Saturday, 25 April 2020

jeevan pravas bhaag 1

चढ-उतार


 माणसाच्या आयुष्यात खूप चढ - उतार येतात असं मोठ्या माणसांकडून ऐकलं आहे. मी मात्र प्रत्यक्ष पाहिलं आहे माझ्या जीवन प्रवासात भेटलेल्या एका व्यक्तीच्या आयुष्यात.
तर मी आज जी गोष्ट सांगणार आहे किंवा जो चढ-उतार आहे तो आहे विमल च्या आयुष्यात आलेला.

विमल खूप भावनिक, मृदू मनाची, तशीच प्रसंगी खंबीर आणि आयुष्यात फारसं  गंभीर नसणारी मुलगी. आयुष्यात गंभीर नसणं म्हणजे तिच्या आयुष्यात आलेल्या संकटांना तिनी दुर्लक्ष्य करून हा गुण  मिळवला होता.
दिल्ली सारख्या मोठ्या शहरात वाढलेली विमल आई-वडिलांच्या उबदार कुशीत वाढत होती. विमलच्या परिवारा मध्ये विमल, तिचा मोठा भाऊ संजय , आई सुमन आणि वडील सुधीर असा चारच जणांचा सुखी परिवार होता. विमल लहानपणी शाळेत खूप खोड्या करायची त्यामुळे तिच्या आईला सारखं शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटायला जावं लागायचं. विमल अभ्यासात हुशार होतीच पण बाकीच्या (इतर ऍक्टिव्हिटी )मध्ये हि पारंगत होती. खोड्या काढायच्या सोडलं तर वाईट म्हणावा असा कोणताच गुण न्हवता. विमलची आई विमलला खूप समजवायची प्रसंगी मारायची सुद्धा पण तिनी काय खोड्या करायच्या बंद केल्या नाहीत. विमल चे बाबा नेहमी विमलची बाजू घेऊन तिच्या आई सोबत लटके वाद घालत " अरे  विमल तो मेरा कोहिनुर हिरा है । तुम देखणा इक दिन बहुत बडी बनेगी मेरी बेटी । असं बोलून बायकोला गप्प करणारे विमलचे वडील त्यांच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करायचे. 

विमल ची आई देखणी होती शिवाय सर्व कामांमध्ये निपुण असलेल्या विमल च्या आईला नोकरी करून पैसे मिळवावे व संसाराला हात भार लावला असे नेहमी वाटत . पण विमलच्या वडिलांना बायकोने नोकरी करणे पटत न्हवते त्यामुळे सुमन घरीच असायची. विमलच्या आईचे भौतिकशास्त्र विषय मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण झाले होते,तर तिचे वडील एका नामवंत कंपनी चे मॅनेजर होते. पैशाची कमी न्हवती पण बँक बॅलन्स हि न्हवता. येईल तो पैसा घराच्या सुखासाठी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या हौसमौज पुरवण्यात खर्च करायचा असा काहीसा त्यांचा विचार होता. पण विमल ची आई काटकसरी करणारी संसारिक बाई होती तिला विनाकारण पैसे खर्च केलेले पटत न्हवते . पण घरातल्या सुखामध्ये तीही रममाण झाली होती आणि उगाच वाद नकोत म्हणून गप्प राहायची . तिच्या पद्धतीने जिथे काटकसर होईल तिथे ती करायची आणि मनोमन खुश व्हायची. संजय हा आपल्या आई प्रमाणे काटकसर करणारा आणि जपून पैसे खर्च करणारा मुलगा होता, तर विमल तिच्या वडिलांसारखी पैशाची उधळपट्टी करणारी होती . असो पण त्यांचा सुखाचा संसार चालू असताना विमलच्या आयुष्यात एक  शेष नाग डसून तीच बालपण हिरावून घ्यायला आला. 

तिचे बाबा रात्री घरी येत असताना अचानक त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि ते काळ झाले. त्या प्रसंगी तिथे त्यांचं जवळ असं कोणीही  नसल्यामुळे तिच्या आई वर तर डोंगरच कोसळला होता. मुलं लहान त्यात जवळ कोणी नातेवाईक नाही. इतक्या मोठ्या शहरात सुमन एकटी पडली होती. तिला काहीही सुचत न्हवत. डोळ्यात अश्रू, निरागस लहान मुलं , अचानक आलेली संसाराची जबाबदारी या सर्व प्रसंगामुळे ती भांबावून गेली होती. तिला काहीच सुचेनासं झालं  होत. कसेबसे तिने सुधीरच्या मित्रांच्या मदतीने त्याचे अंत्यसंस्कार केले . काही जवळपासचे शेजारी-पाजारी मित्र-मैत्रिणींनी तिचे दोन-तीन दिवस सांत्वन केले व सर्व आपल्या कामात व्यस्त होऊन गेले. विमलचे बालपण हरवून ती आता मोठी झाल्या सारखं वागू लागली होती. त्यानंतर सुमनचे भाऊ तिला भेटायला दिल्ली ला आले ते डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्या वेळी इतक्या  दूर जाणं  शक्य झालं न्हवत. काही दिवस ते तिथेच राहून आपल्या बहिणीच्या संसाराची घडी बसून मार्गक्रमण झाले  होते. या वेळी संजय दहावीला होता आणि विमल सातवीला होती .त्यांच्या शाळेचा खर्च आता वाढला होता. घरात उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमी पडू लागले होते. सुमनला जास्त काम करायची गरज होती. तिनी शिलाई काम सुरु केले होते. त्यातून तिला पैसे मिळायचे व तिची आई तिला काही पैसे पाठवून देत . यावर तिने कसे बसे तीन-चार वर्ष काढले . संजय हुशार असल्यामुळे त्याने दहावीला चांगले गूण  मिळवून स्कॉलरशिप मिळवली होती. तो आता डिप्लोमा इंजिनीरिंग ला होता . विमलच बालपण मागे राहून ती बरीच समजूतदार आणि जबाबदार झाली होती. सुमन मात्र नवर्याच्या आठवणींनी व्याकुळ होऊन रडत असायची आणि सतत भविष्याच्या विचारात मग्न असायची . अशातच सुमन ला कॅन्सर सारख्या भयंकर रोगाने विळखा घातला. ज्या शेष नागाने विमलच बालपण हिरावून घेतलं तोच शेष नाग जणू आता तिच्या आई वर झडप घालून बसला होता. 

तिनी आपल्या  मुलांना तिच्या आजार विषयी काहीच कल्पना दिली न्हवती. त्या दोघांचं शिक्षण चालू होत आणि संजय च डिप्लोमाचा शेवटचं वर्ष होत अशातच त्या दोघांना आपल्या आजार विषयी कळालं तर त्यांचं शिक्षण अपूर्ण राहील या भीती मुले तिने त्यांना काहीच समजून दिल नाही. काही दिवसांनी संजय चा  निकाल आला त्याने सर्व विषयांमध्ये चांगले गूण मिळवले होते . आता त्याने इंजिनीरिंग ला ऍडमिशन घेतले होते. तसेच विमल ने हि डिप्लोमा करायचे ठरवल्या मुले त्या दोघांचा शिक्षणाचा खर्च त्यांना मिळालेल्या स्कॉलरशिप मधून होत  होता . शिवाय विमलचे मामा आजी आणि आजोबा सोडले तर त्यांना कोणाचाही आधार न्हवता. 

काही दिवस गेले असता सुमनला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या . तिला त्या वेदना असह्य होत होत्या सतत मुलांचे चेहरे समोर येत होते. ती सारखी देवाचा धावा  करीत होती कारण ती गेली तर तिची मुलं अनाथ होतील या नुसत्या विचारांनी देखील तिच्या अंगावर काटा यायचा. तिनी कसबस त्या वेळी स्वतःला सावरलं . आपल्या आजाराची कल्पना आता कुणाला तरी द्यावी याची जाणीव तिला झाली व तिने तिच्या डॉक्टर असलेल्या भावाला  तिच्या आजाराविषयी कल्पना दिली. पण खूप उशीर झाला होता. सुमन कडे फक्त सहाच महिने बाकी होते. नंतर तिच्या आजाराची कल्पना तिच्या दोन्ही मुलांना आली तेंव्हा विमल खूप रडली तिला सर्व थांबवायचं होत . पण वेळ कोणाला थांबली आहे? एका मुलीला तिची आई म्हणजे तीच सर्व असत आणि विमल ची सर्वात जवळची मैत्रीण सुद्धा तिची आईच होती. आणि आता तीच तिला सोडून जाणार म्हणल्यावर विमल खूप नाराज झाली दुःखी झाली . 

आणि असाच एक दिवस उगवला जो विमल आणि तिच्या भावाच्या आयुष्यात काळाकुट्ट अंधार घेऊन आला. विमलच्या आईला देवाज्ञा झाली. ती दोघे कोलमडून गेली त्या दुःखाने त्यांच्या आयुष्यात राम राहिला नाही. कोणीही नातेवाईक त्यांची जबाबदारी घेत न्हवत . कारण दोघेही इंजिनीरिंग करत असल्यामुळे शिक्षणाचा खर्च होता अशात या दोघांचा खर्च कोण करणार त्यामुळे त्या दोघांची जबाबदारी त्यांच्या थकलेल्या आजी आजोबांवर (आईचे आई-वडील) येऊन पडली. विमलच्या वडिलांकडे एकही नातेवाईक चांगला न्हवता जो त्या दोघांना आधार देईल. उलट त्या दोघांकडून कसे पैसे घेता येईल त्यांना कसं खर्चात पाडता  येईल हेच बघत असत. 

संजय इंजिनीरिंग च्या शेवटच्या वर्षाला होता आणि विमल डिप्लोमा च्या शेवटच्या वर्षाला होती . त्या दोघांच्या कॉलेज ची फीस सुरुवातीला आजी -आजोबांनी भरली व नंतर संजय चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला छान नोकरीही मिळाली. पण दिल्ली सारख्या शहरात राहणं आणि दोघांचा खर्च व बहिणीच्या शिक्षणाचा राहण्याचा व जेवणाचा खर्च त्याला करणं म्हणजे त्याची तारेवरची कसरत होती. विमल खूप एकटी पडली होती. ती तिच्या हॉस्टेल च्या मैत्रिणींबरोबर रमत तिचा वेळ घालवू लागली. कॉलेज ला सुट्टी लागली कि सर्व जणी आपापल्या घरी जायच्या पण विमल मात्र हॉस्टेल मधेच थांबायची . कारण तिच्या भावाने त्यांच्या फ्लॅट मध्ये बॅचलर मुले वस्ती साठी ठेवली होती व त्यांच्या कडून जे रूम भाडे जमा व्हायचे त्यातून तो खर्च चालवायचा. 

अनाथ असलेली विमल खूप रडायची तीच आयुष्य जणू एकटेपणाने आणि दुःखांनी व्यापून टाकलं होत. तिला कधी कधी नाश्ता करायचा म्हणाल तर पैसे नसल्याचे ती एक एक वेळ चहा पिऊन गप्प बसायची पण दादाला त्रास नको तो कुठून पैसे आणणार यामुळे ती त्याला सांगायची देखील नाही. एक दिवस अचानक त्यांना त्यांच्या वडिलांच्या कंपनी मधून पाच लाख रुपये मिळाले. त्यांना खूप आनंद झाला त्यामुळे विमलच्या शिक्षणाची सोय झाली होती . अश्या प्रकारे खूप दुःख , कष्ट आणि मेहनत घेऊन विमल ने राहिलेले शिक्षण पूर्ण केले व नोकरी मिळवली. आता दोघे भाऊ बहीण सोबत राहतात दोघे कमावतात आणि खुश आहेत. त्यांच्या दुःखात साथ देणाऱ्या आजी-आजोबांना ते भेटायला जातात त्यांची काळजी घेतात. संजय च आता लग्न झालं आहे . त्याच्या मामांच्या मुली सोबतच त्यामुळे लग्नाचा बराच खर्च वाचला. त्या दोघांचं चांगलं पटत आणि ती डॉक्टर असल्यामुळे दोघांचा संसाराला हातभार होतो. 

विमल ची नोकरी मध्ये बढती झाली असून अद्याप ती लग्नाचा विचार करत नाही. दादा-वहिनी सोबत ती सध्या खुश आहे आणि त्यांचा परिवार सुखात आहे. 
. .

. . 

. . 


असे चढ-उतार येऊनही विमल आता स्तब्ध आहे एखाद्या पर्वता सारखी . तिला आता कोणतही दुःख हलवू शकत नाही. अश्या विमलला माझा सलाम  !!!!

पण तुम्ही जर विमलच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असत? आई-वडिलांचं छत्र हरवलेलं असताना तुम्ही नेमकं कोणतं पाऊल उचललं असतं ? तुमच्या प्रतिक्रिया मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून जरूर कळवा . 

धन्यवाद !

Thursday, 23 April 2020

jeevan pravas__आयुष्य हे

                                                                   आयुष्य हे


आज बऱ्याचं दिवसांनी वेळ मिळाला काही तरी लिहिण्या साठी. वेळ मिळाला म्हणजे या आधी कधी अस वाटलच न्हवत की  मी कधी असं लिहू शकेन. आज मला माझ्या यजमानांनी प्लॅटफॉर्म सांगितला कि मी कस आणि कुठे लिहू शकते . त्यांना  मी प्रथम धन्यवाद देते.  आज मी माझ्या जीवन प्रवासात भेटलेल्या एका स्त्री ची कहाणी   सांगत आहे.  वसुधा एका छोट्या शहरात राहणारी मुलगी . वर्ण गोरा आणि बांधा माध्यम असेल फार काही चुणचुणीत नाही पण खूप अल्लड अशी एकंदरीत तीच वर्णन आहे. तिची आई एका छोट्या खेडेगावातून लग्न करून शहरात आली होती. वडिलांचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता पण घरी प्रॉपर्टी म्हणाल तर खूप होती .वसुधा च्या वडिलांना हल्ली दारूचं व्यसन लागलं होत त्यातच त्यांनी त्यांची खूप प्रॉपर्टी घरी न सांगता विकून टाकली होती. वसुधा ला एक मोठा भाऊ होता विनायक. वसुधाच्या आजोबांना कॅन्सर सारखा आजार असल्या कारणाने  ते किती तरी वर्ष अंथरुणाला खिळून होते. आता तुमच्या लक्षात आलेच असेल त्यांच्या कुटुंबात पाच माणसे राहत होती. खाणारी तोंड पाच आणि कमावणारा एकटा वसुधाचा बाप होता. दोन लहान मुलं शाळेत शिकत होती. आई चा पूर्ण दिवस सासऱ्यांची सेवा करण्यात आणि त्यांनी मागेल तो पदार्थ करून घालण्यात दिवस जायचा. वडील दिवसभर भाजी विकून मिळेल त्या पैश्यां पैकी दारू पिऊन घरी यायचे. असा दिनक्रम चालू होता. वसुधाच्या आईला मात्र याचा खूप त्रास होत होता. त्यातच भर म्हणून त्यांच्या घरी त्यांच्या पाहुण्यांची सारखी वर्दळ असायची, सासऱ्यांच्या सेवे सोबत तिच्या आईला त्यांच्या पाहुण्यांची उठाठेव करावी लागत असत. तिच्या आई ला सतत तिच्या मुलांची काळजी लागलेली होती . कारण दारुड्या नवऱ्या सोबत तिला असं किती दिवस काढावे लागणार तिला सुद्धा माहिती न्हवत. सतत चिंतेत असणारी वसुधेची आई नेहमी गप्प असायची तीच दुःख ती कोणाला सांगत नसत. वसुधा मात्र या गोष्टीं पासून अलिप्त होती कारण खेळकर आणि अल्लड वसुधा लहान असल्यामुळे तिला या गोष्टी कळत न्हवत्या. एक दिवस तिचे वडील खूप दारू पिऊन घरी आले आणि तिच्या आईला खूप मारू लागले . दोन्ही मुलं  दचकून जागी झाली आणि घाबरून जिन्या खाली लपून बसली. आपल्या बापाला अश्या अक्राळ-विक्राळ रूपात त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होत.  

विनायक आता थोडा मोठा झाला होता तो घरच्या कामात आईला मदत करत असे. वसुधा पण लहान असली तरी त्या घटनेमुळे  तिच्या बाल  मनावर थोडा का होईना बदल झाला होता. वसुधा आता तिच्या खेळण्या कडे जास्त लक्ष्य न देता आईला मदत करण्यात वेळ घालवू लागली होती. माय-लेकरांना या अश्या परिस्थितीची आता जणू सवयच लागून गेली होती.असे तब्बल पाच वर्ष चालू असताना वसुधाचे आजोबा देवा घरी गेले. तिच्या वडीलांच्या स्वभावा मध्ये फारसा बदल झाला नसला तरी मुलं मोठी झाली आहेत आता बायकोला मारहाण कारण चुकीचं आहे असं समजावण्याचा हर तर्हेने प्रयत्न करून थकलेली मंडळी आता कमीच होऊ लागली होती. आजोबा गेल्या मुळे वसुधेच्या आईला कामाचा त्रास कमी झाला  होता. आता विनायक दहावी पास होऊन पुढच्या वर्गात शिकत होता आणि वसुधा नववी मध्ये होती. एके दिवशी वसुधेच्या आईला पोटाचा त्रास होऊ लागला म्हणून तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेले विनायकाचे वडील घाबरले होते कारण हि तसच होतं.वसुधेच्या आईच्या पोटाची शस्त्रक्रीया करायला लागणार होती आणि त्या साठी खूप पैसे हि हवे होते. या बरोबर घरची काम करता येणार न्हवती. वसुधा ची आई तर पुरती घाबरली होती. तिला माहित होत दारुड्या नवऱ्याने कधी आपल्या मुलांना खायला खाऊ आणला नाही, कधी त्यांच्या शाळेत सोडायला गेला नाही, त्यांना कधी नीट पुस्तकं  घेऊन दिल नाही कि शाळेचा गणवेश . प्रॉपर्टी असली तरी काय कामाची होती. कोड-कौतुक लाड करायच्या वेळी केले

न्हवते आणि आता अपेक्षा हि न्हवती. शेजारच्या मुलांची फाटकी पुस्तकं आणि गणवेश घेऊन आत्ता पर्यंत शिक्षण घेणारे वसुधा-विनायक मनातून आईच्या शत्रक्रियेची बातमी ऐकून खूप घाबरून गेले होते. त्यांना खात्री वाटत न्हवती कि त्यांचे वडील आपल्या आईची शस्त्रक्रिया करण्या साठी पैसे गोळा करतील. अशा परीस्थितीत त्यांच्या वडिलांनी राहते घर गहाण ठेऊन पैसे उभे केले . नाही तरी ते कधी ना कधी होणारच होत . पण समाधान याच होतं कि ते पैसे आता आईच्या शस्त्रक्रियेसाठी उपयोगी येणार. 

थोड्या दिवसांनी शत्रक्रिया  यशस्वी झाली आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या दुसऱ्या घरी राहण्यासाठी गेले. कारण आधीच्या घरा  पासून दवाखान्याचे अंतर खूप होते ,ते सोईस्कर व्हावे म्हणून ते दवाखान्या शेजारी असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरी राहण्या साठी गेले होते. नवीन घर आधीच्या घरापेक्षा खूप प्रशस्त आणि छान होते. पण त्या मागचे सत्य न जाणणारी मंडळी मात्र खुश होती. वसुधाच्या वडिलांनी त्या घरासाठी खूप कर्ज केले होते आणि याची कल्पना त्या तिघांनाही न्हवती. असो ! घरात आई आजारी वडील दारुडे असताना विनायकाचे शिक्षण १२ वीचे चालू होते आणि वसुधा दहावी मध्ये शिकत होती. आई बरी झाली असली तरी ती खूपच स्थूल आणि थकलेली होऊन गेली होती. अशातच काळाने घात  घातला आणि वसुधाच्या वडिलांचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा हात व पाय निकामी झाला तो कायमचा. आता थोडा फार पैसा येत होता तोही पूर्ण बंद झाला होता. शिवाय अपघात मध्ये खूप खर्च करून अपंग झालेल्या वडिलांची अवस्था पाहून वसुधा पूर्ती गोंधळून गेली होती. घरची जबाबदारी तिच्या आणि विनायकाच्या अंगावर येऊन कोसळली. शिवाय वसुधाच्या आजोळी कोणी मदत करणारे न्हवते. बिचारी वसुधा दहावी मध्ये नापास झाली. अभ्यासामध्ये जेमतेम असणारी वसुधेचे मन आता अभ्यासातून कायमचे निघाले होते आणि तिनी घरचीच कामे करण्याचे ठरवले. विनायक मात्र बारावी मध्ये पास झाला असला तरी त्याला नोकरी करणे भाग होते. त्याने एका किराणा दुकाने मध्ये नोकरी धरली आणि त्यामधून त्याने घराला हातभार लावायला सुरुवात केली. रोज रोज पोटाचा प्रश्न आणि त्यातच नवऱ्याचा औषधांचा खर्च दिवसेंदिवस करणं अवघड झालं. आता विनायक ला कुठे तरी चांगली नोकरी धरणं भाग झालं. पण अपुरे शिक्षण आणि घरची बिघडलेली परीस्थिती मध्ये चांगली नोकरी आणि शिक्षण करणे विनायकला अवघड  झाले होते.  पण देवाच्या दयेने विनायकला एका कंपनी मध्ये नोकरी मिळाली व त्याला आता त्याचे घर सांभाळता येऊ लागले. अशी सुमारे चार वर्ष चालले होते. घरात बाप आजारी आईच पण दुखणं असायचं भाऊ कष्ट करून नोकरी करतो आहे हे पाहून वसुधाने विणकाम भरतकाम करून पैसे मिळवायला सुरुवात केली होती. 

एक दिवशी वसुधा च्या आई वडिलांनी वसुधाचं लग्न करण्याचा विचार केला. खूप स्थळ ही येत होती पण वयामध्ये अंतर आहे , पत्रिका जुळत नाही, मुलगा दिसायला चांगला नाही अशी बरीच कारण झाली आणि शेवटी देवाने स्वर्गात बांधून ठेवलेला वर मुलीला पाहायला वसुधाच्या घरी आला. कांदे पोहे झाले लागण ठरलं . सर्व आनंदात पार पडलं . वसुधाच चांगलं झालं . सुटली बिचारी आई-बापाच्या घरून असं जरी वाटत असल तरी सत्य मात्र खूप वेगळं होत. कधी कधी माणसाला इकडे आड आणि तिकडे विहीर असं होऊन जात . तसेच काही वसुधाच्या बाबतीत झालं. आगीतून सुटून फुपाट्यात पडली होती वसुधा. 

वैवाहिक जीवन  जेमतेम चाललं होत. घरात सासू सासरे ,एक मनोरुग्ण असलेला  दीर , आणि वसुधा व तिचा नवरा किशोर असा परिवार होता. वसुधा त्या सर्वां सोबत मिळत  जुळत घेत असताना तिची दमछाक व्हायची. तिची सासू खूप खाष्ट होती . तिला तिच्या सासूचा खूपच जाच  होता. तिनी तिच्या प्रेमळ आणि मन मिळावु स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेतली होती. आता कुठे सुरळीत होत होत तेवढ्यात किशोरची नोकरी गेली. आता नवीन नोकरी शोधावी लागणार त्यासाठी किशोर शहरात गेला . वसुधा मात्र गावीच  राहिली होती. तिला तिथे एकटीने राहणे अगदी जीवावर यायचं . ती याच कल्पनेनी खुश व्हायची किशोरला नोकरी मिळाली कि ती पण शहरात जाणार. आता किशोरला नोकरी मिळाली न्हवती त्यामुळे तीच शहरात जाणं अजूनच लांबणीवर पडलं होतं. एक वर्ष गेलं तेंव्हा किशोरला नोकरी मिळाली. आणि शेवटी वसुधाच्या आयुष्यातला तो सोनेरी दिवस उगवला. आता वसुधा किशोर सोबत शहरात जाणार होती. गावी असताना त्या दोघांना एकांत असा मिळालाच न्हवता आता तरी तो मिळेल आणि सुखाचे दिवस सुरु होतील असे वसुधाला वाटत होते. 

वसुधा आणि किशोर शहरात राहायला गेले. जाताना वसुधेला लग्नात जे काही भांडी दिली होती ती सर्व ती घेऊन गेली होती ती गावी कधीच न येण्याच्या विचाराने . कारण सासूच्या छळा ला आणि मनोरूग्ण असलेल्या दिराला ती कंटाळली होती. इकडे वसुधा व किशोरने आपला छोटासा संसार मंडल होता. वसुधा हि नोकरी करायची दोघे नोकरी करून संसाराला हात भार लावायचे , गावी पैसे पाठवायचे. सर्व काही  सुखात आणि सुरळीत चालले होते. वसुधाचे आई वडील आणि भाऊ यांचं पण आता ठीक चाललं होत. लग्नाला दोन वर्ष होत आले होते आणि ज्याची सर्व जण वाट पाहत होते ती बातमी आली . वसुधाला  दिवस गेले होते. सर्व काही आनंदात होते. वसुधेला तर परमानंद झाला  होता. वसुधे ची आई तर बाळाची स्वप्न पाहून हरकून गेली होती. आजी व्हायच्या कल्पनेत गडून गेली होती. वसुधेला आता तिसरा महिना लागला होता. सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. तिच्या मनावरचे दडपण कमी झाले . किशोर आता ओव्हरटाईम करून जास्त पैसे मिळवू लागला . त्या दोघांना बाळाची स्वप्ने बघून बघून खरोखरच बाळ घरात असल्या सारखं वाटत . दोघे खूप आनंदात होते आणि जबाबदार सुद्धा. 

एक काळाकुट्ट अंधार त्या दोघांच्या आयुष्यात घेऊन येणार तो दिवस उजाडला . वसुधेला उलट्या व्हायला सुरुवात झाली. तिला चक्कर हि येत होती . त्या दिवशी किशोर लवकरच कामावर निघून गेला होता कारण सायंकाळी लवकर येऊन त्यांना दवाखान्यात जायचे होते. वसुधाने नेहमीची काम उरकली. दुपारी जेवण केलं . किशोरला फोन सुद्धा केला व जाऊन झोपणार इतक्यात जोराची चक्कर आली आणि ती धाडकन जमिनी वर कोसळली . तिच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. तिला त्या वेदना सहन होत न्हवत्या. आता शेजारी कळवल्या शिवाय पर्याय न्हवता . शेजारच्या काकूंनी तिला दवाखान्यात नेले पण जे नको होते तेच झाले. वसुधेचे बाळ गेले!
वसुधा ला खूप दुःख झालं . तिनी पाहिलेली स्वप्न तुटली त्यांचा चुराडा झाला होता . ती जखम तिच्या मनावर खोल वर रुतली होती. किशोर तिला समजून घेत होता वेळो-वेळी समजावून सांगत होता. किशोर मुळातच शांत आणि गोड स्वभावाचा असल्यामुळे त्याने वसुधाला समजून घेऊन या परिस्तिथीमधून तिला बाहेर काढलं होत. आणि त्यांचा संसार पुन्हा एकदा नव्याने सुरु झाला होता. 

पण त्या विधात्याच्या मनात काही वेगळंच होत. त्याच्या समोर कितीही प्रार्थना केल्या कितीही गयावया केल्या तरी त्या सठविणे लिहलेलं नशीब काही बदलता येत का? आज वसुधा आणि किशोर यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झ्हाली सर्व दवाखाने सर्व उपाय करूनही त्यांना संतती सौख्य मिळालं नाही . आता वसुधा कंटाळून गेली आहे तिचा हिरमोड झाला. किशोर सुद्धा या नशिबावर खिन्न आहे . पण आशेचा किरण अजून मनात आहे. वसुधा मात्र कधी खूपच निराश झाली कि आत्महत्येचा विचार करते. तुम्हाला काय वाटत तिनी काय करावं ? काही वर्ष लोटून जातात . 


अरे  हो !आनंदाची बातमी हि कि वसुधा आता गरोदर आहे . लवकरच तिला बाळ होणार आहे आणि हरवलेली सुख माघारी येणार आहेत. 


पण वसुधाच्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असत ? जेंव्हा आत्महत्येचा विचार मनात यायचा तेंव्हा तुम्ही काय केलं असत ? असं आयुष्य तुमच्या वाट्याला आलं असत तर तुम्ही काय केलं असत ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा . 


धन्यवाद !!!