Monday, 6 July 2020

समोसा

समोसा

साहित्य: पाव किलो हिरवे वाटणे, २-३ मध्यम आकाराचे बटाटे, हिरवी मिरची, जिरे मोहरी, हिंग, काळी मिरे पूड,धना पावडर, जिरा पावडर, मीठ, लाल मिरची पावडर, मैदा, ओवा, हळद, कोथिंबीर, कढीपत्ता व तेल इत्यादी

कृती:  १) कणिक

एका ताटामध्ये २ कप मैदा घ्या त्या मध्ये १ छोटा चमचा ओवा टाका, चवीनुसार मीठ घाला व २ चमचे थंड तेलाचे मोहन घालून घट्टसर कणिक मळून घ्या. कणिक १५ मिनिटे रेस्ट करा व तोपर्यंत समोसा मध्ये घालण्यासाठी सारण बनवून घेऊ.

२) स्टफिन्ग (सारण)

पाव किलो वाटणे आणि बटाटे शिजवून घ्या. ते कुस्करून एकत्र करा त्यावर अर्धा छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा काळी मिरे पूड,१ छोटा चमचा धना पावडर, एक छोटा चमचा जिरा पावडर, एक छोटा चमचा लाल मिरची पावडर,टाकून मिक्स करा . नंतर एका कढई मध्ये २ चमचे तेल घाला त्यामध्ये जिरे-मोहरी व कढीपत्ता घालून फोडणी बनवा. त्या फोडणी मध्ये स्मॅश केलेले बटाट्याचे मिश्रण घाला व संपूर्ण मिश्रण ८-९ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या. गॅस बंद करा व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व मिश्रण थंड होऊद्या.

३) समोसा

आता समोसा करण्यासाठी प्रथम एक छोटा कणकेचा गोळा घ्या आणि त्याची छोटी चपाती लाटा. ती चपाती मधून कापून बरोबर समान भाग करून घ्या. आता अर्ध्या चपातीचा भाग मधून दुमडून कोन बनवा आणि त्या मध्ये बटाटा व वाटण्याचे सारण भरून कोन  व्यवस्थित चिटकवून घ्या. मंद किंवा मध्यम आचेवर समोसे तळून घ्या. समोसे भाजण्यासाठी १० मि. वेळ लागतो.

मी इथे विडिओ share करते तो पहा म्हणजे तुम्हाला कोन बनवण्यास मदत होईल.








समोसा तुम्ही पुदिना चटणी, ओल्या नारळाची चटणी, शेजवान चटणी किंवा टोमॅट्टो सॉस सोबत खाऊ शकता.