिक्षणाचा खर्च त्यांना मिळालेल्या स्कॉलरशिप मधून होत  होता . शिवाय विमलचे मामा आजी आणि आजोबा सोडले तर त्यांना कोणाचाही आधार न्हवता. 

काही दिवस गेले असता सुमनला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या . तिला त्या वेदना असह्य होत होत्या सतत मुलांचे चेहरे समोर येत होते. ती सारखी देवाचा धावा  करीत होती कारण ती गेली तर तिची मुलं अनाथ होतील या नुसत्या विचारांनी देखील तिच्या अंगावर काटा यायचा. तिनी कसबस त्या वेळी स्वतःला सावरलं . आपल्या आजाराची कल्पना आता कुणाला तरी द्यावी याची जाणीव तिला झाली व तिने तिच्या डॉक्टर असलेल्या भावाला  तिच्या आजाराविषयी कल्पना दिली. पण खूप उशीर झाला होता. सुमन कडे फक्त सहाच महिने बाकी होते. नंतर तिच्या आजाराची कल्पना तिच्या दोन्ही मुलांना आली तेंव्हा विमल खूप रडली तिला सर्व थांबवायचं होत . पण वेळ कोणाला थांबली आहे? एका मुलीला तिची आई म्हणजे तीच सर्व असत आणि विमल ची सर्वात जवळची मैत्रीण सुद्धा तिची आईच होती. आणि आता तीच तिला सोडून जाणार म्हणल्यावर विमल खूप नाराज झाली दुःखी झाली . 

आणि असाच एक दिवस उगवला जो विमल आणि तिच्या भावाच्या आयुष्यात काळाकुट्ट अंधार घेऊन आला. विमलच्या आईला देवाज्ञा झाली. ती दोघे कोलमडून गेली त्या दुःखाने त्यांच्या आयुष्यात राम राहिला नाही. कोणीही नातेवाईक त्यांची जबाबदारी घेत न्हवत . कारण दोघेही इंजिनीरिंग करत असल्यामुळे शिक्षणाचा खर्च होता अशात या दोघांचा खर्च कोण करणार त्यामुळे त्या दोघांची जबाबदारी त्यांच्या थकलेल्या आजी आजोबांवर (आईचे आई-वडील) येऊन पडली. विमलच्या वडिलांकडे एकही नातेवाईक चांगला न्हवता जो त्या दोघांना आधार देईल. उलट त्या दोघांकडून कसे पैसे घेता येईल त्यांना कसं खर्चात पाडता  येईल हेच बघत असत. 

संजय इंजिनीरिंग च्या शेवटच्या वर्षाला होता आणि विमल डिप्लोमा च्या शेवटच्या वर्षाला होती . त्या दोघांच्या कॉलेज ची फीस सुरुवातीला आजी -आजोबांनी भरली व नंतर संजय चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला छान नोकरीही मिळाली. पण दिल्ली सारख्या शहरात राहणं आणि दोघांचा खर्च व बहिणीच्या शिक्षणाचा राहण्याचा व जेवणाचा खर्च त्याला करणं म्हणजे त्याची तारेवरची कसरत होती. विमल खूप एकटी पडली होती. ती तिच्या हॉस्टेल च्या मैत्रिणींबरोबर रमत तिचा वेळ घालवू लागली. कॉलेज ला सुट्टी लागली कि सर्व जणी आपापल्या घरी जायच्या पण विमल मात्र हॉस्टेल मधेच थांबायची . कारण तिच्या भावाने त्यांच्या फ्लॅट मध्ये बॅचलर मुले वस्ती साठी ठेवली होती व त्यांच्या कडून जे रूम भाडे जमा व्हायचे त्यातून तो खर्च चालवायचा. 

अनाथ असलेली विमल खूप रडायची तीच आयुष्य जणू एकटेपणाने आणि दुःखांनी व्यापून टाकलं होत. तिला कधी कधी नाश्ता करायचा म्हणाल तर पैसे नसल्याचे ती एक एक वेळ चहा पिऊन गप्प बसायची पण दादाला त्रास नको तो कुठून पैसे आणणार यामुळे ती त्याला सांगायची देखील नाही. एक दिवस अचानक त्यांना त्यांच्या वडिलांच्या कंपनी मधून पाच लाख रुपये मिळाले. त्यांना खूप आनंद झाला त्यामुळे विमलच्या शिक्षणाची सोय झाली होती . अश्या प्रकारे खूप दुःख , कष्ट आणि मेहनत घेऊन विमल ने राहिलेले शिक्षण पूर्ण केले व नोकरी मिळवली. आता दोघे भाऊ बहीण सोबत राहतात दोघे कमावतात आणि खुश आहेत. त्यांच्या दुःखात साथ देणाऱ्या आजी-आजोबांना ते भेटायला जातात त्यांची काळजी घेतात. संजय च आता लग्न झालं आहे . त्याच्या मामांच्या मुली सोबतच त्यामुळे लग्नाचा बराच खर्च वाचला. त्या दोघांचं चांगलं पटत आणि ती डॉक्टर असल्यामुळे दोघांचा संसाराला हातभार होतो. 

विमल ची नोकरी मध्ये बढती झाली असून अद्याप ती लग्नाचा विचार करत नाही. दादा-वहिनी सोबत ती सध्या खुश आहे आणि त्यांचा परिवार सुखात आहे. 
. .

. . 

. . 


असे चढ-उतार येऊनही विमल आता स्तब्ध आहे एखाद्या पर्वता सारखी . तिला आता कोणतही दुःख हलवू शकत नाही. अश्या विमलला माझा सलाम  !!!!

पण तुम्ही जर विमलच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असत? आई-वडिलांचं छत्र हरवलेलं असताना तुम्ही नेमकं कोणतं पाऊल उचललं असतं ? तुमच्या प्रतिक्रिया मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून जरूर कळवा . 

धन्यवाद !

Thursday, 23 April 2020

jeevan pravas__आयुष्य हे

                                                                   आयुष्य हे


आज बऱ्याचं दिवसांनी वेळ मिळाला काही तरी लिहिण्या साठी. वेळ मिळाला म्हणजे या आधी कधी अस वाटलच न्हवत की  मी कधी असं लिहू शकेन. आज मला माझ्या यजमानांनी प्लॅटफॉर्म सांगितला कि मी कस आणि कुठे लिहू शकते . त्यांना  मी प्रथम धन्यवाद देते.  आज मी माझ्या जीवन प्रवासात भेटलेल्या एका स्त्री ची कहाणी   सांगत आहे.  वसुधा एका छोट्या शहरात राहणारी मुलगी . वर्ण गोरा आणि बांधा माध्यम असेल फार काही चुणचुणीत नाही पण खूप अल्लड अशी एकंदरीत तीच वर्णन आहे. तिची आई एका छोट्या खेडेगावातून लग्न करून शहरात आली होती. वडिलांचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता पण घरी प्रॉपर्टी म्हणाल तर खूप होती .वसुधा च्या वडिलांना हल्ली दारूचं व्यसन लागलं होत त्यातच त्यांनी त्यांची खूप प्रॉपर्टी घरी न सांगता विकून टाकली होती. वसुधा ला एक मोठा भाऊ होता विनायक. वसुधाच्या आजोबांना कॅन्सर सारखा आजार असल्या कारणाने  ते किती तरी वर्ष अंथरुणाला खिळून होते. आता तुमच्या लक्षात आलेच असेल त्यांच्या कुटुंबात पाच माणसे राहत होती. खाणारी तोंड पाच आणि कमावणारा एकटा वसुधाचा बाप होता. दोन लहान मुलं शाळेत शिकत होती. आई चा पूर्ण दिवस सासऱ्यांची सेवा करण्यात आणि त्यांनी मागेल तो पदार्थ करून घालण्यात दिवस जायचा. वडील दिवसभर भाजी विकून मिळेल त्या पैश्यां पैकी दारू पिऊन घरी यायचे. असा दिनक्रम चालू होता. वसुधाच्या आईला मात्र याचा खूप त्रास होत होता. त्यातच भर म्हणून त्यांच्या घरी त्यांच्या पाहुण्यांची सारखी वर्दळ असायची, सासऱ्यांच्या सेवे सोबत तिच्या आईला त्यांच्या पाहुण्यांची उठाठेव करावी लागत असत. तिच्या आई ला सतत तिच्या मुलांची काळजी लागलेली होती . कारण दारुड्या नवऱ्या सोबत तिला असं किती दिवस काढावे लागणार तिला सुद्धा माहिती न्हवत. सतत चिंतेत असणारी वसुधेची आई नेहमी गप्प असायची तीच दुःख ती कोणाला सांगत नसत. वसुधा मात्र या गोष्टीं पासून अलिप्त होती कारण खेळकर आणि अल्लड वसुधा लहान असल्यामुळे तिला या गोष्टी कळत न्हवत्या. एक दिवस तिचे वडील खूप दारू पिऊन घरी आले आणि तिच्या आईला खूप मारू लागले . दोन्ही मुलं  दचकून जागी झाली आणि घाबरून जिन्या खाली लपून बसली. आपल्या बापाला अश्या अक्राळ-विक्राळ रूपात त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होत.  

विनायक आता थोडा मोठा झाला होता तो घरच्या कामात आईला मदत करत असे. वसुधा पण लहान असली तरी त्या घटनेमुळे  तिच्या बाल  मनावर थोडा का होईना बदल झाला होता. वसुधा आता तिच्या खेळण्या कडे जास्त लक्ष्य न देता आईला मदत करण्यात वेळ घालवू लागली होती. माय-लेकरांना या अश्या परिस्थितीची आता जणू सवयच लागून गेली होती.असे तब्बल पाच वर्ष चालू असताना वसुधाचे आजोबा देवा घरी गेले. तिच्या वडीलांच्या स्वभावा मध्ये फारसा बदल झाला नसला तरी मुलं मोठी झाली आहेत आता बायकोला मारहाण कारण चुकीचं आहे असं समजावण्याचा हर तर्हेने प्रयत्न करून थकलेली मंडळी आता कमीच होऊ लागली होती. आजोबा गेल्या मुळे वसुधेच्या आईला कामाचा त्रास कमी झाला  होता. आता विनायक दहावी पास होऊन पुढच्या वर्गात शिकत होता आणि वसुधा नववी मध्ये होती. एके दिवशी वसुधेच्या आईला पोटाचा त्रास होऊ लागला म्हणून तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेले विनायकाचे वडील घाबरले होते कारण हि तसच होतं.वसुधेच्या आईच्या पोटाची शस्त्रक्रीया करायला लागणार होती आणि त्या साठी खूप पैसे हि हवे होते. या बरोबर घरची काम करता येणार न्हवती. वसुधा ची आई तर पुरती घाबरली होती. तिला माहित होत दारुड्या नवऱ्याने कधी आपल्या मुलांना खायला खाऊ आणला नाही, कधी त्यांच्या शाळेत सोडायला गेला नाही, त्यांना कधी नीट पुस्तकं  घेऊन दिल नाही कि शाळेचा गणवेश . प्रॉपर्टी असली तरी काय कामाची होती. कोड-कौतुक लाड करायच्या वेळी केले

न्हवते आणि आता अपेक्षा हि न्हवती. शेजारच्या मुलांची फाटकी पुस्तकं आणि गणवेश घेऊन आत्ता पर्यंत शिक्षण घेणारे वसुधा-विनायक मनातून आईच्या शत्रक्रियेची बातमी ऐकून खूप घाबरून गेले होते. त्यांना खात्री वाटत न्हवती कि त्यांचे वडील आपल्या आईची शस्त्रक्रिया करण्या साठी पैसे गोळा करतील. अशा परीस्थितीत त्यांच्या वडिलांनी राहते घर गहाण ठेऊन पैसे उभे केले . नाही तरी ते कधी ना कधी होणारच होत . पण समाधान याच होतं कि ते पैसे आता आईच्या शस्त्रक्रियेसाठी उपयोगी येणार. 

थोड्या दिवसांनी शत्रक्रिया  यशस्वी झाली आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या दुसऱ्या घरी राहण्यासाठी गेले. कारण आधीच्या घरा  पासून दवाखान्याचे अंतर खूप होते ,ते सोईस्कर व्हावे म्हणून ते दवाखान्या शेजारी असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरी राहण्या साठी गेले होते. नवीन घर आधीच्या घरापेक्षा खूप प्रशस्त आणि छान होते. पण त्या मागचे सत्य न जाणणारी मंडळी मात्र खुश होती. वसुधाच्या वडिलांनी त्या घरासाठी खूप कर्ज केले होते आणि याची कल्पना त्या तिघांनाही न्हवती. असो ! घरात आई आजारी वडील दारुडे असताना विनायकाचे शिक्षण १२ वीचे चालू होते आणि वसुधा दहावी मध्ये शिकत होती. आई बरी झाली असली तरी ती खूपच स्थूल आणि थकलेली होऊन गेली होती. अशातच काळाने घात  घातला आणि वसुधाच्या वडिलांचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा हात व पाय निकामी झाला तो कायमचा. आता थोडा फार पैसा येत होता तोही पूर्ण बंद झाला होता. शिवाय अपघात मध्ये खूप खर्च करून अपंग झालेल्या वडिलांची अवस्था पाहून वसुधा पूर्ती गोंधळून गेली होती. घरची जबाबदारी तिच्या आणि विनायकाच्या अंगावर येऊन कोसळली. शिवाय वसुधाच्या आजोळी कोणी मदत करणारे न्हवते. बिचारी वसुधा दहावी मध्ये नापास झाली. अभ्यासामध्ये जेमतेम असणारी वसुधेचे मन आता अभ्यासातून कायमचे निघाले होते आणि तिनी घरचीच कामे करण्याचे ठरवले. विनायक मात्र बारावी मध्ये पास झाला असला तरी त्याला नोकरी करणे भाग होते. त्याने एका किराणा दुकाने मध्ये नोकरी धरली आणि त्यामधून त्याने घराला हातभार लावायला सुरुवात केली. रोज रोज पोटाचा प्रश्न आणि त्यातच नवऱ्याचा औषधांचा खर्च दिवसेंदिवस करणं अवघड झालं. आता विनायक ला कुठे तरी चांगली नोकरी धरणं भाग झालं. पण अपुरे शिक्षण आणि घरची बिघडलेली परीस्थिती मध्ये चांगली नोकरी आणि शिक्षण करणे विनायकला अवघड  झाले होते.  पण देवाच्या दयेने विनायकला एका कंपनी मध्ये नोकरी मिळाली व त्याला आता त्याचे घर सांभाळता येऊ लागले. अशी सुमारे चार वर्ष चालले होते. घरात बाप आजारी आईच पण दुखणं असायचं भाऊ कष्ट करून नोकरी करतो आहे हे पाहून वसुधाने विणकाम भरतकाम करून पैसे मिळवायला सुरुवात केली होती. 

एक दिवशी वसुधा च्या आई वडिलांनी वसुधाचं लग्न करण्याचा विचार केला. खूप स्थळ ही येत होती पण वयामध्ये अंतर आहे , पत्रिका जुळत नाही, मुलगा दिसायला चांगला नाही अशी बरीच कारण झाली आणि शेवटी देवाने स्वर्गात बांधून ठेवलेला वर मुलीला पाहायला वसुधाच्या घरी आला. कांदे पोहे झाले लागण ठरलं . सर्व आनंदात पार पडलं . वसुधाच चांगलं झालं . सुटली बिचारी आई-बापाच्या घरून असं जरी वाटत असल तरी सत्य मात्र खूप वेगळं होत. कधी कधी माणसाला इकडे आड आणि तिकडे विहीर असं होऊन जात . तसेच काही वसुधाच्या बाबतीत झालं. आगीतून सुटून फुपाट्यात पडली होती वसुधा. 

वैवाहिक जीवन  जेमतेम चाललं होत. घरात सासू सासरे ,एक मनोरुग्ण असलेला  दीर , आणि वसुधा व तिचा नवरा किशोर असा परिवार होता. वसुधा त्या सर्वां सोबत मिळत  जुळत घेत असताना तिची दमछाक व्हायची. तिची सासू खूप खाष्ट होती . तिला तिच्या सासूचा खूपच जाच  होता. तिनी तिच्या प्रेमळ आणि मन मिळावु स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेतली होती. आता कुठे सुरळीत होत होत तेवढ्यात किशोरची नोकरी गेली. आता नवीन नोकरी शोधावी लागणार त्यासाठी किशोर शहरात गेला . वसुधा मात्र गावीच  राहिली होती. तिला तिथे एकटीने राहणे अगदी जीवावर यायचं . ती याच कल्पनेनी खुश व्हायची किशोरला नोकरी मिळाली कि ती पण शहरात जाणार. आता किशोरला नोकरी मिळाली न्हवती त्यामुळे तीच शहरात जाणं अजूनच लांबणीवर पडलं होतं. एक वर्ष गेलं तेंव्हा किशोरला नोकरी मिळाली. आणि शेवटी वसुधाच्या आयुष्यातला तो सोनेरी दिवस उगवला. आता वसुधा किशोर सोबत शहरात जाणार होती. गावी असताना त्या दोघांना एकांत असा मिळालाच न्हवता आता तरी तो मिळेल आणि सुखाचे दिवस सुरु होतील असे वसुधाला वाटत होते. 

वसुधा आणि किशोर शहरात राहायला गेले. जाताना वसुधेला लग्नात जे काही भांडी दिली होती ती सर्व ती घेऊन गेली होती ती गावी कधीच न येण्याच्या विचाराने . कारण सासूच्या छळा ला आणि मनोरूग्ण असलेल्या दिराला ती कंटाळली होती. इकडे वसुधा व किशोरने आपला छोटासा संसार मंडल होता. वसुधा हि नोकरी करायची दोघे नोकरी करून संसाराला हात भार लावायचे , गावी पैसे पाठवायचे. सर्व काही  सुखात आणि सुरळीत चालले होते. वसुधाचे आई वडील आणि भाऊ यांचं पण आता ठीक चाललं होत. लग्नाला दोन वर्ष होत आले होते आणि ज्याची सर्व जण वाट पाहत होते ती बातमी आली . वसुधाला  दिवस गेले होते. सर्व काही आनंदात होते. वसुधेला तर परमानंद झाला  होता. वसुधे ची आई तर बाळाची स्वप्न पाहून हरकून गेली होती. आजी व्हायच्या कल्पनेत गडून गेली होती. वसुधेला आता तिसरा महिना लागला होता. सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. तिच्या मनावरचे दडपण कमी झाले . किशोर आता ओव्हरटाईम करून जास्त पैसे मिळवू लागला . त्या दोघांना बाळाची स्वप्ने बघून बघून खरोखरच बाळ घरात असल्या सारखं वाटत . दोघे खूप आनंदात होते आणि जबाबदार सुद्धा. 

एक काळाकुट्ट अंधार त्या दोघांच्या आयुष्यात घेऊन येणार तो दिवस उजाडला . वसुधेला उलट्या व्हायला सुरुवात झाली. तिला चक्कर हि येत होती . त्या दिवशी किशोर लवकरच कामावर निघून गेला होता कारण सायंकाळी लवकर येऊन त्यांना दवाखान्यात जायचे होते. वसुधाने नेहमीची काम उरकली. दुपारी जेवण केलं . किशोरला फोन सुद्धा केला व जाऊन झोपणार इतक्यात जोराची चक्कर आली आणि ती धाडकन जमिनी वर कोसळली . तिच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. तिला त्या वेदना सहन होत न्हवत्या. आता शेजारी कळवल्या शिवाय पर्याय न्हवता . शेजारच्या काकूंनी तिला दवाखान्यात नेले पण जे नको होते तेच झाले. वसुधेचे बाळ गेले!
वसुधा ला खूप दुःख झालं . तिनी पाहिलेली स्वप्न तुटली त्यांचा चुराडा झाला होता . ती जखम तिच्या मनावर खोल वर रुतली होती. किशोर तिला समजून घेत होता वेळो-वेळी समजावून सांगत होता. किशोर मुळातच शांत आणि गोड स्वभावाचा असल्यामुळे त्याने वसुधाला समजून घेऊन या परिस्तिथीमधून तिला बाहेर काढलं होत. आणि त्यांचा संसार पुन्हा एकदा नव्याने सुरु झाला होता. 

पण त्या विधात्याच्या मनात काही वेगळंच होत. त्याच्या समोर कितीही प्रार्थना केल्या कितीही गयावया केल्या तरी त्या सठविणे लिहलेलं नशीब काही बदलता येत का? आज वसुधा आणि किशोर यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झ्हाली सर्व दवाखाने सर्व उपाय करूनही त्यांना संतती सौख्य मिळालं नाही . आता वसुधा कंटाळून गेली आहे तिचा हिरमोड झाला. किशोर सुद्धा या नशिबावर खिन्न आहे . पण आशेचा किरण अजून मनात आहे. वसुधा मात्र कधी खूपच निराश झाली कि आत्महत्येचा विचार करते. तुम्हाला काय वाटत तिनी काय करावं ? काही वर्ष लोटून जातात . 


अरे  हो !आनंदाची बातमी हि कि वसुधा आता गरोदर आहे . लवकरच तिला बाळ होणार आहे आणि हरवलेली सुख माघारी येणार आहेत. 


पण वसुधाच्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असत ? जेंव्हा आत्महत्येचा विचार मनात यायचा तेंव्हा तुम्ही काय केलं असत ? असं आयुष्य तुमच्या वाट्याला आलं असत तर तुम्ही काय केलं असत ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा . 


धन्यवाद !!!